हुश्श! दमले बाई! आता तुम्हा सगळ्यांशी बोलायला मी मोकळी. बरं चहा घेणार का तुम्ही? काय बाई विचारतेय मी हे! हो म्हणालात तरी इतक्या लोकांसाठी चहा थोडीच करता येणार मला एकटीला. पण काय आहे ना की आमच्या घरी आल्या गेलेल्याला आलं घालून चहा द्यायची पद्धत आहे. देसायांनी आमचंच बघुन सवय लावून घेतली हो! पण त्यांना शोभतं चहा देणं. त्यांचा काही आमच्या एवढा मोठा गृहौद्योग नाही. त्यांना काही म्हणणार नाहीत लोकं पण आम्ही किमान बासूंदी विचारायला हवी ना लोकांना ? पण आईंनी काटकसरीच्या सवयी लावून ठेवल्यात त्यामुळे आम्ही चहाच विचारतो.
सातीच्या वतीने तिच्या पाल्याची प्रवेशिका देतेय.
पाल्याचे नावः अंकिता
वयः आठ वर्षे
पाल्याचे नाव : चि. सोहम
पाल्याचे वय : नऊ वर्षे
अ) निसर्गप्रेमी बाप्पा
ब) बाप्पाची किक
पाल्यः सानिका
वय:१० वर्ष
१) झाडे लावणारा बाप्पा
२) फुटबॉल खेळणारा बाप्पा
पाल्यः सानिका
वयः १० वर्ष
या उपक्रमाच्या निमीत्ताने तिने मराठीत लिहीलं (अभ्यासा वय्तिरिक्त) हेच माझ्यासाठी सुखावह आहे. धन्यवाद संयोजक. डायरेक्ट पेनाने लिहील्याने काही चूका सुधारता आल्या नाहीत त्याचं वाईट वाटतय पण ठीक आहे सरावाने त्याही चूका टाळता येतील तिला अशी आशा आहे.
नावः चि. रेयांश
वय : पावणे पाच वर्शे.
निसर्गप्रेमी बाप्पा
बाप्पाची किक
या प्रक्रियेतिल काही संवाद :
आई : हा वरती ब्लु कलर का काढलास ?
पिल्लु : ते क्लाउड्स आहेत . ( विचार करून ..) मी रेन ड्रॉप्स पण काढू का? मस्त वाटतील .
आई : नको नको . पाउस कशाला ? बाप्पा भिजेल ना .
पिल्लु : बाप्पा भिजेल... ह्म्म्म्म ... त्याच्याकडे छत्री पण नाही आहे ना