
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
पत् वरून बाकी सगळं आठवल,
पत् वरून बाकी सगळं आठवल, पतीपत्नी बरं आठवलं नाही तुम्हाला.

पति - ज्याचे सतत पतन होत असते तो
*पति - ज्याचे सतत पतन होत
*पति - ज्याचे सतत पतन होत असते तो

>>> लईच भारी.
(No subject)
बिचारा पति.
बिचारा पति.

पत् चर्चा
पत् , पतन, पत्ते पे चर्चा = 👌
पति - ज्याचे सतत पतन होत असते तो….
👊
बुल्स आय
(No subject)
गूज
गूज
न. गुप्त गोष्ट; गुह्य. हित, निज या शब्दांशी जोडून उपयोग. पहा : गुज : ‘बरें पाहतां गूज तेथेचि राहे ।’ - राम १५५. [सं. गुज्]
मूळ धातू गुज् १प. अस्पष्ट बोलणे. गुंजारव करणे.
मी हा इथे का देत आहे?
गुह्य संस्कृत, प्राकृत गुज्ज. कन्नड गुजुगुजु, तमिळ कुचुकुचु, तेलगु गुसगुस =कुजबुजणे.
सगळ्या दख्खनी भाषांत किती साम्य आहे ना.
आणि आपले "हितगुज."
‘क्षणोक्षणीं चिखलाशीं चपक्चपक् करून हितगुज करणाऱ्या चपला...’ अहाहा.
वा, मस्त !
वा, मस्त !
* चपक्चपक् करून हितगुज करणाऱ्या चपला.>>>
साष्टांग प्रणाम ( = स + अष्ट
साष्टांग प्रणाम ( = स + अष्ट + अंग प्रणाम = आठ अंगों के द्वारा प्रणाम)
ही आठ अंग कुठली?
डोके=कपाळ, हात, पाय = पायाचे अंगठे, हृदय म्हणजे छाती, डोळे, गुढगे, वचन आणि शेवटी मन.
पुढच्या वेळी देवाला साष्टांग नमस्कार करताना हे लक्षात ठेवा.
मुखी असावे नाम आणि मनी असावा भाव.
माझी समजूत होती की कपाळ, छाती
माझी समजूत होती की कपाळ, छाती, दोन हात, दोन गुढघे आणि दोन पायांचे अंगठे इथेच आठ अंगे झाली.
साष्टाङ्ग नमस्कारम् –
साष्टाङ्ग नमस्कारम् –
उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा ।
पद्भ्यां कराभ्यां कर्णाभ्यां प्रणामोष्टाङ्गमुच्यते ॥
ओं श्री ______ नमः साष्टाङ्ग नमस्कारां समर्पयामि ।
कर्णाभ्यां?
पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यामुरसा शिरस्तथा |
मनसा वचसा दृष्टया प्रणामोऽष्टाङ्ग मुच्यते ||
संस्कृत आठवी नववीच्या
संस्कृत आठवी नववीच्या पुस्तकात साष्टांग नमस्काराच सुभाषित होतं
त्यात बहुतेक हपा म्हणतात तसाच अर्थ आहे.
शोधून इथे डकवतो
संकेत कोशा प्रमाणे अष्टांग
संकेत कोशा प्रमाणे अष्टांग ह्या शाबदाचे विविध अर्थ दिले आहेत. त्यात अष्टांगे (शरीराची ) ह्यात हपा म्हणतात ती अष्टांगे दिली आहेत. तर अष्टांगे (नमनाची ) मध्ये मी जी अष्टांगे म्हणतो आहे ती दिलेली आहेत. थोडे थोडे भेद सगळीकडे आहेतच.
मी दिलीला पहिला संदर्भ हा ॠग्वेदीय नित्यकर्म पूजा मधला आहे. तर दुसरा संकेत कोशामधून घेतला आहे.
Pages