"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले"
प्रकाश परत तेच म्हणत होता.
"अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले.
"सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला.
सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता.
आपल्यापैकी अनेकजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले दिसतात. बर्याचदा त्या मूळ गावात आपल्या काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात. आपल्या आजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीर बाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या. आपल्या पिढीला मात्र गावापासून लांब राहील्यामुळे सातबाराचे उतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फार माहिती असलेली दिसत नाही.