सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनींचे अरंगेत्रम्..
सौ. सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनींचे अरंगेत्रम्.. म्हणजेच भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील गुरुच्या परवानगीने सादर केलेला पहिला कार्यक्रम.जसा हा विद्यार्थीनींचा पहिला कार्यक्रम आहे तसाच गुरु म्हणून सायलीचा ही पहिलाच कार्यक्रम आहे.
ह्या कार्यक्रमात साथसंगत पुढील प्रमाणे
नटुवांगम - सौ. सायली कुलकर्णी , गायन - सौ. सौम्या, कु. रश्मी मोघे, मृदुंग - श्री. व्यंकटेश, व्हायोलिन - श्री. बाल सुब्रमण्यम, बासरी - श्री. सुनिल अवचट, निवेदन - सौ. पूनम छत्रे.