शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपोहिष्ठा करणे Happy
हे माहीत नव्हतं. मार्जन मंत्रात येतं ते. त्याचा अर्थही माहीत नव्हता.

मग तर स्वाहा करणे सुद्धा चालेल.

नाश्ता कधी स्वाहा झाला कळलेसुद्धा नाही

त्वं स्वधा त्वं स्वाहा त्वं हि वषट्कार …..हस सुप्रसिद्ध श्लोक. स्वधा मला वाटते पितृतर्पणात येते तर स्वाहा देवतांना आहुती देते वेळी

रोचक माहिती
आपोहिष्ठा हा शब्द मी वेदातील जलसूक्त यासंबंधी कधीतरी वाचला आहे. पण त्याचा हा अर्थ माहीत नव्हता.

ओरपणे हा एक.

आरोगणे / आरोगण हा शब्दही येतो जुन्या मराठीत खाण्या-जेवण्यासाठी.

वा, छानपैकी फडशा पाडलाय सर्वांनी !
मस्त उजळणी.

*फडशा >>> याचे समानार्थी म्हणूनच आपण सुरुवात केली Happy

ओरपणे हा एक.>> हो.
हा द्रव पदार्थांच्या बाबतीत ऐकला आहे. कढी, आमटी, बासुंदी, रस्सा ओरपणे.

Pages