थालीपीठाची भाजणी
थालीपीठाच्या भाजणीचे साहित्य : थालीपीठाच्या भाजणी पीठाचे साहित्य व विविध धान्यांचे प्रमाण : ज्वारी १ किलो, बाजरी १-१/२किलो, मुग डाळ २०० ग्रॅम,उडीद डाळ २०० ग्रॅम, चणाडाळ ३०० ग्रॅम, अख्खी चवळी २०० ग्रॅम, मटकी२०० ग्रॅम, तांदुळ ३०० ग्रॅम, जाड पोहे ३०० ग्रॅम , साबुदाणा १०० ग्रॅम , गहु २५० ग्रॅम ,साल काढलेले सोयाबिन २०० ग्रॅम. धने १२५ ग्रॅम. जिरे ५० ग्रॅम. व १च.चमचा मिरीचे दाणे.
भाजणीची कृती : भाजणीचे वरील सर्व घटक पदार्थ वेगवेगळे स्वतंत्रपणे मंद आचेवर खरपुस भाजून घ्यावेत व गार झाल्यावर एकत्र करुन बारीक दळून आणावेत .(आमच्याकडे ‘घरघंटी’ –घरातच गिरणी आहे त्यामुळे भेसळ होऊच शकत नाही,सर्व पिठे ताजी व स्वच्छ मिळतात)
विशेष सूचना : कोणतेही घटक पदार्थ एकत्र करून भाजू नयेत, याचे कारण म्हणजे प्रत्येक घटकाला भाजण्यास लागणारा वेळ वेगवेगळा आहे, त्यामुळे ते एकत्र करून भाजल्यास त्यातील एखादा घटक जळणे किंवा एखादा घटक भाजातांना कच्चा राहणे अथवा चिकट होण्याची शक्यता असते,त्यामुळे भाजणी बिघडू शकते.
थालीपीठाची भाजणी
Submitted by pltambe@yahoo.co.in on 20 April, 2014 - 22:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा