१५ एप्रिल २०१३. सायंकाळी सातची वेळ. मी आणि पत्नी, तिचा आवडता अभिनेता - राजीव खंडेलवालचा "साऊंडट्रॅक" चित्रपट पाहत होतो. या चित्रपटात नायकाचा एक कान पूर्ण बधीर होतो आणि दुसर्या कानाला जेमतेम ३० टक्के श्रवणशक्ती राहते असा एक प्रसंग आहे. पुढे तर नायक पूर्णच बहिरा होतो. अर्थात त्याच्या या कमतरतेवर मात करूनही तो उत्तम संगीतकार म्हणून स्वत:ला सिद्ध करतो असे काहीसे चित्रपटाचे कथासूत्र आहे. तर आम्ही हा चित्रपट व्यवस्थित Enjoy केला. चित्रपट पाहतच रात्रीचे भोजनही उरकले आणि अचानक रात्री झोपण्यापूर्वी पत्नीने तक्रार केली की तिला एका कानाने अजिबात ऐकू येत नाहीये.
वैद्यकीय कथा या साहित्यप्रकारामध्ये रहस्यकथा, शोधकथा, इतिहासकथा, निदानचातुर्य कथा असे अनेक उपप्रकार आढळतात. डॉ. हाऊस, एमडी हा टीव्ही शो तर तब्बल आठ वर्षे लोकरंजन करीत होता. डॉ. ॲलन सिगल या बर्मिंगहॅम, अलाबामा येथील सुप्रसिद्ध डॉक्टरांची एक चातुर्यकथा येथे रुपांतरीत करीत आहे. आपणास ती नक्कीच आवडेल.
---------------------------
यलो.. यलो… डर्टी फेलो ! - अर्थात एक वैद्यकीय निदानचातुर्य कथा !
हॉस्पिटलमधील आपला सकाळचा राऊंड डॉक्टर ॲलन यांनी जवळजवळ संपवलाच होता एव्हड्यात,
करायला गेलो एक आणि … - एक वैद्यकीय सत्यकथा !
१ जानेवारी २००८ !
स्थळ : सिंगापूर मधील एक मोठे पब्लिक हॉस्पिटल.
नवीन वर्षाची सकाळ. हॉस्पिटल मधील सर्व व्यवहार मात्र नेहेमीप्रमाणेच चालू. बाह्य रुग्ण विभाग मात्र नेहेमीपेक्षा जास्तच गजबजलेला ! सिंगापूर शहर नववर्ष रजनीच्या धुन्दिमधुन हळूहळू जागृत होत होते. बहुतेक वॉर्ड दारू पिवून बेहोष झालेल्या रुग्णांनी आणि त्यांनी घडवलेल्या अपघातामध्ये हकनाक सापडलेल्या निरपराध व्यक्तींने भरला होता.
डॉ. थालमान यांनी केला संजीवनी-विद्येचा प्रयोग !
एखाद्या उत्तुंग इमारतीवरून पडत असलेल्या मुलीला झुपकन येवून पडतापडता अलगदपणे झेलून सुखरूपपणे जमिनीवर आणून सोडणारा 'सुपरमॅन' अथवा 'शक्तिमान' आपण आपल्या मुलांसोबत टी व्ही वर पाहून नक्कीच टाळ्या वाजवल्या असतील. पण एखाद्या हिमतळयात बुडून लौकिक अर्थाने अर्धा तासभर मेलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीला पुन्हा जीवित करण्याचा 'संजीवनी विद्या प्रयोग' केला होता एका सुपर-डॉक्टरने !
मित्रहो,
मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा !
तिळगूळ वाटण्यामध्ये आणि खाण्यामध्ये काही शास्त्रीय कारण आहे काय ?
बाबा आणि सोनू........
---------------- || श्री || -------------
दिनांक १७ सप्टेंबर २०१३
पुणे.
प्रिय सोनू,
खरं तर तू एवढी मोठी झाल्यावर हे पत्र मी तुला लिहितोय याचे तुला आश्चर्यच वाटेल - कारण मी तुझ्याशी कायमच मित्रत्वाने आणि मोकळेपणाने बोलू शकतो. पण मग पत्राचे कारण काय ? खरंच, कारण नक्की काय आहे असे विचारले तर माझ्याकडे काहीच कारण नाही.... तरी पण ...
एक कारण जरुर आहे.
आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन
रोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग? तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे? टेन्शनचं कारणच काय? तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.
"ये ना"
"नको"
"का?"
"बघतात"
"बघूदेत"
"हसतात"
"हसूदेत"
"लवकर ये"
"कशाला?"
"कससंच होतंय"
"पण एकदाच हं?"
"हो"
"घे, आले"
"गर्र्घर्र्र्र्र्र्र्स्स्स्स्स्स्स"
"झालं?
"हो, आता बरं वाटतंय"
"आता एकदम रात्रीच्या जेवणानंतर"
"चालतंय"
"तोवर आठवण नाही येणार माझी?"
"तोवर कशी आठवण येईल?"
"का?"
"तुझी आठवण जेवणानंतरच येणार... तू तर एक ढेकर आहेस ना?"
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)