"नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे"
आता या म्हणीत काही नवीन आहे का?. पण हीच तर अडचण आहे. समजतय पण उमजत नाही.
"नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे"
समजायला लागल्या पासून आज पर्यंत ही म्हण मी सतत ऐकत आलोय. माझ्याबाबतीत.इतरांकडून.
मी कुणिही असो. कारण वेगवेगळी
मराठी भाषा दिवसाच्या प्रचिती म्हणींची या उपक्रमाने आजीच्या काही जुन्या म्हणींना उजाळा देते आहे. प्रसंगानुरुप आजी अशी चटचट म्हणी बोलायची की प्रसंगापेक्षा तिची समयसूचकताच जास्त लक्षात राहायची. त्यातलेच हे काही छोटे छोटे प्रसंग :
मंडळी, गोष्ट हा आपणा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! आपल्याला सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला, सांगायला फार आवडतं. बच्चेकंपनीला तर गोष्टी भारीच प्रिय! अनंत पै यांच्या अमर चित्र कथा असोत वा चाचा चौधरी, फँटमची कॉमिक्स असोत, लहान मुलं या चित्रगोष्टींत अगदी रमून जातात.
छोट्या दोस्तांची हीच आवड लक्षात घेउन यावर्षीच्या मराठी भाषा दिवस २०१४च्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक खास उपक्रम - 'चित्रकथा'!
आजकाल इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे या म्हणी विस्मॄतीत गेलेल्या असल्या तरी काही वर्षापुर्वी बोलण्यात अश्या म्हणींचा सर्रास वापर होत असे. कमीत कमी शब्दांत नेमकी परिस्थिती मांडणार्या या म्हणींच्या उत्पत्तीला एखादी घटना/ कथा कारणीभूत असते. आपल्या आयुष्यातही अश्या घटना घडत असतात जिथे एखादी म्हण अगदी चपखल बसते.
नाटक म्हणजे मराठी संस्कृतीचं एक देदीप्यमान दालन! उज्ज्वल परंपरा लाभलेली मराठी रंगभूमी अनेक वर्षांपासून मराठी मनाला भुरळ घालत आली आहे. ऐतिहासिक, सामाजिक, अनुवादित, प्रायोगिक, बालनाट्य अशा अनेक प्रकारच्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध आहे. या अथांग सागरातून काही मोती वेचून आपण पुढच्या पिढीची ओंजळ त्या मोत्यांनी भरून देऊया.
मराठी भाषा दिवस २०१४च्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत 'तिसरी घंटा'!
बर्याच वेळा आपल्याला असे ऐकावाचायला मिळते, की मराठी शिकणाऱ्या किंवा बोलणाऱ्या माणसांचे प्रमाण घटत चालले आहे आणि आपली मराठी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मराठी माणसेच जिथे एकमेकांशी मराठी बोलत नाहीत, तिथे मराठीला विचारणार तरी कोण?
पण एक फार मोठा अमराठीभाषक लोकसमूह कामधंद्याच्या, शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे आणि तो काही ना काही कारणास्तव मराठी भाषा आपलीशी करू पाहत आहे.