सोया चाप फ्राइड

Submitted by स्स्प on 7 February, 2018 - 23:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य :

सोया चॅप - 6 (300 ग्रा)
• दही - 2 चमचे
• मीठ 1छोटी चम्मची किंवा चवीनुसार
• धणे पूड - 1 चमचे
• गरम मसाला - दिड चमचे
• आले - ½ चमचे
• मैदा - दिड कप (50 ग्राम)
• सोया वडी - 1 कप (100 ग्रॅम)
• लाल मिरची पूड - दिड चमचे
मिरची फ्लेक्स - 1/2 चमचे
• काळी मिरी - ¼ चमचे (लालसर)
• हळद पावडर - ¼ चमचे
• अॉरिगेनो - ½ चमचे
• तेल - तळण्याचे साठी

क्रमवार पाककृती: 

1.. सोया चॉप्स वर चाकू ने २ ते ३ कट द्या

2. सोया वडी ची जाडसर पावडर करून घ्या
3) ½ कप मैदा मधेय पाणी टाकून घोळ बनवून घ्या

4) एका मोठ्या वाडग्यात २ टेबलस्पून दही ½ छोटी चम्मची अद्रक पेस्ट ½ छोटी चमची गरम मसाला , १ छोटी चमची धने पावडर , ½ छोटी चमची लाल मिरची पावडर ,¼ छोटी चमची हळद, ½ छोटी चमची मीठ टाकून सगळे व्यस्तीत मिक्स करून घ्या सोया चॉप ला लावलंय मिश्रण तयार झाले .

5) सोया चॉप ला मिश्रणात सर्व बाजूने चांगले घोळवून घ्या.व २० मिनिटे ठेवा जेणेकरून ते मसाल्यात मूरतील.

6 मैद्या मधेय ½ छोटी चमची चिली फ्लेक्स ,½ छोटी चमची काली मिरी पावडर ,अॉरिगेनो आणि ½ छोटी चमची मीठ टाकून घोळ तयार करून घ्या.

7. एकेक सोया चॉप घेऊन मैद्याच्या घोळ मधेय बुडवा.त्यानंतर सोया वडीच्या जाडसर पावडर मधेय घोळवून तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. साधारणपणे ४ ते ५ मिनटे लागतील अश्या प्रकारे सोया चॉप तयार आहेत . कोणतीपण आवडती चटणी किंवा टोमॅटो सौस सोबत खाऊ शकतो .

वाढणी/प्रमाण: 
अन्दजे २ ते ३
माहितीचा स्रोत: 
माझी मावशी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात हिंजवडीमध्ये मेझा ९ च्या समोर वाह जी वाह म्हणून एक रेस्टॉरंट होते. तिथे सगळ्या मांसाहारी पदार्थांचे सोयाबीन रिप्लेसमेंट करुन वेज पदार्थ मिळायचे. भारी लागायचे.

Pages