वीस एक दिवसाची भांडून घेतलेली सुट्टी, अजेंड्यावर असंख्य गोष्टी..मित्र, नातेवाईक, लग्न, सण ई. पण सर्वात पहिली नोंद केली होती ती जुन्या मित्राला भेटण्याची आणि तब्बल चार वर्षानंतर सह्याद्रीची प्रत्येक्ष भेट झाली.
हातात मोजकेच दिवस, त्यात फक्त तीन विकेंड्स त्यामूळे ट्रेक केला तर फक्त सह्याद्रीचा एकच भाग बघता येणार होता, त्यामूळे ट्रेक करण्याच्या तिव्र ईच्छेला आळा घालत, सह्याद्री बाईक ने भटकण्याचा निर्णय धेतला, जेणे करुन जास्तीत जास्त सह्याद्री डोळ्यात साठवता येईल.
मार्ग :
कल्याण - माळशेज घाट - खिरेश्वर - जुन्नर - घोडेगाव - आहुपे
आमच्या ह्या छोट्या भेटीचा हा धावता आढावा.
प्रचि १ : एकच ध्येय होतं या ट्रीपच : Travel Unlimited !!!
प्रचि २ : सह्याद्री सकाळ
प्रचि ३ : वसंतोत्सव
प्रचि ४ : पिंपळ जोगे धरण
प्रचि ५ : श्रद्धास्थान _/\_
प्रचि ६ : परीक्षा
मार्च पहिना म्हंटल की लहान पणापासुन पोटात गोळा येतो...कारण परीक्षा !!
ही मुलगी पहाटे सहा-सात वाजता शेतात बसुन अभ्यास करत होती.
प्रचि ७ : मासेमारी
मासे पकडण्यासाठी लावलेली जाळी
प्रचि ८ : स्वागत
सह्याद्रीने आमच स्वागत पावसाने केलं ते देखिल विजेच्या कडकडासकट, पावसाची शुन्य तयारी करुन गेलो असल्याने समोर दिसलेल्या घरात घुसखोरी केली. त्या घरात आमच स्वागत या कोंबडीने केलं.
दोन अनोळखी अर्धवट भिजलेले भटके, घरात येउ का विचारतात आणि उत्तर मिळतं "चहा घेणार का ? फक्त दुध नाहिये" .. कितीते आदरतीथ्य. धन्य झालो तो चहा पिउन.
प्रचि ९ : चित्र
ज्या घरात आम्ही आडोश्याला थांबलो होतो, त्यांच्या दारातून दिसणारं हे चित्र.
प्रचि १० : Life on the Edge
When life is on the edge then only one option remains nothing but to fight back.
सह्याद्रीतल्या प्रत्येकाच आयुष्य असंच कडेवरचं, माणुस असो वा मांजर.
प्रचि ११ : प्रवास
खड्डे आहेत म्हणुनच हा रस्ता सुंदर दिसत असावा... कदाचित आयुष्याचं पण असंच काहिसं असाव.
प्रचि १२ : क्षण
हातात आलेले काही क्षण सुटले तरी देखिल छान दिसतात.
प्रचि १३ : पाण्यासाठी दाही दिशा
१०-१२ कीमी अंतरावर दोन धरणं आहेत तरी देखिल...... पाण्यासाठी दाही दिशा पण कमीचं !!
प्रचि १४ : सांजवेळ
प्रचि १५ : आहुपे
देवराईतल्या मंदीरातल्या पडवीत पाणी साचलं होत, त्यामुळे रात्री गावातल्या एका घरात राहिलो.
आम्ही जेव्हा खाली पावसात भिजत होतो तेव्हा वर आहुपे गावात गारा पडत होत्या. सगळ्या पोरांनी गार पाणी प्यायलं होतं मडक्यात साठवुन ठेवल्या गारांच पाणी देखिल आम्हाला दाखवुन झालं.
पोरा-टोरां बरोबर आम्ही पण पिठ्लं भाकरी खाउन झोपलो आणि थेट पहाटे उठलो आणि कडा गाठला.
प्रचि १६ : सह्याद्री मधिल प्रत्येक पहाट ईतकीचं सुंदर असते
मच्छिंद्रगड आणि गोरखगड
प्रचि १७ : वाघ
चांगलाच मोठा वाघ(बिबट्या) गावातल्या बकर्या उचलायला आला होता. पोरं, माणसं, बाया, आज्या, म्हातारे सगळे त्याला पिटाळून लावायला त्याच्या मागे. तो वाघ माझ्या समोरुन गेला साधारण ५०-६० एक मिटर लांबुन... माझ्या हातात कॅमेरा होता, कॅमेरा ऑन होता, पण काही कळायच्या आत तो नजरे आड झाला.
प्रचि १८ : निष्पर्ण
प्रचि १९ : देवराई
माणुस हा निसर्गा समोर कीती लहान आहे.
प्रचि २० : देवराई
वानरांना हुसकुन लावण्याचा प्लॅन करत होती ही पोरं...
प्रचि २१ : देवराई
कधी कधी वाटतं की अश्या देवराई आहेत आहेत म्हणूनच हे सुंदर जंगल टीकून आहे.
प्रचि २२ : प्रतीबींब
कदाचीत पुढच्या वारीत ईकडे मोठा बंगला झाला असेल.
प्रचि २३ : एक संध्याकाळ सह्याद्रीत, आजून काय हवं सह्याद्री भक्ताला
प्रचि २४ : अमेझिंग सह्याद्री
प्रचि २५ : सह्याद्रीची लाल राजकुमारी
प्रचि २६ :
Four wheels move the body.
Two wheels move the Soul.
प्रचि २७ : पुन्हा भेटु
धन्यावाद,
तन्यम शेंडे
Travel
...as long as you can
...as much as you can
...as far as you can
मस्त!
मस्त!
मस्त मस्त.
मस्त मस्त.
प्रचि १० आणि ३ मस्तच!!! भारी
प्रचि १० आणि ३ मस्तच!!!
भारी आहेत बाकीचे!!!
एक नम्बर!
एक नम्बर!
सुरेख प्रकाशचित्रं. तुमची
सुरेख प्रकाशचित्रं.
तुमची सह्याद्रीची आवड प्रतीत होत आहे.
Four wheels move the body.
Two wheels move the Soul.>>>> +१११
छान फोटो!!
छान फोटो!!
मस्तच!!
मस्तच!!
मस्तच !!!!
मस्तच !!!!
बापरे! धन्य! तुमचं आयुष्यावर
बापरे! धन्य! तुमचं आयुष्यावर नितांत प्रेम दिसतं.
सह्याद्रीतल्या प्रत्येकाच आयुष्य असंच कडेवरचं, माणुस असो वा मांजर.>> सगळे कॅप्शन्स वाचनिय आहेत.
जबरदस्त !! खूपच सुंदर आहेत
जबरदस्त !!
खूपच सुंदर आहेत सगळेच फोटो !
अप्रतिम आहेत सगळे फोटो
अप्रतिम आहेत सगळे फोटो ..
खरच आपल्या इथे ईतका सुंदर निसर्ग आहे आणि आपण बाहेर जायला बघतो .
फोटो बघुनच मन प्रसन्न झाले..
२ ५ ११ १८ २६ हे फोटो अमेझींग.
२ ५ ११ १८ २६ हे फोटो अमेझींग. मस्तच.
मस्त फोटोज आणि त्यापेक्षा
मस्त फोटोज आणि त्यापेक्षा मस्त कॅप्शन्स!!
जबरी आहेत फोटो. बिबट्याचा
जबरी आहेत फोटो.
बिबट्याचा फोटु हुकला की राव तुमचा.
छान फोटो. २३,२४ फोटो कुठचे
छान फोटो. २३,२४ फोटो कुठचे आहेत?
जबरदस्त,सुंदर, अप्रतिम !!!
जबरदस्त,सुंदर, अप्रतिम !!!
वा मस्तच !
वा
मस्तच !
सुरेख फोटोज !
सुरेख फोटोज !
आऊटडोअर्स आपला माळशेज आहे.
आऊटडोअर्स
आपला माळशेज आहे.
२३- घाटातल्या मंदिराजवळ उभे राहिल्यावर दिसतो तो माळशेज लिंगीच्या शेजारी तिवईचे सुळके आणि उजव्या बाजूला घोण्या डोंगर.
२४. रोहिदास आणि हरीश्चंद्रची रांग
MTDC आणि बोगद्याजवळ रेलिंग लावण्यात आलेली आहेत.
ऑब्जेक्ट्स अप्रतिम आहेत, पण
ऑब्जेक्ट्स अप्रतिम आहेत, पण किती ते excess editing.
Simplicity नाहीशी झाल्यासारखे वाटतंय (निदान मला तरी).
सर्वच प्रचि भन्नाट ..
सर्वच प्रचि भन्नाट .. सह्याद्री डोळ्यासमोर उभा केलास
झकास फोटो..
झकास फोटो..
जबर !!
जबर !!
ज ब रा ट फोटो !
ज ब रा ट फोटो !
सुंदर....!!!
सुंदर....!!!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
अतिशय सुन्दर प्रकाशचित्रे.
अतिशय सुन्दर प्रकाशचित्रे.
सुन्दर वर्णन.
खेळलास मित्रा ! अफाट फोटो मजा
खेळलास मित्रा ! अफाट फोटो मजा आली खरच
वसंतोत्सव भारी... काही काही
वसंतोत्सव भारी... काही काही प्रचि वेड लावणारे आहेत.
खुप छान
खुप छान फोटोज!!!!!!!!!!!!
खड्डे आहेत म्हणुनच हा रस्ता सुंदर दिसत असावा... कदाचित आयुष्याचं पण असंच काहिसं असाव.>>>> लय भारी वाक्य!!!
Pages