चित्रपट माध्यमाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला.

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2017 - 18:18

तामिळ फिल्म Mersal मधील एका डायलॉगला हटवावे असा आग्रह भारत सरकार धरत असल्याचे कानावर आलेय.

शोध घेतला असता तो डायलॉग खालीलप्रमाणे आढळला,

"सिंगापूरमे 7℅ gST है. फिर भी वहा मेडीकल सुविधा मुफ्त है. मगर भारत सरकार 28% gst लेने के बाद भी मुफ्त ईलाज दे नही पाती, यहा ऑक्सिजन सिलेंडर ना मिलने से बच्चे मर जाते है, बिजली ना मिलने से बीच ऑपरेशनमे लोग मर जाते है. सरकार दवाई पर 12% gst लेती है. मग शराब पर gst नही."

पहिल्या ओळीतील सिंगापूर भारत तुलना एकवेळ सोडता ईतर गोष्टी एखाद्या चित्रपटात डायलॉग म्हणून येण्यात काही गैर वाटत नाहीये.

जेव्हा पासून मी बॉलीवूडचे हिंदी चित्रपट बघतोय त्यात मंत्री संत्री करप्ट दाखवणे आणि कैक घोटाळ्यांचे उल्लेख येणे हे सहज व्हायचे. पोलिस तर एखादा ईमानदार आणि बहुतांश भ्रष्ट दाखवणे हे बघतच लहानाचे मोठे झालोय. सरकारी कर्मचारी म्हणजे पैसे खाणारच हे एखाद्या सरकारी कर्मचारयाचा अनुभव यायच्या आधी आम्ही चित्रपटातूनच शिकलो.
कित्येक राजकीय व्यक्तीमत्वांचे वादग्रस्त वा नकारात्मक चित्रण रंगवणारे चित्रपट आले. पटपट आठवणारे, झेंडा, सरकार ईत्यादी. वाढत्या महागाईबद्दल भाष्य करणे, सौ मै से निन्याण्णवे बेईमान फिरभी मेरा देश बेईमान सारखे डायलॉग मारणे हे सगळे चित्रपटात बघून झालेय. कैक उदाहरणे देता येतील. पण हे नवीनच होतेय या देशात. मध्यंतरी मी टमाटरच्या वाढलेल्या भावाच्या अनुषंगाने एक धागा काढलेला. उद्या जाऊन अश्या धाग्यांनाही हटवण्याची मागणी सरकारकडून झाली तर आश्चर्य वाटणार नाही.

या घडामोडीवर राजकारण बाजूला ठेवून एक स्वतण्त्र भारताचा नागरीक म्हणून चर्चा करायला हा धागा.

ज्यांना काहीच ठाऊक नाही हे प्रकरण त्यांच्यासाठी एक बातमीची लिंक शेअर करतो.

http://indianexpress.com/article/entertainment/tamil/bjp-objects-to-gst-...

यात अजून एक डिजिटल ईंडियामुळे पाकिटात पैसे नाहीत अश्या आशयाचा पुचाट सीन आहे. त्यावर आक्षेप का घेतला हे देखील अनाकलनीय आहे.

असो, ईतर काही लेटेस्ट घडामोडी कोणाला ठाऊक असतील तर कळवा.
तसेच या प्रकरणावर आपले मत झरूर मांडा
धागा चालू घडामोडीत असला तरी चित्रपटप्रेमींनी चित्रपट विभागात आहे समजून आपले मतप्रदर्शन करा.
धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट माध्यमाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला. >> हे मान्य आहे... चित्रपट non-fiction असल्याने त्यात काहीही दाखवले तरी चालते. त्यासाठी बंदी आणायची गरज नाही

पण...

"सिंगापूरमे 7℅ gST है. फिर भी वहा मेडीकल सुविधा मुफ्त है. : .. सिंगापुर मध्ये काहीही फुकट नाही. मेडिकल ला पण सरकारी हॉस्पिटल मध्ये पैसे द्यावे लागतात. सरकारी हॉस्पिटल मध्ये कित्येक वेळा तीन - चार महिन्यानी अपॉईट्मेंट मिळते त्यात पण स्पेशलिस्ट ला दाखवायला $२० ते ३० (१००० - १५०० रुपये ) लागतात. सिगरेट, दारु, कार आणि पॅट्रोल सोडुन सगळ्यावर ७% कर आहे. ( गहु, तांदुळ, भाज्या, औषधे , स्कुल फी वर पण)
सिगरेट, दारु, कार आणि पॅट्रोल वर १००% पेक्षा जास्त कर आहे. कार साठी तर कधी कधी ५००% किंवा त्याचा पेक्षा जास्त पण कर आकारला जातो (कार साठी लिलाव होतात आणी डिमांड जास्त असेल तर कर वाढतो).

मगर भारत सरकार 28% gst लेने के बाद भी मुफ्त ईलाज दे नही पाती, >> भारतात सगळ्याच गोष्टीवर २८% कर नाही. भारतात गहु , तांदुळ , शिक्षण सारख्या गोष्टीवर कर नाही. ०,५,१२,१८ & २८ असे पाच स्लॅब आहेत. भारतात सरकारी हॉस्पिटल मध्ये खुपच कमी पैसात ईलाज होतात.

यहा ऑक्सिजन सिलेंडर ना मिलने से बच्चे मर जाते है, बिजली ना मिलने से बीच ऑपरेशनमे लोग मर जाते है. > सिंगापुर मध्ये विज कधीच जात नाही. मगच्या २० वर्षात लाईट गेल्याचे आठवत नाही. पण दर पण फिक्स नाहीत. मागच्या तीन महिन्यात काय खर्च येतो त्यावर पुढच्या तीन महिन्याचा दर ठरवला जातो. तसे केल्यास भारतात पण विज जाणार नाही. ऑक्सिजन सिलेंडर मुळे एखद-दुसर्या गोष्टी घडाल्या आहेत. कुठलेही सोंग आणता येते पण पैस्याचे सोंग आणता येत नाही.

सरकार दवाई पर 12% gst लेती है. मग शराब पर gst नही. >>> माझ्या मते भारतात दारुवर gst आहे.

कार साठी तर कधी कधी ५००% किंवा त्याचा पेक्षा जास्त पण कर आकारला जातो (कार साठी लिलाव होतात आणी डिमांड जास्त असेल तर कर वाढतो). >> I think the auction is for COE (certificate of entitlement) letter. This is a permission by govt to buy a car. Taxes are separate. I think a Honda City may cost. SD 110,000/- (around 52 lacs). This also for max, 10 years. You won't get any rebate after COE is expired after 10 years. So all new procedure again. Also medical treatment is big issue in Singapore. In India you can consult a endocrinologist / Surgeon etc. in Rs. 700/-. This is real luxury. That's why I left Singapore after getting a good job in Gurgaon. Happy

साहिल शाह, दारूवर gst नाहीये बहुतेक.
सिंगापूरबाबत मी देखील साशंक होतो. तसेही सिंगापूरशीच तुलना का केली, चित्रपटात सिण्गापूरचा संबंध आहे का वगैरे याचीही कल्पना नव्हती. पण त्या खालचे सारे खरे वाटतेय.
गोरखपूरचा माझा स्वत:चाच धागा होता..
पॉवर कट बाबत मुद्दा पॉवर कट होण्याचा नाही तर बॅक अप नसण्याचा असावा. हा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा आहे.

असो, एकूणच मुळात मुद्दा हा आहे की सरकारी खात्यांच्या गलथानपणाबद्दल उल्लेख केला असता ते सीन सेन्सॉरमध्ये कापले कधीपासून जाऊ लागले. एकदा याला मान्यता दिली की चुकीची प्रथा पडायला सुरुवात होईल. प्रश्न भाजपा वा काँग्रेस सरकारचा नाही तर लोकशाही तत्वांचा आहे.