आठवण - अर्धशतशब्दकथा

आठवण - अर्धशतशब्दकथा

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2013 - 02:18

"ये ना"

"नको"

"का?"

"बघतात"

"बघूदेत"

"हसतात"

"हसूदेत"

"लवकर ये"

"कशाला?"

"कससंच होतंय"

"पण एकदाच हं?"

"हो"

"घे, आले"

"गर्र्घर्र्र्र्र्र्र्स्स्स्स्स्स्स"

"झालं?

"हो, आता बरं वाटतंय"

"आता एकदम रात्रीच्या जेवणानंतर"

"चालतंय"

"तोवर आठवण नाही येणार माझी?"

"तोवर कशी आठवण येईल?"

"का?"

"तुझी आठवण जेवणानंतरच येणार... तू तर एक ढेकर आहेस ना?"

Subscribe to RSS - आठवण - अर्धशतशब्दकथा