साहित्य :
सोया चॅप - 6 (300 ग्रा)
• दही - 2 चमचे
• मीठ 1छोटी चम्मची किंवा चवीनुसार
• धणे पूड - 1 चमचे
• गरम मसाला - दिड चमचे
• आले - ½ चमचे
• मैदा - दिड कप (50 ग्राम)
• सोया वडी - 1 कप (100 ग्रॅम)
• लाल मिरची पूड - दिड चमचे
मिरची फ्लेक्स - 1/2 चमचे
• काळी मिरी - ¼ चमचे (लालसर)
• हळद पावडर - ¼ चमचे
• अॉरिगेनो - ½ चमचे
• तेल - तळण्याचे साठी
1.. सोया चॉप्स वर चाकू ने २ ते ३ कट द्या
2. सोया वडी ची जाडसर पावडर करून घ्या
3) ½ कप मैदा मधेय पाणी टाकून घोळ बनवून घ्या
4) एका मोठ्या वाडग्यात २ टेबलस्पून दही ½ छोटी चम्मची अद्रक पेस्ट ½ छोटी चमची गरम मसाला , १ छोटी चमची धने पावडर , ½ छोटी चमची लाल मिरची पावडर ,¼ छोटी चमची हळद, ½ छोटी चमची मीठ टाकून सगळे व्यस्तीत मिक्स करून घ्या सोया चॉप ला लावलंय मिश्रण तयार झाले .
5) सोया चॉप ला मिश्रणात सर्व बाजूने चांगले घोळवून घ्या.व २० मिनिटे ठेवा जेणेकरून ते मसाल्यात मूरतील.
6 मैद्या मधेय ½ छोटी चमची चिली फ्लेक्स ,½ छोटी चमची काली मिरी पावडर ,अॉरिगेनो आणि ½ छोटी चमची मीठ टाकून घोळ तयार करून घ्या.
7. एकेक सोया चॉप घेऊन मैद्याच्या घोळ मधेय बुडवा.त्यानंतर सोया वडीच्या जाडसर पावडर मधेय घोळवून तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. साधारणपणे ४ ते ५ मिनटे लागतील अश्या प्रकारे सोया चॉप तयार आहेत . कोणतीपण आवडती चटणी किंवा टोमॅटो सौस सोबत खाऊ शकतो .
मस्त वाटतेय.
मस्त वाटतेय.
धन्यवाद देवकी ....पण पाककृती
धन्यवाद देवकी ....पण पाककृती व्यवस्तीथ लिहिता येत नाही आहे
हे कुठेतरी वाचलंय आधी.
हे कुठेतरी वाचलंय आधी.
सोया चाप म्हणजे काय? फोटो द्या जमलं तर.
(No subject)
(No subject)
रेसिपी छान वाटत आहे.
रेसिपी छान वाटत आहे.
लागणारे जिन्नस साहित्य मधे 'सोया चॉप्स' आहेत जे आपणच बनवायचे आहेत ना? त्यासाठी तुमच्या आधीच्या लेखाची लिंक ह्या लेखात दिलीत तर ह्या रेसिपी चे घटक तयार ठेवायला सोपं जाईल लोकांना असं वाटतय.
आजकाल सोया चॉप रेडिमेड पण
आजकाल सोया चॉप रेडिमेड पण मिळतात
सोया चॉप कसे बनवावेत
सोया चॉप कसे बनवावेत
लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
100 ग्राम सोयाबीन
100 ग्राम मैदा
50 ग्राम सोया न्यूट्री किंवा सोयाबीन वड्या
१० ते १२ आइस्क्रीम च्या लाकडी काड्या
१ छोटा चमचा मीठ
क्रमवार पाककृती:
1. प्रथम सोयाबीन ची वडी धुवून घ्या.नंतर एका मोठ्या वाडयात रात्रीसाठी सोयाबीन भिजवून ठेवा. 10 ते 12 तास सोयाबीन भिजवावे.सोयाबीनचे भिजवून मऊ होतात. त्यात थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये मिक्सिंग करून पेस्ट बनवा. मोठ्या भांड्यात पेस्ट काढा.सोयाबीन न्यूट् किंवा वडी गरम पाण्यात उकळा.जशी वडी फुलेल बाहेर काढून पाणी निथळून घ्या.त्यानंतर मिक्सर मधेय पेस्ट करून घ्या.आधी बनवलेली सोया ची वडी ची पेस्ट आणि आताची पेस्ट एकत्र करून घ्या. त्यावर मैदा आणि मीठ टाकून कणकेप्रमाणे मळून घ्या
2. हि कणिक लिबलिबीत च असेल, ह्या कणकेचा गोळा घेऊन कोरडा मैदा लावून छोटी पोळी लाटून घ्या. नंतर चाकू ने एक इंच रुंद पट्ट्यामध्ये कट करा.आइस्क्रीम वाली स्टिक (icecream sticks) ला चारी हि बाजूने ह्या पट्ट्या दाबून लावा. अश्या तर्हेने सर्व पट्ट्या तयार होतील.
3. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा . जेव्हा उकळी येईल तेव्हा या सर्व सोयाबीन पट्ट्या त्यात टाका. थोडा वेळ उकळ्यानंतर त्या पाण्यावर तरंगतील, त्या तरंगला म्हणजे शिजल्या आहेत. पट्ट्या पाण्याच्या बाहेर काढून २ मिनिटे थंड पाण्यात ठेवावे. त्यानंतर त्यांना फ्रिज मधेय ठेवा .हव्या तशा वापरू शकतो
सोया चाप म्हणजे काय? फोटो
सोया चाप म्हणजे काय? फोटो द्या जमलं तर.
<<
डिस्क्लेमरः अतिरेकी व्हेजिटेरियन्स नी वाचू नये:
.
.
.
.
मटणाची भाजी आणताना वेगवेगळे "कट्स" आणतात. सीना, तंगडी, गर्दन, पाया वगैरे. प्रत्येक प्राण्याचे कट्स / नांवे वेगवेगळी असतात. पैकी (मटन) चॉप्स म्हणजे बरगडी सकटचे मांस. (जिज्ञासूंनी लिंक टिचकवून चित्र पहावे) त्यात चांगल्यापैकी सॉफ्ट व चविष्ट भाग असतो. पण मधे बरगडीचे चपटे हाड असते.
आता आम्हाला व्हेज डिशच पाहिजे. पण ती अगदी नॉनव्हेजसारखी लागली/दिसलीही पाहिजे, म्हणून मटनाला पर्याय सोया चंक्स, अन बरगडीच्या हाडाला पर्याय कुल्फीची काडी घालून हे "चॉप्स" बनवले आहेत.
एवढा कुटाणा करण्यापेक्षा सरळ बोकड्/बोलाईचे चॉप्स आणावेत, नाहीतर व्हेजच पाहिजे तर सोयाबीनची भजी बनवावीत. सोया 'चॉप्स' पनीर 'भुर्जी' असल्या नावाची सरोगेट नॉनव्हेज हौस कशाला करावी म्हणतो मी..
आरारा, सहमत. एवढा कुटाणा तर
आरारा, सहमत. एवढा कुटाणा तर मटण चॉप्सना पण पडत नाही. बोलाई म्हणजे कुठला प्राणी?
रच्याकने, इथेच माबोवर एक अत्युत्कृष्ट मटण चॉप रेसीपी आहे. मी करून पाहिलेत या रेसिपीने. अमेझिंग लागतात.
शीतल, वाईट वाटून घेऊ नका, तुमची रेसिपी छान आहे. पण खटपट खूप आहे. लिबलिबित पीठ लाटून, कापून, गुंडाळणे अति कठीण आहे.
आ.रा.रा. आणि साधना , कितीतरी
आ.रा.रा. आणि साधना , कितीतरी लोकांनां तब्येतीच्या कारणाने/हेल्थ कन्सर्न्स मुळे किंवा मग लाईफस्टाईल चॉईस (व्हिगन , प्लान्ट-फूड बेस्ड डायट) इत्यादीमुळे मटण किंवा इतर प्राणीजन्य चॉप्स खाता येत नसतील.
पण कितीही झालं तरी करणार्याची आणि खाणार्याची हौस असेल तर ही रेसिपी वापरता येईल की.
पण कितीही झालं तरी करणार्
पण कितीही झालं तरी करणार्याची आणि खाणार्याची हौस असेल तर ही रेसिपी वापरता येईल की.>>>>>
हो, बरोबर. रेसीपी खूप खटपतीची आहे पण खस्ता काढायची तयारी असेल तर वापरता येईल. मी माझ्या दृष्टिकोनातून विचार करून प्रतिसाद दिला. सोया तसाही मला त्याच्या उग्र वासामुळे आवडत नाही.
आमच्याकडे डेअरीमध्ये रेडीमेड
आमच्याकडे डेअरीमध्ये रेडीमेड सोया चाप्स मिळतात. बरेचदा मी लोकांना घेताना बघितलेय. घरी आणून मॅरिनेट करून हवी ती डिश बनवा.
इथे लोक चिकन लेग पिस ला सोया चापने रिप्लेस करतात.
नवरात्रात सोया चाप्स ना खूप मागणी असते. एका ठिकाणी मेन्यूमध्ये व्हेज चिकन तंगडी कबाब वाचून मी गोंधळात पडले होते. त्या मेन्यूत तंदूरी स्टार्टरमधल्या सगळ्या नॉन व्हेज डिशेस मध्ये सोया चाप वापरून व्हेज केल्या होत्या.
व्हेज बटर चिकन पण होते.
एका ढाब्यावर एकदा खाल्ले होते
एका ढाब्यावर एकदा खाल्ले होते तंदूरी सोया चाप. बरे लागले. लेकाला लईच आवडले. मग त्याला आवडले म्हणून तिथून परत एकदा मागवले. दुसऱ्या वेळी त्यांनी ग्रेव्हीत घालून दिले. कोणीच खाल्ले नाही. आता तर लेकपण नाव काढत नाही. पण शाळेत खातो मित्रांच्या डब्यात.
मला सोया चाप आणून त्यांना मॅरिनेट करण्यापेक्षा चिकन/ मटण मॅरिनेट करणे सोप्पे वाटते.
घरातल्या प्युअर व्हेज मेंबरांना सोया चाप आवडत नाहीत. टेक्श्चर कसंतरी वाटते म्हणे.
आरारा
आरारा
सोया 'चॉप्स' पनीर 'भुर्जी' असल्या नावाची सरोगेट नॉनव्हेज हौस कशाला करावी म्हणतो मी..>>>+१
>>आता आम्हाला व्हेज डिशच
>>आता आम्हाला व्हेज डिशच पाहिजे. पण ती अगदी नॉनव्हेजसारखी लागली/दिसलीही पाहिजे, म्हणून मटनाला पर्याय सोया चंक्स, अन बरगडीच्या हाडाला पर्याय कुल्फीची काडी घालून हे "चॉप्स" बनवले आहेत.>> असं कुणा शाकाहार्याचं असतं कोण जाणे? आमच्या घरातले कट्टर शाकाहारी फणस चिरल्यावर चिकनसारखा दिसतो म्हटलं तर फणस खाणंही सोडतील कदाचित.
सोया चंक्स वगैरे अजिबात आवडत नाहीत. अगदी चामट, रबरी लागतात. एखाद दोन वेळा न्युट्रीलाच्या चंक्सची भाजी करुन सगळी टाकून दिली आहे. तेव्हा नो नो..
अगदी चामट, रबरी लागतात. एखाद
अगदी चामट, रबरी लागतात. एखाद दोन वेळा न्युट्रीलाच्या चंक्सची भाजी करुन सगळी टाकून दिली आहे. तेव्हा नो नो..>>>अगदी अगदी. मला वाटायचे कि मलाच भाजी नीट बनवता येत नाही.
बोलाई म्हणजे कुठला प्राणी?
बोलाई म्हणजे कुठला प्राणी?
<<
मेंढी.
बोल्हाई म्हणजे मेंढी? मी असं
बोल्हाई म्हणजे मेंढी? मी असं ऐकलं होतं की बोल्हाई देवीचे भक्त बोकडाचं मांस खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी मेंढीचं मांस विकतात.
मी मटण खात नाही, पण दुकानांवर ' येथे बोल्हाईचे मटण मिळेल ' ही पाटी खूप ठिकाणी वाचल्यावर एका पक्क्या मांसाहारी काकांना विचारलं होतं.
Ok.
Ok.
आम्ही एल्फिन्स्टनला राहायचो तिथे जरीमरीचे देऊळ होते. तिच्या नावाने मेंढि कापायचे, प्रत्येक घरात पाव किलोभर प्रसाद मिळायचा, त्याची आठवण झाली. आता कापतात का ते माहीत नाही.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/Gooddot/
इतकी खटपट करण्या ऐवजी गुड डॉट वेज मीट नावाचे prodct मिळते ते विकत घ्यावे.
सगळ्या प्रतिक्रिया
सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर असा वाटतेय उगाच रेसिपी पोस्ट केली ......
शीतल,
शीतल,
>>>>>
शीतल, वाईट वाटून घेऊ नका, तुमची रेसिपी छान आहे. पण खटपट खूप आहे. लिबलिबित पीठ लाटून, कापून, गुंडाळणे अति कठीण आहे.
Submitted by साधना on 9 February, 2018 - 22:14
>>>>>
बऱ्याच लोकांना असेच वाटत असेल,
तुम्ही प्रतिसाद बारकाईने पाहिलेत तर जाणवेल ,लोक त्यात होणाऱ्या खटपतीबद्दल किंवा सोपे पर्यायी प्रोडक्त वापरण्या बद्दल बोलत आहेत.
ती रेसिपी वरची टीका नाहीये.
नाउमेद न होता पुढची रेसिपी टाका बघू
सिम्बा +१
सिम्बा +१
अजिबात वाईट वाटून घेऊ नका. रेसिपी चांगली आहे.
तुमच्या सुगरणपणास नावे
तुमच्या सुगरणपणास नावे ठेवण्याचा उद्देश नाही. गैरसमज नसावा. (अन्यथा शेजवान चटनीवर लिहिलेला प्रतिसाद पोस्ट न करता मी डिलीट केला नसता) मुळात सोया चॉप्स हे प्रकरण तुम्ही इन्व्हेण्ट केलेले नसावे असा माझा कयास आहे.
माझा प्रश्न असा आहे, कि यात कुल्फीच्या काडीची गरज काय? चवीत भर वगैरे काही भाग आहे का?
उगाच मांसाहारी "दिसावे" म्हणून हे प्रकार करण्यात काय हाशील? वरतून हे प्रकरण त्या काडीसकट तळायचे आहे.
विना काडीचे तळले तर त्याला भजी म्हणावे लागेल इतकीच अडचण दिसते.
माझा प्रश्न असा आहे, कि यात
माझा प्रश्न असा आहे, कि यात कुल्फीच्या काडीची गरज काय? चवीत भर वगैरे काही भाग आहे का?>> बोन रिप्लेसमेन्ट आहे ती, मुळातल्या मटण चॉप्स ला असतिल ना .
चांगलं दिसायला. इमिटेशनला
चांगलं दिसायला. इमिटेशनला घातल्या असतील हो.
शंकरपाळे सुरीने कापले वि. त्या नक्षीदार कातण्याने कापले, किंवा करंजीची बॉर्डर नक्षीदार मुरडली नाही किंवा मोदकाला नाकं न पाडता स्वयंभू गणपती सारखे वाकडे तिकडे गोल वळले तर चवीत ढिम्म फरक पडत नाही. पण सुगरणपणा, नाव घेतलं की पदार्थाचे दृश्य स्वरूप जसं हवं तसं असणे इ. साठी केलं असेल.
कुल्फी देतो सांगून त्या कुल्फीचे चौकोनी तुकडे पाडून कोणी दिले (हल्ली ते ही देतात म्हणा) तर ती कुल्फी सेम चवीची असली तरी हातातही धराविशी वाटत नाही तसच.
>> स्वयंभू गणपती सारखे वाकडे
>> स्वयंभू गणपती सारखे वाकडे तिकडे गोल वळले
>> चवीत ढिम्म फरक पडत नाही
असहमत.
काडीला लावल्यावर जास्त भाग
काडीला लावल्यावर जास्त भाग तेलाला एक्सपोज झाल्याने जास्त ठिकाणी क्रिस्पी होत असावेत. सो नुसता भजी करताना तळलेला गोळा लगदा लागण्यापेक्षा चवीतही फरक पडत असावा.
काडीला लावल्यावर जास्त भाग
काडीला लावल्यावर जास्त भाग तेलाला एक्सपोज झाल्याने जास्त ठिकाणी क्रिस्पी होत असावेत. सो नुसता भजी करताना तळलेला गोळा लगदा लागण्यापेक्षा चवीतही फरक पडत असावा.>>>>>
बरोबर.
Pages