November 07, 2018
घरातून ट्रेकिंग ला सतत विरोध होत असल्याने जास्त ट्रेक होत नाहीत. त्यात मी एकुलता एक, मला काही होऊ नये हि घरच्यांची काळजी. ती काळजी रास्तच आहे म्हणा. पण मी कसला ऐकतोय दोन तीन महिन्यातून एखादा ट्रेक तरी मी करणारच. सह्याद्री ची ओढच म्हणा कि ज्यामुळे मला सारखं त्याच्याकडे जावंसं वाटतं. त्याच्या कुशीत एक झोप काढल्याशिवाय कुठल्या सह्याद्री वेड्याला रिलॅक्स वाटणारच नाही.
वीस एक दिवसाची भांडून घेतलेली सुट्टी, अजेंड्यावर असंख्य गोष्टी..मित्र, नातेवाईक, लग्न, सण ई. पण सर्वात पहिली नोंद केली होती ती जुन्या मित्राला भेटण्याची आणि तब्बल चार वर्षानंतर सह्याद्रीची प्रत्येक्ष भेट झाली.
हातात मोजकेच दिवस, त्यात फक्त तीन विकेंड्स त्यामूळे ट्रेक केला तर फक्त सह्याद्रीचा एकच भाग बघता येणार होता, त्यामूळे ट्रेक करण्याच्या तिव्र ईच्छेला आळा घालत, सह्याद्री बाईक ने भटकण्याचा निर्णय धेतला, जेणे करुन जास्तीत जास्त सह्याद्री डोळ्यात साठवता येईल.
मार्ग :
कल्याण - माळशेज घाट - खिरेश्वर - जुन्नर - घोडेगाव - आहुपे
दिवाळी आधी रतनगड ट्रेक पार पडलेल्याला दिड-दोन महिन्याचा काळ लोटला होता. दिवाळी नंतर रोमाने भैरवगड तर योने सुधागड सर केला होता. मी ऐन वेळी 'कारणे दाखवा नोटिस' बजावून त्यातून काढता पाय घेतला होता. दोन महिने माझा ट्रेक उपास घडलेला असतानाच नाताळच्या लंब विकांतातील क्रॉसकंट्री ट्रेक रद्द झालेल्या यो आणि रोमाचा फोन आला. क्रॉस नाहितर नाही... निदान कंट्री ट्रेक तरी करुचा धोशा लावला होता. मंगळवार असल्याने एका दिवसाचा ट्रेक करायचा होता. जवळचा प्रबळगड करुया अशी टूम निघाली. त्याच काळात आमचा ट्रेक सवंगडी गिरिविहार फॅमिली सोबत जंगलात 'सफर' करत होता.