श्रीदेवी
श्रीदेवी ... अर्ध्यावरच डाव सोडून गेली :(
श्रीदेवी आता राहिली नाही. हार्ट अटेक आला आणि त्यातच गेली. बातमी एव्हाना सर्वांना समजली असेल. पण कित्येकांना अजूनही हे पचले नसेल. व्हॉटसपवर ज्यांनी पाहिले त्यांचा खातरजमा केल्याशिवाय विश्वासही बसला नसेल. 54 वर्षे वय हे तसेही जाण्याचे नसले तरी ती 54 ची होती हेच मुळात पचवणे अवघड होते. आताही तिचा चेहरा डोळ्यासमोर येत ऐन तारुण्यात एखादा तारा निखळलाय असेच वाटतेय. कारण आजही श्रीदेवी म्हटले की चालबाज आठवतो, सद्मा म्हटले की श्रीदेवी आठवते. खुदा गवाहमध्ये अमिताभच्या ईतकीच लक्षात राहते, रूप की राणी चोरोंका राजा सारख्या टुक्कार चित्रपटातही जाणवते..
श्रीदेवी चे दु:खद एक्झिट
शाहरुख खान - नाहीच आवडला कधी मग फारसा !!
तो नाहीच आवडला कधी मग फारसा …. प्रयत्न करूनही.
ते दिवस फार स्वप्नील होते. माधुरी दीक्षित, श्रीदेवी आणि जुही चावलाच्या निस्सीम प्रेमात होते मी. त्याकाळात थेटर मध्ये वगैरे जाउन फारसे पिक्चर पहिले जात नव्हते पण ते टीव्ही वर आले कि मग मात्र नाहीच सोडायचे. अश्यात श्रीदेवी चा 'चालबाज', 'चांदणी' 'मि. इंडिया', 'लम्हे' … जुहीचा 'इश्क','हम है राही प्यार के' आणि माधुरीचा … चा नाहीच तिचे तर अनेक 'साजन', 'हम आपके है कौन' 'दिल' 'बेटा' असे बरेच ….