डूडल्स

डूडल वॉल आर्ट - १

Submitted by rar on 24 April, 2018 - 11:58

ऑक्टोबर २०१६ मधे मी डूडलिंगच्या माझ्या प्रयोगाबद्दल मायबोलीवर लिहिले होते. त्यानंतर आज जवळजवळ दीड वर्षांनी मी मायबोलीवर माझी डूडल्स पोस्ट करत आहे/करणार आहे. या मधल्या काळात मी खूप डूडलींग केलं. साध्या कागदाच्या पाठकोर्‍या बाजूवर गिरगटण्यापासून सुरुवात करून मी सराव करत करत ए४ आकाराचा कागद, स्केचींग चा कागद इथपासून आता कॅनव्हास किंवा फोम बोर्ड फ्रेम वर डूडल करण्यापर्यंत प्रवास करत आले आहे. शाळकरी वयानंतर बायलॉजीमधल्या फिगर्स सोडल्या तर कधीच चित्रकलेकडे लक्ष दिले गेले नव्हते.

यह बरसोंकी वोही सिगरेट है ... साहिरला आठवताना : डूडल आर्ट

Submitted by rar on 8 March, 2017 - 11:39

आज ८ मार्च. साहिर लुधियानवी ह्या कमालीच्या मनस्वी आणि प्रतिभावंत कवीचा जन्मदिवस. माझ्या फार जवळच्या माणसांपैकी एक साहिर.
आज, त्याच्या जन्मदिवशी त्याची आठवण तर आलीच, पण त्याचबरोबर आठवण झाली मागच्या २५ ऑक्टोबरला , त्याच्या मृत्यूदिनी त्याला आठवताना आपसूकच रेखाटल्या गेलेल्या डूडलची.
आज ते डूडल मायबोलीकरांबरोबर शेयर करतीये, २५ ऑक्टोबरच्या रायटपसकट.
------------------------
Remembering Sahir…

माय आर्ट इज डूडलींग (भाग ३)

Submitted by rar on 19 October, 2016 - 12:19

जितकी माझी बाहेर भटकंती चाललेली असते, त्याही पेक्षा जास्त मी मनात, अंतरंगात, विचारात भटकत असते असं माझं मलाच खूपदा जाणवतं. आजूबाजूला गोष्टी घडत असतात, त्यावर डोक्यात विचार चालू असतो. काही सांगायचं असतं. एक्प्रेस व्हायचं असतं. ती गरज असते, ओढ असते. सतत कसलातरी शोध चालू असतो, बाहेर पण त्याहीपेक्षा माझ्या आतच. काय शोधते माहित नाही. पण हल्ली असं वाटतं जे शोधतीये ते ह्या रेषांमधेच आहे कुठतरी. कोणतातरी फॉर्म व्यक्त होण्याचा.

माय आर्ट इज डूडलींग (भाग १) ...

Submitted by rar on 17 November, 2015 - 00:13

आपल्या शिक्षणपद्धतीत शालेय जीवनात 'चित्रकला' या विषयाला जितकं महत्त्व दिलं जातं, दुर्दैवानं तितकीच चित्रकला मी शाळेत असताना शिकले. पण चित्र हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, ह्याची जाणीव मात्र त्या वयात देखील कळत-नकळत होत होती. कुठे उत्तम चित्र असे, कुठे उत्तम रंगसंगती जमली असेल, कुठे चांगला पॉलीटीकल ह्यूमर व्यंगचित्रातून व्यक्त झालेला असेल, कुठे मुक्त मॉडर्न अभिव्यक्ती असेल, कुठे नुसत्या रेषांतून व्यक्त होणं असेल - आई-बाबा त्यांच्या पाहण्यात आलेली चित्र आवर्जून आम्हाला दाखवत असत.

Subscribe to RSS - डूडल्स