एकांतात दुरुन बोलावी कोण मला
सावल्या कुणाच्या खुणावतात मला
गुप्प अंधार,आणि दुसरे ना काहीच
त्या गडदांत सुद्धा कोण दिसे मला
मन बेचैन, भीतीने दाटले रोमांच
सुर भयाण, निरंतर ऐकु येती मला
ते डोळे मजवर सतत नजर ठेवून
काळोखातून वटारत असती मला
सांगा कुणी तरी कोण ते अनोळखी
ज्यांची ओळख वाटते नकोशी मला
गुरुवार , २८/०३/२०२४ , ०४:२७ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले..
चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत..
त्यात दिसणार्या, अंगावर झेपावणार्या...
जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्या...
काळ्याकुट्ट सावल्या..!
त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा..
त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता.....
क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला..
उर नुसता धपापत होता.. हाताने अंग नुसते झाडत होता..