मायबोली गणेशोत्सव २०१५

गणपतीबाप्पा आणि मी!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:18

नमस्कार!

गणपती बाप्पा मोरया!


Moortee.jpg
विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१५ - कूटप्रश्न-प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 13:47

मायबोली गणेशोत्सव २०१५ - आमच्या घरचा गणपती

Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 23:28

'पायी हळूहळू चाला | मुखाने मोरया बोला |'च्या गजरात तुमच्या घरी गणरायांचं आगमन झालं असेल. प्रतिष्ठापना, पहिल्या दिवशीचा नैवेद्य, अथर्वशीर्ष, आरत्या झाल्या की जेवणं आणि मग जsरा उसंत मिळत्येय न मिळत्येय तोवर संध्याकाळी दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांची लगबग.

यांतून मायबोलीकरांसाठी थोडा वेळ काढा आणि तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची छायाचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.


IMG-20150910-WA0008.jpg

मायबोली गणेशोत्सव २०१५ - नैवेद्यं समर्पयामि

Submitted by संयोजक on 15 September, 2015 - 23:25

गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, पेढे, लाडू, मोदक आणि वर तुपाची धार, पंचखाद्य, वेलची घातलेले साखरफुटाणे, नारळाची वडी, केळीच्या पानावर वाढलेला गरमगरम वरणभात, अळूची भाजी, नवीन केलेलं लोणचं, ऋषींची भाजी, गौरींचा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर केलेली वाटली-डाळ किंवा खिचडी. गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा खाण्याचाही नक्कीच शौकीन असला पाहिजे. त्याची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवसांत तुम्ही खाण्याचे कायकाय पदार्थ केले, याची चित्रमय झलक बघायला आम्ही मायबोलीकर उत्सुक आहोत.

'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी

Submitted by संयोजक on 11 September, 2015 - 02:58

गोव्यामध्ये टोस नावाचा एक गोड पदार्थ करतात. चण्याची डाळ, नारळ आणि साखर असतात त्यात. याच पदार्थात गाजर मिसळून केलेला एक प्रकार.

तर यासाठी लागणारे घटक -

१) ३ कप गाजराचा कीस
२) १ कप चणाडाळ
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर (चवीप्रमाणे कमी-जास्त)
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर

कृती -

१) प्रेशर कूकरमध्ये थोडे तूप तापवून त्यात गाजराचा कीस परतून घ्या. प्रेशर न लावता २ मिनिटे ठेवा आणि मग शक्य तितका कोरडा करून घ्या.

Gajare.JPG

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१५ - पाककृती स्पर्धा - 'अशी ही अदलाबदली' - मुदतवाढ!!

Submitted by संयोजक on 10 September, 2015 - 22:51

FoodCollageWithText&Logo.jpg

नमस्कार!

मायबोलीच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते पाककला स्पर्धा! अनेक चतुर कल्पना लढवत संयोजक मंडळ ही स्पर्धा अधिकाधिक आव्हानात्मक करण्याचा प्रयत्न करत असते आणि पाककलेत पारंगत असलेले खवय्ये मायबोलीकरही भरघोस प्रतिसाद देऊन 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून देत असतात. गणेशोत्सवाला खर्‍या अर्थाने लज्जत व रंगत चढते ती याच उपक्रमाने! तर यंदाही आम्ही ही परंपरा पुढे नेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी पाककला स्पर्धा! 'अशी ही अदलाबदली'!!

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१५