शिव आणि राज चांगले मित्र होते. एकेदिवशी राज भयानक गोष्टींची पुस्तके वाचण्यासाठी शिव च्या घरी गेला. जाण्याआधी त्याच्या वडिलांनी सांगितले की, 'अंधार होण्याआधी घरी ये'. पण खूप रात्र झाली तरी राज शिव च्या घरी बसून राहिला.
काही वेळा ने राज घरी जायला निघाला. खुप अंधार झाल्यामुळे घाबरला होता. एवढ्यात त्याला मागून आवाज आला. "विचार कर, मी माझ्या लांब नखांनी तूला काय करू शकतो". राज खुप घाबरला आणि घराच्या दिशेने धावत सुटला. तो रस्ता ओलांडत असताना त्याला पुन्हा एकदा मागून आवाज आला. "विचार कर, मी माझ्या लांब नखांनी तूला काय करू शकतो".
राज अतिशय घाबरला, धावत पळत तो घरी पोहोचला आणि पलंगाखाली लपून बसला.
तेवढ्यात पुन्हा एकदा तोच भयानक आवाज
आला."विचार कर, मी माझ्या लांब नखांनी तूला काय करू शकतो". आता मात्र राज ने सर्व साहस एकत्र करून त्या आवाजाच्या दिशेने बघितले. त्याला खूप आश्चर्य वाटले जेव्हा हे समजले की त्या भयानक पोशाखात त्याचे वडिल होते.
त्यानंतर राज ने कधीही त्याच्या वडिलांची आज्ञा मोडली नाही.
गंमत
Submitted by Sandhya Jadhav on 1 February, 2020 - 00:21
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा