हिशोब

हिशोब

Submitted by रमेश पुष्पा on 9 July, 2021 - 15:11

गुरु आणि शिष्य यांच्यात असलेल्या नात्यामध्ये
कोणीही व कधीही देण्या--घेण्याचा हिशोब ठेवू नये.

देव आणि भक्त यांच्यात असलेल्या संबंधांमध्ये
कोणीही व कधीही भक्तीचा हिशोब ठेवू नये.

आई आणि मुलांमध्ये यांच्यात असलेली आपुलकीत
कोणीही व कधीही प्रेमाचा हिशोब ठेवू नये.

दोन मित्रांमध्ये त्यांच्यात असणारी मैत्रीत
कोणीही व कधीही त्यांनी एकमेकांना दिलेल्या आधाराचा हिशोब ठेवू नये.

मालक आणि कामगार यांच्यात असलेल्या व्यवहारामध्ये
कोणीही व कधीही प्रामाणिकपणाचा हिशोब ठेवू नये.

शब्दखुणा: 

हिशोब

Submitted by kokatay on 2 March, 2018 - 13:25

माझी मैत्रीण दीपा हीच लग्न आमच्या ग्रुप मध्ये सर्वात पहिल्यांदा झालं. पहिली दिवाळी साजरी करायला तिच्या सासरची सगळी मंडळी इंदूरला जमली. दीपाच्या सासुला, ती दुसऱ्या गावाची असूनहि इंदोर च्या खाद्य संस्कृती बद्दल माहिती होती, आणि तिला सराफा, छप्पन दुकान इत्यादी ठिकाणी सैर-सपाटा करायचा होता, जोडीला दिवाळी ची खरेदी पण करायची होती. दीपाने मला त्यांच्या बरोबर यायला सांगितले, मी, दीपा, आणि तिची सासु खरेदी आणि खाण्यासाठी गावात गेलो. विजय चाट ची कचोरी, जोश्यांचे दहीबडे खाऊन आम्ही इतर खरेदी करायला गेलो.

"नक्षत्र"

Submitted by poojas on 4 February, 2014 - 02:17

संपलेच केव्हा सारे निघताना कळले होते
मी तुझ्याच शब्दाखातर माघारी वळले होते..

तू म्हणता 'थांब जराशी', चुकला ह्रदयाचा ठोका
जे उरी गोठले अश्रू, तत्क्षणी वितळले होते..

अक्षम्य चुकांचा तेव्हा, मी हिशोब मागू म्हटले
जे गैर समजले गेले, थोडके निवळले होते..

होती जगण्याची बाकी, टळलेल्या काही वेळा
जे विझले होते स्वप्नी, ते दिवे उजळले होते..

वळण्याची टळली वेळ, कळली जगण्याची भाषा
वेगळे न होऊं शकले, ते रंग मिसळले होते..

तू म्हटले विसरू सारे, सुरुवात करु सार्‍याची
भरगच्च नभातून तेव्हा, नक्षत्र निखळले होते ।।

poojaS..

शब्दखुणा: 

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

Submitted by तुमचा अभिषेक on 24 January, 2013 - 13:47

रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

विषय: 
Subscribe to RSS - हिशोब