गंमत
शिव आणि राज चांगले मित्र होते. एकेदिवशी राज भयानक गोष्टींची पुस्तके वाचण्यासाठी शिव च्या घरी गेला. जाण्याआधी त्याच्या वडिलांनी सांगितले की, 'अंधार होण्याआधी घरी ये'. पण खूप रात्र झाली तरी राज शिव च्या घरी बसून राहिला.
काही वेळा ने राज घरी जायला निघाला. खुप अंधार झाल्यामुळे घाबरला होता. एवढ्यात त्याला मागून आवाज आला. "विचार कर, मी माझ्या लांब नखांनी तूला काय करू शकतो". राज खुप घाबरला आणि घराच्या दिशेने धावत सुटला. तो रस्ता ओलांडत असताना त्याला पुन्हा एकदा मागून आवाज आला. "विचार कर, मी माझ्या लांब नखांनी तूला काय करू शकतो".