शिक्षण

तडका - विद्यार्थी मित्रांनो

Submitted by vishal maske on 25 May, 2016 - 11:03

विद्यार्थी मित्रांनो

लक्षवेधी त्या निकालाने
आता प्रदर्शन केलं आहे
विद्यार्थ्यांचं भवितव्यही
म्हणे जाहिर झालं आहे

मात्र हा रिजल्ट म्हणजे
कलाटणी नव्हे अंतिम
म्हणूनच जिथे जाल तिथे
सक्सेस मिळवावे अप्रतिम

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शिक्षण घेता-घेता

Submitted by vishal maske on 21 May, 2016 - 22:34

शिक्षण घेता-घेता

शिक्षण घेण्यासाठीची
धडपड कसोशीने आहे
शिक्षण घेणे म्हणजे
वाघिणीचं दुध पिणे आहे

म्हणूनच की काय शिक्षणात
बहू अडथळे घातले आहेत
अन् शिक्षण घेता-घेता इथे
सामान्यांचे जीणे फाटले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - नीट करा निट

Submitted by vishal maske on 29 April, 2016 - 22:52

नीट करा निट

काळ बदलेल तस-तसे
नव-नविन फंडे होताहेत
विद्यार्थ्यांच्याही ललाटी
नव-नविन कंडे येताहेत

शिक्षण घेण्यासाठी पहा
झाले कठीण सारे बिट
पण विद्यार्थ्यांना शुभेच्छा
नीट पार पाडावी निट

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

वाय डी - इंजिनीयरींग विद्यार्थी आणि पालक

Submitted by नितीनचंद्र on 25 April, 2016 - 04:53

( ही घटना एक सत्य घटना आहे. गुरुवार दिनांक २१ एप्रीलला याची सुरवात झालेली असुन हा मुलगा लेख लिही पर्यंत परत आलेला नाही. मुद्दामच मुलाचे नाव आणि बदलले आहे )

शब्दखुणा: 

मेंदू, भावना व वर्तणूक : भाग १

Submitted by मंजूताई on 12 April, 2016 - 06:45

सेतू – A Conscious Parents’ Forum ह्या पालकांच्या सपोर्ट ग्रुप च्या वतीने नागपुरात दर महिन्यात पालकांसाठी एका चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. मुलांच्या वाढीच्या वयात शाळा- अभ्यास तर महत्त्वाचे असतातच पण मुलांचा नुसताच बौद्धिक विकास झाला तर तो विकास एकांगी होईल. मुलांसंदर्भात पालक म्हणून आपल्याला इतरही अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. मुलांची शारीरिक - मानसिक - बौद्धिक वाढ, क्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास, विविध शास्त्रे, समाजजीवन, मूल्य – नैतिकता, कला – संस्कृती, सौदर्यदृष्टी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

शब्दखुणा: 

तडका - फुलेंना वाहू फुले

Submitted by vishal maske on 10 April, 2016 - 21:12

फुलेंना वाहू फूले

सावित्रीची घेऊन साथ
दिप लावला ज्ञानाचा
स्रीयांना देऊन शिक्षण
मान दिधला मानाचा

स्री शिकुन प्रगत झाली
ते फेल ठरले डाव खुळे
स्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या
तुज वाहतो ही भाव फूले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कितवा नंबर आला?

Submitted by विद्या भुतकर on 7 April, 2016 - 16:59

काहीकाही गोष्टींची किती सवय असते, नाही का? त्यातली प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे पोरांची शाळा, अभ्यास आणि पालक म्हणून माझी मानसिकता. आजही कुणी मुलगा मुलगी रिझल्ट घेऊन आले की पहिला प्रश्न मनात येतो, 'कितवा नंबर आला? किती मार्क पडले?'. आता भारतातही शिक्षणव्यवस्था बरीच बदलली आहे म्हणे. मला कुणाला शैक्षिणिक क्षेत्रात जवळून पाहण्याची बरेच वर्ष संधी आली नाही. त्यामुळे सध्या काय चालू आहे याची काहीच कल्पना नाही. उलट त्यामुळे एक पालक म्हणून मी नेहमी काहीतरी महत्वाची गोष्ट विसरून जाईन अशी मला भीती वाटते. अगदी, 'अडमिशन घ्यायला रात्री जायचे होते आणि माझी झोप उघडलीच नाही', अशी स्वप्नंही पडली आहेत.

विषय: 

१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 10 March, 2016 - 21:33

"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत.

नवी मुंबईतील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by अभि_नव on 19 February, 2016 - 02:28

नवी मुंबईतले चांगले डॉक्टर (व्यक्ती म्हणुन + व्यवसायाने) यांची यादी.
नाव, गाव, पत्ता, वेळ, स्पेशलायझेशन, पॅथी.

तडका - शिक्षक विना-अनुदानित

Submitted by vishal maske on 1 February, 2016 - 07:28

शिक्षक विना-अनुदानित

कर्तव्यात कसुर नाही
कर्तव्य चोख आहेत
सपोर्टचीही कमी नाही
पाठी त्यांच्या लोक आहेत

झटताहेत शिक्षक सारे
स्व-प्रश्न बाजुला ठेऊन
घडवताहेत भविष्य ते
विना-अनुदानित राहून

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - शिक्षण