तोच चंद्रमा नभात
काल पहाटे सहज उठलो असता खिडकीबाहेर लक्ष गेलं आणि हा फोटो काढायची हुक्की आली.
नुकत्याच घेतलेल्या Canon SX30 ने सहजच केलेला एक प्रयोग.....
काल पहाटे सहज उठलो असता खिडकीबाहेर लक्ष गेलं आणि हा फोटो काढायची हुक्की आली.
नुकत्याच घेतलेल्या Canon SX30 ने सहजच केलेला एक प्रयोग.....
आता अंधार पडेल
मग चंद्र येईल साथीला ,
मी हरवून जाईन ,
त्याच्याशी गप्पा मारेन
त्याला विचारेन तुझ्याबद्दल ..
तो म्हणेल -आहे बरी..!
मी म्हणेन " सांग न हकीकत खरी .."
तो डिवचेल मला ,
म्हणेल - हातात मोबाइल समोर कंप्यूटर ...
sms पाठव ई-मेल कर .....
"पाठवला असत्ता रे ...
पण अशी मजा सेंड मधे नाही
प्रेमिकेचा क्षेम विचारायला
तुझ्यासारखा friend नाही ..."
मग खुलेले तोही ..
सांगेल,
तू येतेस आजही ..
त्या खिडकीशी ..
त्याला बघायला ..
"बर ,अजुन ?"
सांगेल की,
तुज्या तारकांचा हिशोब जास्त आहे
"कसा ?"
म्हणेल
उशिरा लागतो डोळा तिचा,
जाग ही लवकरच येते तुझ्या पेक्षा
मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..
'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..
'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'
चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..
'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'
खालील कथेतील सर्व पात्रे आणि घटना अंशतः काल्पनिक आहेत तरी ही पात्रे वा घटना आपल्यास आढळल्यास... आश्चर्य कसले? घरोघरी.............!
-----------------------------------------------------------------------------------
आज मी हा ५ भागांचा माहितीपट पाहिला. खाली संकेतस्थळ देत आहे. पाच भाग पाहिल्यानंतर मलाही हेच वाटायला लागले आहे की चंद्रावर अमेरिकन मनुष्य गेलाच नाही. तुम्हाला काय वाटतं ते लिहा.