Submitted by तुमचा अभिषेक on 7 August, 2013 - 02:14
ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले..
चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत..
त्यात दिसणार्या, अंगावर झेपावणार्या...
जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्या...
काळ्याकुट्ट सावल्या..!
त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा..
त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता.....
क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला..
उर नुसता धपापत होता.. हाताने अंग नुसते झाडत होता..
मात्र अनुभवलेली झोंबाझोंबीची शिरसिरी शरीराची साथ सोडायला तयार नव्हती..
स्वप्न होते समजूनही त्याला स्विकारायला मन धजावत नव्हतं...
आज त्याला कळलं, तिने काय भोगलं !
- तुमचा अभिषेक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मराठी संकेतस्थळांवरच पाहिलेला
मराठी संकेतस्थळांवरच पाहिलेला १०० शब्दांत कथा लिहायचा एक प्रकार अन त्यातला माझा एक प्रयत्न !
Chaan .changala prayatna
Chaan .changala prayatna
क्लास अपार्ट! आवडली
क्लास अपार्ट!
आवडली
मस्तच!
मस्तच!
अगदीच फिकी कथा. परीणामकारक
अगदीच फिकी कथा.
परीणामकारक झाली नाहीये.
जमलीय शतशब्दा ! शतशब्दा
जमलीय शतशब्दा !
शतशब्दा लेबलात वाचल्याने शेवट 'हे स्वप्नं होतं' असा असणार असं वाटतंच होतं.
पण हा शेवट वेगळाच.
आवडली कथा.
शताक्षरी जमली आहे. कथा आवडली.
शताक्षरी जमली आहे.
कथा आवडली.
जमली आहे कथा. पण अशा कथेला
जमली आहे कथा. पण अशा कथेला आवडली असं म्हणवत नाही.
अभिषेक, पहिलाच प्रयत्न चांगला
अभिषेक, पहिलाच प्रयत्न चांगला आहे
ड्रॅबल म्हणतात ना या
ड्रॅबल म्हणतात ना या प्रकाराला?
चांगला जमलाय! आमच्यासारख्या फाफटपसारा लिहिणार्या लोकांचे हे काम नव्हेच त्यामुळे उलट जास्त कौतुक.
शेवट परिणामकारक वाटला. आवडली
शेवट परिणामकारक वाटला. आवडली कथा.:स्मित:
नंदिनी __ धन्यवाद, मात्र
नंदिनी __ धन्यवाद, मात्र तुम्ही ज्याला फाफटपसारा बोलत आहात त्याच फॉर्ममध्ये मी हे परवा लिहायला घेतले होते. दिडदोन हजार शब्दांची उधळण केल्यावर मला समजले की `हे' मला जमण्यासारखे काम नाही आणि मला तुलनेने सोपे वाटणार्या प्रकारात तोच आशय पोहोचवायचा प्रयत्न केला.
सर्व प्रतिसादांचे धन्यवाद
ड्रॅबल म्हणतात ना या
ड्रॅबल म्हणतात ना या प्रकाराला?
>>>>>>>>>>>>>
माझ्याही कानावर हे नाव काही दिवसांपूर्वीच पडलेले पण खोलात शिरलो नव्हतो, आता आपण त्याचा उल्लेख केल्याने गूगाळूनही पाहिले..
http://en.wikipedia.org/wiki/Drabble
खूप दिवसांनी कथा लिहिली.इतके
खूप दिवसांनी कथा लिहिली.इतके दिवस कुठे गायब होता.
हो खूप दिवसांनी आणि त्यातही
हो खूप दिवसांनी आणि त्यातही फक्त १०० शब्दांची
मात्र मधल्या काळात ललित लेखनावर होतो.. "सुख म्हणजे आणखी काय असते" यावर ५ लेखांची मालिका लिहिली होती..
मस्तच... आवडली आणि हा
मस्तच... आवडली आणि हा प्रकारही आवडला.
आवडलं. चांगला प्रयत्न आहे.
आवडलं.
चांगला प्रयत्न आहे. (१०० शब्दांच्या मर्यादेत अधिकाधिक परिणामकारक लेखन करणे - हे बर्यापैकी आव्हानात्मक आहे!)
आमच्यासारख्या फाफटपसारा लिहिणार्या लोकांचे हे काम नव्हेच त्यामुळे उलट जास्त कौतुक >>> नंदिनी, अगदी माझ्या मनचं. थोडक्यात, जेवढ्यास तेवढं आणि फक्त मुद्द्याचं तेवढं - या अटी असतील तर माझं बोलणं, लेखन (आणि वाचनही) मान टाकेल
शेवट अनपेक्षीत पण परिणामकारक
शेवट अनपेक्षीत पण परिणामकारक वाटला.
(१०० शब्दांच्या मर्यादेत
(१०० शब्दांच्या मर्यादेत अधिकाधिक परिणामकारक लेखन करणे - हे बर्यापैकी आव्हानात्मक आहे!)<< +१
एकदम परिणामकारक!
धन्यवाद सर्वांचेच.. हुरुप
धन्यवाद सर्वांचेच.. हुरुप वाढवलात ..
हि पण जबरी राव, ,, आज त्याला
हि पण जबरी राव, ,, आज त्याला कळलं, तिने काय भोगलं ! मस्तच
ट्राय मारायला पाहिजे हा प्रकार, लिहून सुद्धा पटकन अन वाचून सुद्ध पटकन..
अवांतर - काही दिवसांनी माबोवर शतशब्दकथा विभाग टाकावा लागणारेसे दिसतेय..
antim ool bhidli......
antim ool bhidli...... amanush asta sarva... mhantla tar 100 shabdanch nai tar eka olich.... dukkhala shabdachi garaj naste... manala tya eka vakyane janvun dil... sad but