प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - विक्रमसिंह

Submitted by विक्रमसिंह on 28 February, 2014 - 16:25

"नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे"

आता या म्हणीत काही नवीन आहे का?. पण हीच तर अडचण आहे. समजतय पण उमजत नाही.
"नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे"

समजायला लागल्या पासून आज पर्यंत ही म्हण मी सतत ऐकत आलोय. माझ्याबाबतीत.इतरांकडून.
मी कुणिही असो. कारण वेगवेगळी
आईच न ऐकणारा, नीट न जेवणारा, बांबांच न ऐकता नियमीत व्यायाम न करणारा मुलगा, मोठ्या बहिणीची शिस्त न पाळणार धाकटा भाउ, छोट्या बहिणीला छळणारा मोठा भाउ, ठरलेल्या वेळा न पाळणारा मित्र, त्याच त्याच चुका करणारा विद्यार्थी, एकाच पद्धतीनी सारखा बाद होणारा फलंदाज, नवरा (तिकडून तर अगणीत वेळा ऐकून झालय, य कारणांमुळे (कधीकधी काही कारण नसताना सुद्धा)), रागवायच नाही ठरवून सुद्धा मुलांवर रागवणारा बाबा, रहदारीचे नियम मोडून मग चिरीमीरी देउन सुटका करून घेणारा सुजाण नागरीक, आणि अजून किती तरी गोष्टी.

माझ्या बाबत सगळ्यांच म्हणण एकच. "नळी फुंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे"

आमच्या लहानपणे घरी फुंकणी आणि तिचा चूल पेटवण्या साठीचा उपयोग पाहिला होता. त्यामुळे तेंव्हा खूप प्रयत्न करायला लागले की अस म्हणतात अस वाटायच. नंतर कधीतरी सोन्याशी संबंधीत ही म्हण असावी अस वाटल.

पण एकदा शुद्धलेखनावरून मराठीच्या शिक्षकांनी कान पिळला तेंव्हा खरा अर्थ कळला. अरे, सगळे आपल्यालाच बोलतायत. आणि तुम्ही तरी काय वेगळे आहात. मग मला छंदच लागला. नळ्या मोजायचा. माझ्या, तुमच्या. आयुष्यभर. सतत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

माझ्या आजी आजोबांच्या म्हणी खूपच भयानक... मी कायम ह्या म्हणी एकत वाढलेय. Proud

गां** नाही दम आणि नाव मुकादम, Proud (ह्याचा अर्थ एकदम लक्षात) अर्थात आजोबा
शिंक्याचे तुटले अन बोक्याचं फावलं - म्हणणारी व्यक्ती आजी
घाटावरून आला भट , धर शेंडी आपट.(ह्याचा अर्थ मीच विसरले) - म्हणणारी व्यक्ती आजी
पळसाला पानं तीन(ह्याचाही अर्थ विसरले) -म्हणणारी व्यक्ती आजी
झा** नाही पत आणि नाव गणपत- म्हणणारी व्यक्ती आजोबा
आला वारा , गेला वारा तो कुणाचा सोयरा गैरा.. Happy
आणि बर्‍याच सालंकृत म्हणी होत्या... एकेक विसरले..

कोणी त्या वरच्या म्हणींचा अर्थ सांगेल का(ज्याचा अर्थ माहीती नाहीये)

घाटावरून आला भट , धर शेंडी आपट << खरे तर ते कोडे आहे .. कोकणातून आला... आणि उत्तर आहे नारळ..

म्हण असल्याचे ऐकले नाही..

ते पळसाला पानं तीन << घरोघरी मातीच्या चुली... . तोच अर्थ...

कुठेही गेलात तरी माणसं तशीच असतात.. या अर्थाने..

पूर्वीची लोकं वाईट शब्द वापरायला घाबरायची नाहीत.. गां...., झा... इत्यादी शब्द नित्यनेमाने असयचे भाषेत.
अर्थात बायका ठेवणे, इत्यादी पण चालत असावे..