शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* वंश = बांबू/वेळू. >>>> छान.

रामायणातील संदर्भ दिसतोय :
'त्वरें धाडिलें रावणें नापिकातें । चढे गोपुरी तो धरी वंश हातें ।' -मुरा युद्धकांड ७९.
दाते शब्दकोश

* वंशलोचन चूर्ण >>
याचे अरबी नाव तबाशीर (= बाबूंची साखर) >>>
तवकीर (बांबू, गहूं, तांदूळ जव इ॰ कांपासून काढलेलें सत्त्व).
दाते शब्दकोश

कधी ऐकतो गीत झऱ्यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
कधि वाऱ्यातुन, कधि ताऱ्यांतुन झुळझुळतात तराणे

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे

वंश --> बन्स --> बांस --> बांसुरी

श्री गंगाजी का तट हो
जमुना का वंशीवट हो
मोरा सावरा निकट हो
जब प्राण तन से निकले

फिरंगाण / तुर्काण

गेला आठवडाभर थोडे-२ राजवाडे वाचत होतो. त्यात काही जागी “वसईचे निम्मे फिरंगाण फत्ते झाले”; “त्यांच्या सुब्याचे तुर्काण झाले” असे संदर्भ येत होते. माझ्यासाठी नवीन शब्द.

शब्दार्थ याप्रमाणे :

फिरंगाण = फिरंगी/ पोर्तुगीज लोकांच्या ताब्यातील प्रदेश. (पुढे फ़्रेंच आणि इंग्रजांसाठीसुद्धा वापरलेला दिसला.)

तुर्काण = तुर्कांच्या ताब्यातील प्रदेश
पुढे-पुढे हा शब्द सर्वच मुस्लिम शासकांसाठी वापरलेला दिसला.

BTW, वरील शब्दांसारखाच “शिरकाण” शब्द.

अर्थ शीर कापून हत्या वगैरे असेल असा समज होता. चुकीचा ठरला.

मराठी शब्दकोषात या शब्दाचे दोन अर्थ दिले आहेत.

१) शिर्के आडनाव असलेल्या लोकांच्या ताब्यातील प्रदेश

२) शिर्क्यांचें निर्मूलन, हत्या, समूल उच्छेद
ह्याला छ. संभाजींनी शिर्क्यांना ध्वस्त करण्याचा आदेश दिला होता तो संदर्भ आहे.

पैकी दुसरा अर्थ युद्धात सपशेल पराभव / वीरगती साठी रूढ झालेला दिसतो.

भाषापंडित गणेश देवी यांच्या मुलाखतीत व्यक्त झालेले काही विचार : (https://www.youtube.com/watch?v=qWhz2wk67sg)
१. ऋग्वेदातील 300 शब्द अर्मेनीय भाषेतून आलेले आहेत.

२. 'कल्चर'साठी संस्कृती ऐवजी प्रकृती हा शब्द वापरणे इष्ट.

३. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात सुरुवातीला फक्त डोळ्यांची भाषा होती आणि तिचे वैशिष्ट्य म्हणजे डोळे कधी खोटं बोलत नाहीत. त्यानंतर कालांतराने तोंड, जीभ इत्यादींचा वापर भाषा बोलण्यासाठी केला जाऊ लागला आणि त्यातूनच माणूस खोटं बोलायला शिकला.
म्हणजेच, खोटं बोलणे ही उत्क्रांतीच्या दृष्टीने भाषेची वरची पातळी आहे !

बाकी माहीत नाही, पण "डोळे कधी खोटं बोलत नाहीत" हे पटलं नाही. अभिनेते/त्री मंडळी आपल्या डोळ्यांतून वेगवेगळे भाव सादर करतात, परंतु ती त्यांची खरी गोष्ट नसते. विशिष्ट प्रशिक्षण आणि सरावाने डोळ्यांनी खोटे बोलणे शक्य आहे ह्याचं ह्या मंडळींची कला हे एक उदाहरण आहे असं मला वाटतं.

* विशिष्ट प्रशिक्षण आणि सरावाने डोळ्यांनी खोटे बोलणे शक्य आहे
>>> छान विचार करण्याजोगा मुद्दा !
त्यानिमित्ताने यामागचे विज्ञान वाचण्यास प्रवृत्त झालो.
https://www.nature.com/articles/srep22049
या संदर्भात असं म्हटलं आहे,

" . . . Eyes might appear to express an emotion that isn't truly felt by the person, often due to conscious effort to mask their true feelings or subtle involuntary micro-expressions that can be misinterpreted; however, the eye region is considered a key indicator of genuine emotion, and skilled observers can often detect discrepancies between the eyes and other facial expressions when someone is trying to fake an emotion. . ."

त्यावरून असं वाटतं, की सामान्य माणसांच्या नैसर्गिक संवादांमध्ये डोळे खोटे बोलणार नाहीत.
( अभिनय ही मुळातच आभासी कृती असल्याने तिचा वेगळा विचार करावा लागेल).

मला वाटते आपण अभिनय करायला लहानपणापासुनच शिकतो. प्रमाण आणि कितपत जमते ते व्यक्तीसापेक्ष. आणि मुळातच कोण कितपत भावना देहबोलीतून व्यक्त करतं हे सुद्धा व्यक्ती सापेक्ष.
असेही होत असावे की समोरच्या व्यक्तीची कुणावर जरब असेल तर गोंधळ/भीतीमुळे डोळ्यातून चुकीचे भाव व्यक्त होतील, खरं बोलत असूनही खोटं बोलत आहे असे.

देवींच्या मुलाखतीतून मला जाणवलं ते असं :
जेव्हा मानव प्रथम निर्माण झाला तेव्हा फक्त डोळ्यांची ‘भाषा’ होती. खऱ्या अर्थाने भाषेचा शोधच लागलेला नसल्यामुळे तोंडाचा उपयोग फक्त खाणे आणि आवाज करणे यासाठी होता.

कदाचित त्या अतिप्राचीन काळात,
“डोळे कधी खोटं बोलत नाहीत” हे विधान खरं असेल का ?

भाषेचा शोध लागल्यानंतर तोंड जेव्हा बोलू लागलं, तेव्हा ते बेमालूम खोटं बोलायला सुद्धा शिकलं. म्हणजेच, तोंडातून केलेला उच्चार आणि डोळ्यांमध्ये विसंगती निर्माण झाली.
. . .

चर्चेसाठी अजून एक मुद्दा :
“डोळे कधी खोटं बोलत नाहीत” हे विधान प्राण्यांच्या बाबतीत पूर्णपणे खरं असेल का ?

अभिनय ही मुळातच आभासी कृती असल्याने तिचा वेगळा विचार करावा लागेल
>>>> हे सुद्धा कुठेतरी पटतेय. प्रत्यक्षात जेनुईन व ताकदीचा अभिनय करणारे दिग्गज कलाकार आहेतच की. जगात ढोबळमानाने दोन प्रकारचे लोक असतात कॅरेक्टर ड्रिव्हन आणि इमोशन्स ड्रिव्हन. पहिले जास्त संयत असतात ते वरून काही न दाखवता, भावनांचे फार प्रदर्शन न करता योग्य ते करतात. दुसरे त्या त्या क्षणात जे तीव्रतेने वाटले ते करतात, ते योग्य आहे का नाही याचा फारसा विचार करत नाहीत. त्यामुळे हे डोळ्यांनी खरेखोटे भाव कळणं जरा गुंतागुंतीचं आहे.

छान चर्चा. कुमारसरांचा इंग्रजीतला परिच्छेद विशेष आवडला. लोक मोठमोठ्या इमोशन्सही 'फेक' करू शकतात हे वाचून पहिल्यांदा मला आश्चर्य वाटले होते.

माणूस एक परिपूर्ण भंपक पॅकेज आहे, तो कसाही खोटं बोलू/वागू शकतो. उदा. महाभारतातील धृतराष्ट्र. तो अंध असूनही धूर्तच होता.

प्राणीही खोटं बोलू शकतात, सर्कशीत माणसाने ट्रेन केलेली माकडं व इतर प्राणी. पण ते माणसांमुळे, प्राण्यांच्या भावना इतक्या गुंतागुंतीच्या नसतात, त्यांच्या भावनिक गरजाही कमी असतात.

एक निरीक्षण माकडांबद्दल (जरा मोठी ते मोठी):
अचानक समोरच्या फांदीवर/खिडकीत आत येऊ पहाणारे एक किंवा दोन माकडे:
स्वतः घाबरली असली तरी समोरच्या व्यक्तीला डोळे आणि तोंडाचे विक्षेप करून घाबरवण्याचा प्रयत्न करतात, त्यात यशस्वीही होतात. ( यात आवाजही येतो पण तो नंतर, आवाजाशिवाय देहबोली बद्दल आहे हे.)
समोरची व्यक्ती घाबरतेय असे वाटले (म्हणजे डोक्यापासून शरीर मागे वळवणे, पाऊल मागे घेणे. Adrenaline चा वास नव्हे कारण अनेकदा घाबरलोय असे मुद्दाम दाखवलेय) की त्यांचे हावभाव अधिक तीव्र करतात, अंगावर येत असल्याचे दाखवतात. यात समोर दोन व्यक्ती आहेत एक एकीने माघार घेतलीय तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. मग आपण कॉन्फिडन्टली तोंडाने मोठी फुंक काढत एक पाऊल पुढे टाकले की माघार घेतात. यात जिला तिकडे माकड आहे हे माहीत नाही अशी व्यक्ती पुढे आली तरी माघार घेतात.
आवाजाचा वापर आपले लक्ष नाही ते वेधून घेण्यास करतात आणि मग वरील प्रमाणे हावभाव करतात. त्यातही।समोरची व्यक्ती घाबरलीय की नाही हे कळत नसेल तर आवाज काढुन घाबरवण्याचा प्रयत्न करतात.

देऊळ किंवा इतर ठिकाणे जिथे माणसे येऊन खायला घालतात तिथे बरीच धाडसी माकडे असतात, तसेच गावात, रानात टोळीतली काही मोठी नेते मंडळी माकडे असतात त्यांना हे लागु नाही.

~थोडक्यात प्राण्यांमध्ये निदान माकडे तरी भावना कळु न देण्याचा प्रयत्न करत वेगळी भावना दर्शवण्याचा प्रयत्न करतात.

हो, माकडं जरा हरहुन्नरीच असतात. गोविंदाच्या 'आंखे' मधे कलाकार माकड होते, जे त्यांना संकटातून वाचवते. एका दादा कोंडकेच्या सिनेमातही अशोक सराफ डोंबाऱ्याचे खेळ दाखवताना पाकिटं मारणारे माकड होते. हा अभिनयच होता. देवळाबाहेर एक थोबाडीत ठेवून पर्स, प्रसाद पळवणारी हिंसक माकडंही असतात.

दिलीपकुमारच्या एका जुन्या पिक्चरमध्ये झिप्पी नावाचे माकड खूप फेमस झाले होते. नाव आठवले की सांगतो. बहुतेक आझाद असावा.
राजा और रांचो सीरिअलमध्ये पण एक माकड होते. पुर्व्बो रस्त्यावर माकडाचे खेळ दाखवत असत त्यात नवरा बायकोचे भांडणचा एक खेळ असे, बायाकोचे नाव होते भागाबाई, नवर्याने काठीने मारले की ती रुसून बसायची. धमाल ड्रामा.

Pages