आता कशाला शिजायची बात - Sayali Paturkar- आगळे वेग़ळे पंचामृत (मखाण्याचे)

Submitted by सायु on 6 September, 2014 - 06:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गोड मलाई दही : २ वाटया
साय / क्रीम : १ वाटी
दुध : १/२ वाटी
मध : ४ चहाचे चमचे
तुप : २ चहाचे चमचे
मखाणे : १/२ वाटी
काजु, बदाम, बेदाणे, चारोळी, अक्रोड, पिस्ता प्रत्येकी २ ते ३ चमचे बारिक काप केलेले (जवळ जवळ सगळे मिळुन साधारण १ वाटी भर होतात)
केशर काडया : अंदाजे
साखर : गरज वाटली तर, अंदाजेच.

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम दही व्यवस्थीत फेटुन एका टोपात काढुन घ्या, त्यात क्रीम / साय घाला. घरची साय वापरणार असाल तर व्यवस्थीत फेटुन घ्या, बाजारातली वापरणार असाल तर फेटायची गरज नाही, १/२ वाटी दुध , मध, तुप (साखर एच्छीक).आता मखाणे आणि सुक्या मेव्याचे काप आणु केशर काडया घाला. व्यवस्थीत कालवुन. आधी बाप्पाला नैवेद्द दाखवावा आणि मग सगळ्यांना छोट्या बाउल/ वाटया मधे द्यावा.

पंचामृत हे बाप्पाचे आवडते आहे. शिवाय कोणी तुमच्या कडे प्रसादाला आले तर, खार्‍या प्रसादा बरोबर हे वाटीत
स्वीट डीश सारखे देऊ शकता..

आहे की नाही एकदम आगळे वेगळे पंचामृत! शिवाय पौष्टीक देखील.. आमच्या कडे हा प्रसाद असतो म्हणुन बरेच
लोक येतात आणि आवडीन प्रसाद ग्रहण करतात... Happy

फोटो मात्र उद्या टाकील..

वाढणी/प्रमाण: 
काय सांगु, प्रसाद आहे तो!
अधिक टिपा: 

हा प्रकार फ्रीझ मधे ठेवुन थंड गार खुपच छान लागतो...

माहितीचा स्रोत: 
भोपाळची जाऊ, सौ. अनुराधा पातुरकर.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकृचे नाव नियमानुसार दे आणि शब्दखुणा टाक गं Happy
फोटो विसरनेका नै Happy

नाव असे हवे -

आता कशाला शिजायची बात - Sayali Paturkar- आगळे वेग़ळे पंचामृत (मखाण्याचे)

शब्दखुणा - मायबोली गणेशोत्सव २०१४, आता कशाला शिजायची बात

धन्यवाद, कामिनी मंजु ताई, सामि, मखाणे म्हणजे कमळाच्या बियां पासुन तयार केलेल्या सोर्ट ओफ लाह्या

दुर्वा, फुलं मांडून फोटो काढायची कल्पना आवडली Happy मात्र पहिले दोन घटक पदार्थ आवडीचे नसल्याने ते वाचूनच हम पतली गली से भाग लिये Wink

यम्मी. मस्त लागेल हे. फोटो तर खुपच छान. बाकी मखाने इतर वेळी घेतो तसे आधी परतुन घ्यायचे का डायरेक्ट वापरायचे?

छान वाटतंय हे मखाण्यांचं पंचामृत. घरी मखाणे आहेत, एखाद्या दिवशी नाश्त्याला घेऊन येईन ऑफिसात.

सायली, मखाणे दूध शोषून घेतात का?