शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काकपक्ष
हा याच अर्थाने कुठेतरी ऐकला, वाचला आहे.
टाळूवरील जावळाला म्हणतात काकपक्ष?

"लहान मुलाच्या टाळूवर व कानांवर ठेवण्यात येणारे केस"
असा अर्थ शब्दकोशात आहे.

(विश्वामित्रांनी रामासाठी काकपक्षधर असे विशेषण वापरलेय.)

कुठार
= कुऱ्हाड; परशु.
[सं.कुठार, कुट्ट-तोडणें; द्राविड कुट्ट)
दाते शब्दकोश

विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लेखनात हा शब्द आलाय :
“. . . तोपर्यंत रावबहादुरांच्या ग्रंथग्रहनांत अनिरुद्ध संचार करण्यास व त्यावर यथास्थित कुठारप्रयोग करण्यास बरीच अडचण होती . . . “

आई म्हणोनी कोणी कवितेत

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी

इतक्या करूण कवितेला ऐ दिल मुझे बता दे ची चाल लावून आम्ही वाट लावली.

कुठार कवींचा आवडता शब्द दिसतोय.

तिकडे बांग्लादेशचे राष्ट्रकवी क़ाज़ी नजरूल इस्लाम स्वत:ला “आमी परशुरामेर कुठार” म्हणताहेत :

* * *

आमि यज्ञ, आमि पुरोहित, आमि अग्नि!
आमि सृष्टि, आमि ध्बंस, आमि लोकालय, आमि श्मशान,
आमि अबसान, निशाबसान।
आमि इन्द्राणि-सूत हाते चाँद भाले सूर्य्य,
मम एक हाते-बाँका बाँशेर बाँशरी, आर हाते रण-तूर्य्य।
आमि कृष्ण-कन्ठ, मन्थन-बिष पिय़ा ब्यथा बारिधिर।
आमि ब्योमकेश, धरि बन्धन-हारा धारा गङ्गोत्रीर।
बल बीर –
चिर उन्नत मम शिर।
आमि परशुरामेर कुठार!

वि
शब्दरत्नाकरानुसार वरील अक्षर हा स्वतंत्र नपुसकलिंगी शब्द दाखवलेला आहे. तुकाराम गाथेनुसार त्याचा अर्थ ज्ञान आहे.
. . .
एक तर्क :

वि ज्ञान = ज्ञान + ज्ञान = विशेष ज्ञान
?

सुखरूप

प्रवास संपला की “सुखरूप पोचलो” असा निरोप देण्यापुरता “सुखरूप” शब्द माहिती होता.

एक जुना मराठी दीर्घलेख (छपाईचे वर्ष १९६६) वाचतांना सुखरूप शब्द अत्यंत सुंदर पुरुष/ सुस्वरूप देखणा माणूस अशा अर्थाने वापरलेला दिसला.

माझ्यासाठी नवीन, म्हणून ही नोंद.

मलाही हा अर्थ नवीन आहे. (शिवाय फक्त पुरुषच का? Proud ) Happy
पोचताना सुस्वरूप करणारा प्रवास म्हणजे रस्ता ब्यूटी पार्लरवरून जात असावा. Proud

Screenshot_2025-03-13-19-38-15-28_e4424258c8b8649f6e67d283a50a2cbc_2.jpg
हा मदन या शब्दाचा अर्थ.

पण सुखरूपचा हा अर्थ कसा लावायचा?
सुख मिळते रूप पाहुन ज्याचे/जिचे असा/अशी तो/ती?

मंडळी, तुमचे + मराठी शब्दकोशातले संदर्भ आणि नंतर खुद्द ज्ञानेश्वरांची रचना…. त्या रूपवान माणसाने मजा आणली Happy

आता नवमल्लिका आणि नीलोत्पल ची फुले / वृक्ष कोणते -काय-कसे ते शोधणार.

नाही सापडले संदर्भ तर इथे विचारायला येईनच.

मल्लिका म्हणजे मोगर्‍याचा प्रकार ना (मल्लिगै)?
आणि उत्पल म्हणजे कमळ > नीलोत्पल म्हणजे नीलकमल?

रामरक्षेत आहे ना, 'ध्यात्वा नीलोत्पलश्यामम् रामं राजीवलोचनम्'

नीलोत्पल म्हणजे नीलकमल?>>>> हो. Blue water lily.
मल्लिका म्हणजे मोगर्‍याचा प्रकार ना (मल्लिगै)>>> हो
मदनाचे ऊसाचे धनुष्य आणि त्याला भुंग्याची प्रत्यंचा. पाच फुलांचे बाण (कुसुमचाप)- अरविंद, अशोक, आम्रमंजरी, मल्लिका आणि निलोत्पल
त्यातले दोन कमळ प्रजातीतील; अरविंद आणि निलोत्पल का निवडले असावेत हे आजवर मला कळले नाही.

@ स्वाती_आंबोळे
@ ऋतुराज.

वा, झटदिशी संदर्भासहित स्पष्टीकरण ! अनेक आभार.

अरविंद वरून “मुखारविंद” आठवले आणि निलोत्पल वरून का कोण जाणे उत्पल दत्त Lol

विराजित नवी अरविंद पत्रे ।
पाहूनि मानुनि तिचीच विशाल नेत्रे ।
घालीन अंजन अशा मतीने तटाकी I
कांते, वृथा उतरलो, भिजलो विलोकी II

मला हे आठवले

उत्तम चर्चा. मजा आली वाचायला.

त्यातले दोन कमळ प्रजातीतील; अरविंद आणि निलोत्पल का निवडले असावेत हे आजवर मला कळले नाही. >>> तरूण मंडळी नदी/तलावाकाठी फिरायला गेल्यावर त्यांना बेसावध असताना टिपायला हँडी असावं म्हणून.

तरूण मंडळी बागेत फिरत असतील तर अशोक, मल्लिका, मंजिरी हे आहेत.

बरं समजा कोणी अशोक बागेत फिरतोय आणि त्याचवेळेस मल्लिकेबरोबर मंजिरीही आली पाय मोकळे करायला तर मदन कोणता बाण निवडून कोणाला टार्गेट करेल? असा प्रश्न मनात आला.

Pages