मामाच्या पोरींना शिमग्याची भेट!
माझ्या मामाला साडेचार पोरी
चार डोमड्या पण एक छोरी गोरी
या छोर्यांचं कौतूकं सांगू मी काय
गे माझे शिमगेमाय!
एक नुसताच लंबा बांबू
जणू हाडाचा उभारला तंबू
रक्ता-मासाचा बिल्कूल पत्ताच नाय
गे माझे शिमगेमाय!
एक भलतीच ऐसपैस
जणू पंजाबी मुऱ्हा म्हैस
डोलतडोलत रस्त्यानं चालत जाय
गे माझे शिमगेमाय!
एका रंभेचं रुपडं भालू
दोन्ही गालाचे फ़ुगले आलू
रोज वेणीला लावते हेअरडाय
गे माझे शिमगेमाय!
एक अप्सरा बेलमांजर
हत्ती डोळ्यात काजळाचे थर
पण स्वभाव गरीब गोगलगाय
गे माझे शिमगेमाय!
एक दणकट मल्ल शिपाई
तिला पिसीआर घेण्याची घाई
होणार सून मी या घरची या मालिकेतला झालेला पुनर्मिलन भाग बघितला. मी ही मालिका बघत नाही पण एका मैत्रीणीने हा भाग बघून हमखास (विनोदी ) मनोरंजन होईल म्हणून सुचवले.
तर गाणं सुरु झालं, हिरोईन दुधाचा ग्लास हातात घेऊन लाजत जीने चढु लागली. गाणं ऐकायला चांगलं वाटलं अणि अपेक्षा उंचावल्या.
सुरवात हळुवार झाली तरी रोमांस नंतर पकड घेइल अस वाटत होतं. पण हाय रे कर्मा, त्या लंबुटांग्या हिरोईन समोर आल्यावर हिरो अगदी ईटुकला वाटला. तो समोर आल्यावर ति त्याला पटकन उचलून कडेवर घेतीये की काय अस क्षणभर वाटलं.
आजकाल पुण्याचा ऊन्हाळा नकोसा झालाय. मला जेव्ह्ढा पुण्याचा हिवाळा प्रिय, तेव्ह्ढाच ऊन्हाळा अप्रिय. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जायला नकोसं वाटतं. आज रविवार. इतर वेळी मी घरी नसतो सापडलो पण या उकाडयामुळे घरीच थांबलो होतो. टाईमपास म्हणून टी. व्ही. लावला तर फिरून फिरून त्याच त्याच बातम्या. कारण लोकसभेची निवडणूक ! लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडे रणधुमाळी चालू होती. प्रत्येक पक्ष, अपक्ष आपलाच उमेदवार्/उमेदवारी कशी जनतेच्या भल्यासाठी आहे हे मतदारांवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.राष्ट्रीय प्रश्न , विकासाचा अजेंडा यापेक्षा वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्यांना अक्षरशः ऊत आला होता.
"ए गित्या, अजुन वर वढ ना फ़्लेक्स तिच्या आयला ..." कांच्या माझ्यावर खालून वराडला. आयला या कांच्याच्या! याच्या वाढ्दिवसाचा फ़्लेक्स यानी बनवुन आणलाय आन आम्हाला लावलेय धक्क्याला. याचा वाढ्दिवस आहे का तेरावा याचं पब्लिक्ला काय घेणं हाय का ? पण याला चमकायची हौस दांडगी. चौकात मोठा फ़्लेक्स लावलाय, " आपले लोकप्रिय युवा नेते कांच्या आरकुले यांना वाढ्दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा". शुभेच्छूक म्हणुन स्थानिक नगरसेवक पोपटरावचा फ़ोटो साइडला, मधे याचा पिवळे दात दाखवणारा आणि गांजा मारल्यागत दिसणारा फ़ोटो आणि खाली आम्हा पोराटोरांची नावे !
काल बर्याच दिवसांनी फू बाई फू बघितलं. एक दोन भाग चांगले वाटले तर एका भागात भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे यांची स्कीट (मराठी?) खुपच आवडली. हा भाग इथे बघता येईल.
http://www.youtube.com/watch?v=52ADZig2WTU
इथे अनधिकृत दुवे देऊ नये अशी अॅडमिनची सुचना आहे. पण हा दुवा झी मराठीच्या यु-ट्युबवरिल अधिकृत चॅनेलचा वाटतोय. नसल्यास कळवावा, काढुन टाकू.
वेळेअभावी आपण सगळेच भाग बघु शकत नाही, तेव्हा आपल्याला आवडलेल्या कार्यक्रमाची/ भागाची लिंक इथे द्याल का? वेळही वाचेल आनि उत्तम विनोदी कार्यक्रम बघता येतील. [आणि फालतू वगळता येतील ]