स्थलांतरित कॅनडा गीजच्या सहवासात एक तास. (वॉशिन्ग्ट्न डीसी).........("मेनका" मधील पूर्वप्रकाशित लेख)
कॅनडा गीजच्या सहवासात एक तास
इथे यांचे फोटो पहा
http://www.maayboli.com/node/48171
( हा लेख मेनका मासिकात पूर्वप्रकाशित. त्यांनी इथे अपलोड करायला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.)
मुक्काम पोस्ट वॉशिन्गट्न डीसी, USA
आत्तापर्यंत अमेरिकेतल्या स्प्रिंग आणि समरचाच अनुभव घेतला होता.
पण या वेळी इथे विंटरमधेच आल्याने इथल्या थन्डीची बरीच वेगवेगळी रूपं अनुभववली.
कधी जबरदस्त हिम वर्षाव, कधी भर दुपारी बारा वाजता कडक उन्हात हाडं गोठवणारी थंडी. कधी डोक्यावर कडक ऊन, तरीही बोचऱ्या वाऱ्यामुळे आणखीच बोचरी झालेली थंडी.