सोया चाप फ्राइड
Submitted by स्स्प on 7 February, 2018 - 23:10
बर्याचदा मायबोलीवर "सोयाबीन खावं" अशा अर्थाचं अनेकांनी लिहिलेलं वाचलं.
माझ्या एका रुममेट मुळे मलाही 'सोयामिल्क' ची चटक लागलेली मागे. त्यातुनही सोया हे तब्येती करता एकदमच 'बेश्ट' अशा समजात मी त्याआधी पासूनही वावरत होते. टोफु, कणकेमध्ये सोयाबीन्ची पूड मिसळणे, सोयामिल्क - म्हणजे एकदम 'भारी काम' असं वाटायचं.
पण पुढे हायपोथायरॉईड माणसानं 'काय खावं- काय खाऊ नये' ह्यावर माहिती मिळवताना सोयाबीन च्या वादविवादात पडले. मग सोयाच्या बाजूनं असणार्यांचही मत वाचलं आणि विरुद्ध असणार्यांचं पण.