सेन्सॉर

चित्रपट माध्यमाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला.

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2017 - 18:18

तामिळ फिल्म Mersal मधील एका डायलॉगला हटवावे असा आग्रह भारत सरकार धरत असल्याचे कानावर आलेय.

शोध घेतला असता तो डायलॉग खालीलप्रमाणे आढळला,

"सिंगापूरमे 7℅ gST है. फिर भी वहा मेडीकल सुविधा मुफ्त है. मगर भारत सरकार 28% gst लेने के बाद भी मुफ्त ईलाज दे नही पाती, यहा ऑक्सिजन सिलेंडर ना मिलने से बच्चे मर जाते है, बिजली ना मिलने से बीच ऑपरेशनमे लोग मर जाते है. सरकार दवाई पर 12% gst लेती है. मग शराब पर gst नही."

पहिल्या ओळीतील सिंगापूर भारत तुलना एकवेळ सोडता ईतर गोष्टी एखाद्या चित्रपटात डायलॉग म्हणून येण्यात काही गैर वाटत नाहीये.

विषय: 
शब्दखुणा: 

क्या कूल है हम .. मस्ती जादे .. सेन्सॉरचा तमाशा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2016 - 11:38

क्या कूल है हम चित्रपट तुम्ही कोणी पाहिला होता का?
ज्या कोणी चुकून फॅमिलीसोबत पाहिला असेल त्याला नक्की का पाहिला असे झाले असेल?

मग क्या कूल है हम २ आला.
तो पाहिला?
पहिल्याच्या अनुभवावरून मी नाही पाहिला.
पण माझ्या एका मित्राने पाहिला. त्याने एका वाक्यात असे परीक्षण दिले - आपण जे नॉनवेज एसेमेस एकमेकांना फॉर्वर्ड करतो ते पडद्यावर बघायचे असतील तर जा..
अर्थातच मी नाही गेलो.

नुकतेच क्या कूल हम है - ३ चा ट्रेलर यू ट्यूब वर बघायचे नशीबी आले.
चित्रपटाचे वर्णनच ‘सेक्स कॉमेडी’ असे केले होते. वेळ रात्रीची होती. म्हणून ट्रेलर तरी बघूया म्हटले.

विषय: 
शब्दखुणा: 

AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

चित्रपटातील मला खटकलेली आक्षेपार्ह द्रुष्ये.

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2015 - 13:06

आज माझ्या या धाग्यावर,
http://www.maayboli.com/node/52037?page=9

बेफिकीर यांचा हा प्रतिसाद वाचण्यात आला,
<<<
आज चुकून कुछ कुछ होता है चित्रपटातील एक सुरुवातीचा प्रसंग बघितला गेला. त्यात प्राचार्य अनुपम खेर स्वतःही अपरिपक्वपणे वागत होता आणि विद्यार्थी शाहरुख त्याच्या खांद्यावर हात ठेवून वगैरे त्याला पट्टी पढवत होता. ह्या दृष्यात शाहरुखचा दोष काहीच नाही. हा कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाचा विषय आहे. पण एकुणात ते दृष्य पटले नाही. एखाद्या (सुपरस्टार म्हणवणार्‍या) अभिनेत्याने येथे हरकत घ्यायला हवी होती असे वाटले.
>>>

आणि, हा धागा सुचला.

सुरुवात मीच करतो,

विषय: 
Subscribe to RSS - सेन्सॉर