बर्याचदा मायबोलीवर "सोयाबीन खावं" अशा अर्थाचं अनेकांनी लिहिलेलं वाचलं.
माझ्या एका रुममेट मुळे मलाही 'सोयामिल्क' ची चटक लागलेली मागे. त्यातुनही सोया हे तब्येती करता एकदमच 'बेश्ट' अशा समजात मी त्याआधी पासूनही वावरत होते. टोफु, कणकेमध्ये सोयाबीन्ची पूड मिसळणे, सोयामिल्क - म्हणजे एकदम 'भारी काम' असं वाटायचं.
पण पुढे हायपोथायरॉईड माणसानं 'काय खावं- काय खाऊ नये' ह्यावर माहिती मिळवताना सोयाबीन च्या वादविवादात पडले. मग सोयाच्या बाजूनं असणार्यांचही मत वाचलं आणि विरुद्ध असणार्यांचं पण.
जेव्हा मी दोन्ही weigh केलं - तेव्हा मी स्वतः सोया खाणार नाही अशा मताची झाले. (आधीच मी हायपोथायरॉईड आहे - बाकीचे हार्मोन्सही धुमाकुळ घालतच असतात - त्यामुळे ज्याची खात्री नाही त्याच्या वाटेला जाऊन प्रोब्लेम्स वाढवून घेऊ नयेत- असं मला वाटलं)
मला मुख्य वाटलेले मुद्दे म्हणजे
अ. थायरॉईडची गडबड
ब. इस्ट्रोजिन जास्त होतं
क. वरच्या ब ह्या कारणामुळे तर विरुद्ध असणारे म्हणतात की लहान बाळांना सोया फॉर्म्युला देणं म्हणजे लहानपणीच 'बर्थ कंट्रोल पिल' देण्यासारखं आहे!
ड. नैसर्गिक अवस्थेत सापडणारं सोया खाण्याच्या लायकीचं नसतं - त्यामुळे त्याच्यावर जी काही प्रक्रिया होते - त्यामुळे सोया स्वतःही जेनेटिकली मॉडिफाय होतं (जेनेटिकली मॉडिफाय होण्याचे स्वतःचेही अनेक तोटे असतात) + त्याला खाण्यायोग्य बनवण्यासाठीची इतर प्रोसेस.
ई. सोया खाल्यावर, काही मिनरल्स (ह्यात लोहही आलं)चं अॅब्सॉर्प्शन नीट होत नाही शरीराकडून .
विरुद्ध असणारे म्हणतात की ही बिलियन डॉलर्सची इन्डस्ट्री आहे त्यामुळे ह्याचा भरपूर प्रसार केला जातो 'हेल्दी' म्हणून.
खाली मी रेफर केलेल्यातल्या (सोयाच्या विरुद्ध असणार्या) काही लिंक्स आहेत.
http://www.healingdaily.com/detoxification-diet/soy.htm
http://www.skrewtips.com/2009/08/27/soy-good-bad/
http://www.sunherb.com/is_soy_good_for_you.htm
http://planetgreen.discovery.com/food-health/soybean-good-fact-fiction.html
http://www.soyonlineservice.co.nz/
तुमचं काय मत आहे? कुणाला डायरेक्ट अनुभव आहे का? नक्की लिहा!
ह्याच्यावर बरेच काहि लिहिता
ह्याच्यावर बरेच काहि लिहिता येइल.
पण सोयाबीन खूप चांगले खूप चांगले हे खूप काही बरोबर नाहीच आहे. बर्याचश्या उलट सुलट थिअरीज आहेत.
सोया बेस इंफंट फॉर्म्युला जर
सोया बेस इंफंट फॉर्म्युला जर खरच त्या साईटवर म्हटल्यासारखा आहे का? मी तर आज हे पहिल्यांदाच ऐकलं. माहितीत किती मुलं हा फॉर्म्युला पीत आहेत आणि प्यायली आहेत. ह्यात बरीच डॉक्टर्सची मुलंपण आहेत. काही कळत नाही बुवा. आता कोणावर किती विश्वास ठेवायचा कोण जाणे!
सोयाबिन पचायला जड असते असे
सोयाबिन पचायला जड असते असे ऐकले आहे. पण त्याचबरोबर सोया मुळे menopause चा त्रासही कमी होतो असेही ऐकले आहे. माझी माहिती फक्त ऐकीव आहे.
नानबा तुझा थायरॉईडवरचा लेख
नानबा
तुझा थायरॉईडवरचा लेख वाचला आणि हा पण... तुझे आभार मानावेत तितके कमी आहेत. खरंच विचार करायला लावणारा लेख आहे. सध्या वाचतोय...
जाणकारानी खरच यावर आपले मत
जाणकारानी खरच यावर आपले मत नोन्दवावे.
आम्ही ५ किलो गव्हात १०० किंव
आम्ही ५ किलो गव्हात १०० किंव २०० ग्रॅम सोयाबिन मिक्स करूनच दळून घेतो.
कणिक छान होते, आणि पोळ्या तुपकट, वरून तेल लावण्याची अजिबात गरज पडत नाही. मला सोयाबिनचा इतकाच काय तो उपयोग माहित आहे.
आमच्या कडे पण सेम दक्षिणा!
आमच्या कडे पण सेम दक्षिणा!
पण जाणकारांनी खरच यावर प्रकाश टाकावा.
नानबा गुड पॉइंट. जाणकारांची
नानबा गुड पॉइंट.
जाणकारांची वाट पहाते आहे.
तरीपण ( सायन्सशी दहावीत काडीमोड घेतलेली अडाणी व्यक्ति म्हणून) आहारशास्त्रीय पुस्तकं आणि सर्व शेकडो फॅडस बद्द्ल वाचून मला आता संयत चौरस आहाराचे महत्व पटलेले आहे. काहीही खूप प्रमाणात खायचे नाही आणि काहीही घटकपदार्थ वर्ज्य करायचे नाही.
वैताग आलाय राव उलट सुलट थियरीज वाचून. वेगवेगळ्या प्रकाराची तेलं इंन्डेक्स प्रमाणे मिक्सकरायला जावीत की लगेच तुपाचे गुणगान असलेला लेख येतो. करायचं काय नक्की सामान्य माणसानी या सर्व परस्परविरोधी लेखांच्या आणि परस्परविरोधी डॉक्टरांच्या मतांच्या मा-यात ?
दिखावे पे मत जाओ. अपनी अकल लगाओ
हो आम्हीही कणकेत सोयाबीन पीठ मिक्स करतो.
आणि हो जपानमध्ये भयानक प्रमाणात सोयाबीन खातात. त्याच्या पुष्ट्यर्थ वाढलेलं आयुमान, आणि अँटी एजिंग चे गुणगान पासून ते विरुद्धार्थ "वाढती इनफर्टिलिटी" इथपर्यंत सर्व लेख, रिसर्च पेपर्स वाचलेले आहेत.
आणि ते असे स्पाँजी बॉक्सेस
आणि ते असे स्पाँजी बॉक्सेस असतात ज्याची भाजी करतात, ते नक्की काय असतं?
आणि ते असे स्पाँजी बॉक्सेस
आणि ते असे स्पाँजी बॉक्सेस असतात ज्याची भाजी करतात, ते नक्की काय असतं? >> बघुन ख हो, नायतर "समुद्रातली भाजी" असायची!!
न्युट्रेला म्हणते आहेस का
न्युट्रेला म्हणते आहेस का दक्षिणा ? ते सोया नगेटस असतात.
ते चिकन सोडायच्या निश्चयाला बळकटी देतात असं ऐकुन आहे. भाजी चांगली लागते त्याची. वेज बिर्यानी वगैरे मध्ये ही टाकता येतात.
आणि हो विषय निघालाय म्हणुन.
दुधाची अॅलर्जी असणा-या मुलांना सोयामिल्कचाच पर्याय उरतो. डॉक्टरी सल्ल्यानुसार वागावे .
नानबा कुठुन कुठून महिती
नानबा कुठुन कुठून महिती काढतोस? आयोडीन युक्त मीठ वापरले असते तर ही वेळ आली नस्ती.
(No subject)
@ऑलः चर्चेत सहभागी
@ऑलः चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्स!
करायचं काय नक्की सामान्य माणसानी या सर्व परस्परविरोधी लेखांच्या आणि परस्परविरोधी डॉक्टरांच्या मतांच्या मा-यात
>> अगदी खरं.आपल्या कडे दोनच पर्याय उरतात - १. प्रयोग करून बघायचा २. weigh करायचं की काय केल्यानं आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो - आणि मग ज्यानं कमी त्रास होईल तो पर्याय निवडायचा. (म्हणून मी सोयाला दररोजच्या आहारातून कट केलं - एखादेवेळेस खाते)
काहीही खूप प्रमाणात खायचे नाही आणि काहीही घटकपदार्थ वर्ज्य करायचे नाही.
>> खरं आहे - ह्या सगळ्या नादात जगायचं विसरून जायचो नाहितर!
प्रयोग, ते खाद्यतेल वाले डॉ ओळखीचे असतील तर त्यांना विचार की पुन्हा एकदा - की अजून मत कायम आहे का आणि आम्हाला कळव ते काय म्हणतात ते..
(No subject)
१. प्रयोग करून बघायचा >> नको
१. प्रयोग करून बघायचा >> नको त्यापेक्षा literature search करुन बघितलेले बरे...
आम्ही ५ किलो गव्हात १०० किंव
आम्ही ५ किलो गव्हात १०० किंव २०० ग्रॅम सोयाबिन मिक्स करूनच दळून घेतो. >>>
दक्षिणा , हे मी असं वाचलं " आम्ही ५ किलो गव्हात १०० किलो २०० ग्रॅम सोयाबिन मिक्स करूनच दळून घेतो. "
श्री!!!
श्री!!!
सोया नगेट्स चे मार्केटिंग
सोया नगेट्स चे मार्केटिंग पहिल्यांदा व्होल्टास ने केले होते. त्यावेळी ते चंक स्वरुपातच होते. जाहिरातीत मटणाची क्वांटिटी वाढवणारे काहीतरी जादुई प्रकरण, असे वर्णन केलेले असायचे. (ते सोयाबीनपासून केलेले आहे, याचा उल्लेख नसायचा ) तो काळ सोयाबीनच्या जादूचा होता. कमलाबाई ओगल्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. फिल्म्स डिव्हीजनचा एक माहीतीपट त्यावेळी दूरदर्शनवर वारंवार दाखवत असत. व्होल्टासनेच पुढे ते खिमा स्वरुपात बाजारात आणले. सोयाबीनचे उत्पादन भारतात होऊ लागल्यावर, वाण्याकडे पण ते कडधान्य म्हणून मिळू लागले.
पण सोयाबीनला येणारा वास आणि नूसते खाल्यास पचनास होणारा त्रास म्हणून ते तितके लोकप्रिय झाले नाही. (गव्हात ते मिसळून दळायची पद्धत त्याच काळातली ) सोयाबीन मधला हा नेमका घटक वगळून सोया चंक्स केलेले असतात. व्होल्टास ने त्याचे मार्केटींग बंद केले पण ते सुट्या स्वरुपात वाण्याकडे मिळू लागले. (खरे तर असा न पचणारा घटक चण्याच्या डाळीत पण असतो. गुढीपाडव्याला आंबाडाळ खाल्यावर पोट जड झाल्याचा अनुभव आपण घेतलाच असेल )
सोया मिल्कचे व्यापारी उत्पादन पहिल्यांदा टाटा ऑईल मिल्स ने केले होते, पण त्यामूळे लोकाना त्रास होतो, हे बघून ते बंद करण्यात आले.
टोफू मात्र खूप नंतर आले बाजारात. ( त्याचे अनेक प्रकार कसे करतात याची एक फिल्म नॅशनल जिऑग्राफिक वर दाखवतात, ती बघून तूम्ही नक्कीच तो खाणे सोडाल !!! )
शेवटी, त्यातल्या प्रथिनांचे प्रमाण कागदोपत्री जरी दिसत असले, तरी जिभेला तो आवडत नाही हेच खरे.
नानबा हो बहुतेक मी त्या सोया
नानबा हो बहुतेक मी त्या सोया नगेटस बद्दलच बोलत असेन. मला आवडते त्याची भाजी. एकदा माझ्या घरी शाळेत असताना खाल्ली होती, नंतर ऑफिसच्या कँन्टीनमध्ये. पण बर्याच लोकांना ते नगेटस आवडत नाहीत बहुधा..
त्याचा एक फायदा आहे की कोणत्याही भाजीत मिक्स करता येतात...
>>म्हणून स्त्रियांनी चाळीशीनंतर आहारात सोयाबीन व सोयाबीन तेल ठेवावे, असे सांगितले जाते. >> थोडं विषयांतर होईल, पण आम्ही आत्तासुद्धा (४०च्या बरंच आधी :फिदी:) कोणतंही एकच तेल नाही वापरत. सोयाबिन तेल हे अजिबात वेगळं लागत नाही... आजकाल बाजारात तर वेगवेगळ्या कंपन्या तेल उत्पादन करतात. मी नेहमी कॉम्बिनेशन घेते, म्हणजे महिन्याला जर २ किलो तेल लागत असेल तर या महिन्यात सनफ्लॉवर आणि सोया, पुढच्या महिन्यात शेंगदाणा, करडई... खरंतर मी कुठे तरी वाचलं होतं की सगळी तेलं मिक्स करून वापरणं जास्ती चांगलं असतं.
करडईचं तेल ही हृदयाला चांगलं असतं... पण ते नीट तापवून मगंच फोडणी करावी लागते, अन्यथा त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो.
विषयांतरासाठी माफ करा.... बाकी सोयाबिन महिमा... सुरू होऊ दे...
(No subject)
>>कोणतंही एकच तेल नाही
>>कोणतंही एकच तेल नाही वापरत
>>पंधरवड्याला वेगळे तेल आणून खाणे नेहमीच हितावह
हे थोड अजून स्पष्ट करणार का? म्हण्जे कश्याप्रकारे फायद्याचे ते? कारण मला मागे एका आयुर्वेदिक डॉ ने सांगितले होते की जे तेल तुम्ही लहानपणापासून वापरत असाल तेच नेहेमी वापरावे, सारखा बदल करू नये, म्हणून विचारले.
कालच डॉक्टरकडे गेले होते- हाय
कालच डॉक्टरकडे गेले होते- हाय प्रोटीनसाठी सोयाबीन खा असं आवर्जून सांगितले तिने मुलाला.. तिला गव्हाच्या दळणात सोयाबीन मिसळत असल्याचे सांगितले- त्यावर ती म्हणाली, सोयाबीन गरम झाले की त्यातले सगळे सत्त्व निघून जाते- पोळी, फुलका ह्यांना थेट वाफ लागते- त्यामुळे गव्हात सोयाबीन घाला वा घालू नका, फरक नाही पडत फारसा
सोया चन्क्स मात्र तिने रेकमेन्ड केले. टोफूही.
वर रैनाने म्हटलेय त्याला अनुमोदन- कोणत्याच गोष्टीचा अतिरेक नको वाटतो मलाही. अधूनमधून सगळं प्रमाणात खावं.
सोया स्टीक्स म्हणुन एक प्रकार
सोया स्टीक्स म्हणुन एक प्रकार मिळतो,, लहान मुले आवडीने खातात.
डॉ. अभय बंगानी तीन प्रकरची तेले मिसळुन ती जेवणात वापरावी असं सांगितलय. आता आठवत नाहिये, वाचुन टाकेन किंवा कोणाच्या लक्षात असेल तर लिहा.
सोया चंक्स चांगले
सोया चंक्स चांगले लागतात,
नुसत्या ही छान लागतात .
प्रयोग ला अनुमोदन ,माझ्या ही वाचनात आलय, की सोयाबीनच्या आहारात योग्यवापराने मेनॉपॉज चा त्रास बरच अंशी कमी होतो. शेवटी कुठल्या ही गोष्टीचा अतिरेकी वापर अयोग्यच. अजुन असही वाचनात आलय की गव्हात सोयाबीन वापर्ल्याने कलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते.
@पूनम सोयाचंक्स प्रमाणे गव्हाच्या लाह्या पण मिळतात त्या पण लाहान मुलांना प्रोटीन साठी चांगल्या, दुधात घालून तर उत्तमच
(No subject)
सोयबीन हे पुरुष वन्धत्वचा
सोयबीन हे पुरुष वन्धत्वचा १० कारणा पैकी एक आहे !!!
मनापासून धन्यवाद प्रयोग. यावर
मनापासून धन्यवाद प्रयोग.
यावर जरूर विचार करेन आता. तेलाचा वापर जरी कमी असला तरी मी शेंगदाणा तेलच नेहमी वापरते डॉ ने सांगितल्यापासून.
नानबा, विषयांतराबद्दल क्षमस्व.
मी सध्या रोस्टेड सोयाबीन
मी सध्या रोस्टेड सोयाबीन आणलेत बिग बझार मधुन खारे आणि तिखट. आणि ते नुसते खातो खारे तिखट दाणे खातो तसे. पण त्याने त्रास काही होत नाहीये. टोफुची भाजी मी खाल्ली आहे ती चांगली लागत होती. सोयाबीन नगेटसची भाजी आमच्याकडे बनते चांगली लागते.
गुड्स!!! माझा एक मित्र, जो
गुड्स!!!
माझा एक मित्र, जो नॉन वेज खात नाही, तो जपान मधे आल्यावर तोफु वर तुटुन पडायचा..
मग त्याला कॉस्टको दुकान सापडलं जिथं स्वस्तात मिळतात गोष्टी.
त्यानं तिथुन ५-६ लिटर सॉय मिल्क आणलं...
दरम्यान तो भारतात जाऊन आला.
त्याच्या लग्नाचं चालु होतं... त्यानिमित्त शिक्षण मिळालं वाटतं त्याला, आल्यापासुन तोफु बंद!
तो देशात परत गेला आता ... पण त्याचं सॉय मिल्क अजुन आमच्या घरातच आहे...
आम्हाला ते टाकवत नाही आणि पिववत पण नाही...
पण जर खरंच ते इतकं वाईट असेल तर जपानमधे छोटी पोरं दिसलीच नसती...
कारण इथे रोज, न चुकता तोफु खातात...
सोयाबीन स्नॅक्स असतात.. "सॉय जॉय"
आणि इथे दोन-दोन, तीन-तीन पोरं असणं फारही रेअर नाही आहे..
समजत नाही नक्की काय खरं...
Pages