आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
शाळा आठ तास
आता अभ्यासबाह्य शाळेचे
दोन तास वाढवले जातील
विविध उपक्रमात विद्यार्थी
शाळेतच घडवले जातील
शाळेचे पुर्ण आठ तास
गुरूजींना थांबवले जाईल
अभ्यासबाह्य दोन तास
विद्यार्थीही डांबवले जाईल
पण नाण्याला दोन बाजु आहेत
या गोष्टीही मानल्या जाव्या
अन् साधणार्या फायद्यांसह
कुचंबनाही जाणल्या जाव्या
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पेन्शन
सतावते सल तारूण्यातच
उतारवयातील टेंशनची
म्हणून सेवानिवृत्त व्यक्तींना
साथ असावी पेन्शनची
मोडकळीस आयुष्यामध्ये
जणू उमेदीचा सुधार असतो
अन् उतारवयातील पेन्शन
जगण्याचाच आधार असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तोंडात माणिकचंद रिकामा करुन बब्यानं गस्टेल नेम धरुन रिंगणात फेकला. तशी आदीली रिंगणाभाईर आली. पण गस्टेल थोडा रिंगणात लायनीला शिवत पडला.
"बल्ल्या " उड्या हाणत संत्या, राम्या, आन राजा किंचाळली.
बब्यानं पळतच जाऊन गस्टेल नीट बघितला.
" ये आरं आतच हाय की " चवड्यांवर बसुन बब्या पोरांकडं बघत म्हणाला.
मग संत्यानं एक बारकिशी काटकी घीऊन रिंगणाच्या लायनीवर हळुहळु फिरवली. बाकीची पोरं नीट नजर लावुन बघाय लागली. गस्टेल थोडासा हलला.
"बल्ल्या " पुन्हा एकदा पोरं ऊसळली.
"ये बल्ल्याच झालाय, टाक आजुन येक आदीली" संत्या सुड ऊगवत म्हणाला.
वाचन
नुसतेच वाचन नको आहे
वाचन पचनी पडले पाहिजे
केल्या वाचनाने जीवनही
वचनबध्द घडले पाहिजे
डोक्या-डोक्यात मनापासुन
सदविचारांची भरणा व्हावी
अन् न वाचणारांनी कसोसीने
वाचण्यासाठी प्रेरणा घ्यावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
डेली रूटींग
त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात
कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
लोकशाहीच्या सक्षमतेला
कीतीही मारू द्या थापा
कुणाकडेच स्वबळ नाही
लोक सहभागा शिवाय
लोकशाही प्रबळ नाही
लोकशाहीतील लोकांचं महत्व
लोकांना समजुन दिले पाहिजे
अन् लोकशाहीच्या सक्षमतेला
लोकांनी जागृत झाले पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शिकताना
शिकण्यासाठी खुप आहे
शिकणाराने जाणले पाहिजे
सदैव शिकण्याचे ध्येय
नसा-नसात भिनले पाहिजे
कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी
कधीच कुठलेही भय नसते
कधीही काहीही शिकू शकतो
शिकण्याला ठराविक वय नसते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सत्य
नैतिकतेचा आजकाल
का राहिला नाही धाक
सत्य जरी दिसलं तरी
का असते डोळेझाक,.?
सत्य बघतात लोक
सत्य जगतात लोक
सत्य बघता-जगता का
सत्य झाकतात लोक,.!
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३