डूडल वॉल आर्ट - १

Submitted by rar on 24 April, 2018 - 11:58

ऑक्टोबर २०१६ मधे मी डूडलिंगच्या माझ्या प्रयोगाबद्दल मायबोलीवर लिहिले होते. त्यानंतर आज जवळजवळ दीड वर्षांनी मी मायबोलीवर माझी डूडल्स पोस्ट करत आहे/करणार आहे. या मधल्या काळात मी खूप डूडलींग केलं. साध्या कागदाच्या पाठकोर्‍या बाजूवर गिरगटण्यापासून सुरुवात करून मी सराव करत करत ए४ आकाराचा कागद, स्केचींग चा कागद इथपासून आता कॅनव्हास किंवा फोम बोर्ड फ्रेम वर डूडल करण्यापर्यंत प्रवास करत आले आहे. शाळकरी वयानंतर बायलॉजीमधल्या फिगर्स सोडल्या तर कधीच चित्रकलेकडे लक्ष दिले गेले नव्हते. त्यामुळे 'मनात इच्छा आहे पण हवा तसा हात वळत नाही' ह्या फेजपासून आता सरावानं सहजपणे हात वळायला लागला आहे ह्या स्टेजपर्यंत पोचण्यात खूप आनंद आणि समाधान आहे.
हे पांढर्‍या फोम बोर्ड वर (20 inch x 30 inch) काळ्या मार्करने केलेले डूडल वॉल आर्ट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ब्राउसर बदलल्यावर दिसलं. Happy सफारी वर दिसत नाहीये फायरफॉक्स वर दिसतय.
मस्त आहे. भरपुर पेशन्सच काम दिसतय.
फोटो पण मस्त आहे.

खूपच छान आहे. एखादी अशी कुठलीही कला असणार्‍यांचा (म्हणजे चित्रकला, नृत्य, गायन, वादन, कुकिंग, लेखन करणे, मूर्ती बनवणे इ.इ. ) मला नेहमी हेवा वाटतो कारण माझ्या अंगी एकही कलागुण नाही. Sad

अप्रतिम!
खूपच छान आहे. एखादी अशी कुठलीही कला असणार्‍यांचा (म्हणजे चित्रकला, नृत्य, गायन, वादन, कुकिंग, लेखन करणे, मूर्ती बनवणे इ.इ. ) मला नेहमी हेवा वाटतो कारण माझ्या अंगी एकही कलागुण नाही. >>>> तुमच्या बोटीत