शीर्षकावरुन असे वाटू शकेल कुणालाही की एकतर मी वाकून नमस्कार करण्याचे समर्थन करतोय वा वाकुन नमस्कारास जाच समजणार्यान्ची खिल्ली उडविणारे किन्वा जाचक प्रथान्ना विरोध करणारे!
पण यातले मला काहीच करायचे नाहीये.
माझ्या नजरेसमोर वेगळीच बाब येत्ये. ज्यान्ना वाकून नमस्कार करणे हा जाच वाटतो, तर तो का वाटत असावा, याची माझ्या नजरेतून (अन अर्थातच एकान्गी) कारणमिमान्सा सुरवातीस करतो. मग त्यानन्तर विषयानुरुप ज्यान्नीत्यान्नी त्यान्चि मते मान्डली तरी चालतील! असो
कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने
अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं
पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली
सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता
येणार्या या गावाला पर्याय नाही.
समाधिननेन समस्तवासना ग्रन्थेर्विनाशोऽखिलकर्मनाशः |
अन्तर्बहि: सर्वत एव सर्वदा स्वरूपविस्फूर्तिरयत्नतः स्यात् || विवेक चूडामणि ३६४
या निर्विकल्प समाधीच्या योगाने, अंतःकरणांतील सर्व वासनारूप ग्रंथींचा नाश होतो आणि त्यापासून निर्माण होणार्या कर्माचा पूर्ण क्षय होतो. असे झाले म्हणजे, आत आणि बाहेर, दोन्ही प्रसंगी स्व-स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यावाचून सहजपणे होऊ लागते.
॥ चतुर्थः कैवल्यपादः ॥
चवथा मोक्ष पाद सुरू होत आहे.
१. जन्मौषधिमन्त्रतपःसमाधिजाः सिद्धयः ।
विशिष्ट जन्म, दिव्य औषधी, भिन्न देवतांचे मंत्र, तपःसामर्थ्य आणि समाधी अशा पाचांपासून सिद्धी प्रकट होत असतात.
अनंतशक्तिरैश्वर्यं निष्यन्दाश्चाणिमादय: ।
स्वस्येश्वरत्वे संसिद्धे सिध्यन्ति स्वयमेव हि ॥
पुष्पमानया गन्धो विनेच्छामनुभूतये ।
पूर्णाहम्भावयुक्तेन परिच्छिन्ना विभूतय ॥ - मानसोल्लास:
पुष्प आणत असतांना त्यातील गंध यदृच्छया अनुभूतीला येतो तद्वत्, ज्याचा अहंभाव पूर्णत: नष्ट झालेला आहे अशा, स्वत:मधील ईश्वरत्वाने मोक्ष प्राप्त झालेल्या योग्याला अनंत शक्ती आणि ऐश्वर्य यांचा परिणाम असणार्या अणिमा इत्यादी सिद्धी स्वत:हूनच प्राप्त होतात.
॥ तृतीयो विभूतिपादः ॥
तिसरा चतकोर. विभूतीपाद. विभूती म्हणजे सिद्धी.
मायबोली डॉट कॉम च्या २००६ च्या दिवाळीअंकात आशिष महाबळ ह्यांनी लिहीलेल्या खालील लेखात योगाभ्यासाच्या पार्श्वभूमी विषयी चर्चा केलेली आहे. लेख वाचण्यासारखा आहे. भारतीय तत्वचिंतनाचा वेध : http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118185.html?1161387673 वेद ते वेड? पतंजलींच्या महाभाष्याची प्रस्तावना मराठीत आणण्याचा प्रयत्न मिस्टर उपक्रम डॉट ऑर्ग वर धनंजय यांनी केलेला आहे. ती मालिकाही वाचनीय आहे. http://mr.upakram.org/node/747 तिचे शीर्षक आहे: व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण. आता योगसूत्रांकडे वळू या.
॥ द्वितीयः साधनपादः ॥
दुसरा चतकोर. साधनपाद.
पतंजली ऋषींनी मनोकायिक मनुष्यव्यवहारांचा सखोल अभ्यास करून, सर्वप्राणीमात्रांच्या हितास पोषक मानवी व्यवहार कोणता (मनुष्याने कसे वागावे) हे सूत्रबद्ध रीतीने वर्णन केलेले आहे. तीच १९५ सूत्रे पातंजल योगसूत्रे म्हणून ओळखली जातात. ती चार भागांत विभागलेली आहेत. (पाद: म्हणजे पाव हिस्सा. प्राण्यास चार पाय अथवा पाद असतात. त्यापैकी एक म्हणजे पाद. पाव हिस्सा. अशाचप्रकारे शफ म्हणजे आठवा हिस्सा असतो.) समाधीपाद(५१), साधनपाद(५५), विभुतीपाद(५५) आणि कैवल्यपाद(३४). ज्या काळात हे घडून आले, तेव्हा ज्ञानसंकलन आणि प्रसाराचे काम पारंपारिक मौखिक पाठांतराद्वारेच होत असे.
हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.
जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.