गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!
ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!
नमस्कार, आज मी आपल्याशी ग्रामीण भागातील एका महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणुन संवाद साधत आहे. आमचे महाविद्यालय अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगांव या तालुक्याच्या ठिकाणी आहे. आमच्या महाविद्यालयात आम्ही पुणे विद्यापीठा द्वारे चालवली जाणारी "कर्मवीर भाऊराव पाटील- कमवा आणि शिका" योजना सुरु केलेली आहे. २०-२५ विद्यार्थी विद्यार्थीनी त्यात सहभागी होउन आपल्या शिक्षणाचा खर्च सांभाळण्याचा प्रयत्न करित आहेत. ग्रामीण आणी दुष्काळग्रस्त भाग असल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थीती बेताची आहे. आमचे महाविद्यालय त्यांना पाठबळ देत आहेच.
महाराष्ट्रातील १९९३ च्या भुकंपानंतर त्या भागामध्ये काम करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. अश्या अनेक स्वयंसेवी संथांमधीलच "स्वयं शिक्षण प्रयोग" ही एक. या संस्थेने जागतीक बँकेचे काम पुर्ण झाल्यावर तेथील महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु केले. गेली २० वर्षे त्यांचे हे काम अव्याहतपणे चालु आहे. या संस्थेबद्दल अधिक माहिती http://sspindia.org/ येथे उपलब्ध आहे.
पी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली! पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला
लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे!
मराठी उद्योजक या ग्रूपबद्दल माहिती प्रकाशित झाल्यापासून अनेक जणांनी यात सामिल होण्याबद्दल विचारणा केली आहे. या ग्रूपमधे सामील होण्याचे निकष आणि पुढील पायर्या. सभासदत्वासाठी कुठल्याही स्वयंसेवकाशी संपर्क साधण्याअगोदर कृपया खालील गोष्टींची पूर्तता करुनच संपर्क करावा
१. फक्त मायबोलीच्या कार्यरत सभासदांना या ग्रूपचे सभासद होता येईल. जे सध्या सभासद नाहीत ते आधी मायबोलीचे सभासदत्व घेऊन मग ग्रूपच्या सभासदत्वसाठी अर्ज करू शकतील.