मी एका लेखामध्ये - what does a woman want ? मध्ये स्त्रीयांच्या नक्की गरजा काय, स्त्रियांच्या जगातील वेगवेगळ्या देशातील परिस्थिती काय दर्शवते याविषयी थोडी माहिती दिली आणि काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर काही चर्चा होत आहे आणि त्यातून नवीन दृष्टिकोन मिळत राहतील, सध्याच्या धारणांची पडताळणी होत राहील अशी मी आशा करतो.
What does a woman want? या प्रश्नाचे उत्तर माझ्या कडे नाही, किंबहुना असते तर लग्नानंतर वेगळे नवरा बायकोने वेगळे राहण्याची वेळ आली नसती. या प्रश्नाचे नक्की उत्तर कोणाकडे आहे की नाही माहीत नाही पण चार शिकल्या सावरलेल्या व्यक्तींमध्ये चर्चा व्हावी या उद्देशाने हे लिहिण्याचे प्रयोजन.
`आजचा सुधारक' मासिकातील जानेवारी-फेब्रुवारी १९९७ च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख समान नागरी कायदा विषयक सध्या सुरु असणाऱ्या चर्चांना वैचारिक खाद्य पुरविणारा ठरतो. लेखक दिवाकर मोहनी यांचेबरोबर बोलताना स्त्रीमुक्तीच्या अनुषंगाने समान नागरी कायद्यातील काही मुद्द्यांवर पुन्हा एकदा चिकित्सक चर्चा व्हावी असे वाटल्याने त्यांचा हा लेख खाली देत आहे.
समान नागरी कायद्याचा मसुदा : एक चिकित्सा - स्त्रीमुक्तीच्या अंगाने
दिवाकर पुरुषोत्तम मोहनी
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]
*********************
दुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….