शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय, फारसीच.
बेचिरागचा हा पण अर्थ दिलाय : निःसंतान, बे-औलाद
(https://dict.hinkhoj.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E...(%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8)%20%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%81%20%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%A8,%E0%A4%AC%E0%A5%87%2D%E0%A4%94%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%A4)

अच्छा !
ऐकलेय त्या पुस्तकाबद्दल.

कषाय हा काषाय शब्दाचा अपभ्रंश हे पटत नाही. उलट काषाय म्हणजे कषायाच्या रंगाचा असा अर्थ असावा.>>>
एका शब्दापासून दुसरा शब्द बनला, आणि मग पहिला शब्दच दुसऱ्याचा अपभ्रंश म्हणून वापरला जाऊ लागला असं उदाहरण इंग्लिशमध्ये आहे. सांगा पाहू.

( मूळ जुना >>>> नवा )
napron >>> apron
lingot >>> ingot
ekename >> nickname

* वरील मूळ शब्द काही शब्दकोशांमध्ये अद्याप ठेवलेले आहेत

चला मीच सांगतो. Silicon वरनं silicone शब्द बनवण्यात आला, पण बरेच लोक silicone लाच silicon म्हणतात.
तसाच कषाय वरुन काषाय बनला आणि काषाय चा अपभ्रंश परत कषाय झाला हे दोन्ही शक्य आहे
पर्सनली मला काषाय म्हणजे कषायाच्या रंगाचा, हे पटत नाही

Silicon वरनं silicone शब्द बनवण्यात आला, पण बरेच लोक silicone लाच silicon म्हणतात. >> जबरी! मला वाटायचं की हे ब्रिटिश आणि अमेरिकन फरक आहेत

छान धागा. वाचतोय.
>>> मनुष्यहानी (रोगराई, आक्रमण, युध्द इत्यादी कारणांमुळे) झाल्यावर दिवा लावायलाही माणूस शिल्लक नसणे, ह्याला ते 'गाव बेचिराग' मनुष्यहानी (रोगराई, आक्रमण, युध्द इत्यादी कारणांमुळे) झाल्यावर दिवा लावायलाही माणूस शिल्लक नसणे, ह्याला ते 'गाव बेचिराग' >>
छान माहिती.

1. द्युति, द्युती = कांती; तेज; प्रकाश.
2. विद्युत् = वीज; बिजली; एक नैसर्गिक शक्ति

दोन्ही शब्दांतले साम्य बघता 1 वरूनच 2 आला असावा असे वाटते.
?

सिलिकॉनवरून सिलिकोन आला हे माहिती नव्हतं. पण या दोन्हीचा काय संबंध आहे?
लोक सिलिकोनला सिलिकॉन चुकून म्हणतात हे खूप वेळा बघितलं आहे. अगदी लहान मुलांचे (ज्यांना थोडेच दात आलेले असतात) टूथब्रश असतात ते सिलिकोनचे असतात. तव्यावर तेल लावण्यासाठीचा ब्रश सिलिकोनचा असतो. खूप जण हमखास 'सिलिकॉन' म्हणतात.

द्युती, विद्युत >> मूळ धातु द्युत् असा आहे - म्हणजे चमकणे, प्रकाशणे, दिपणे इत्यादी. त्यापासून हे दोन्ही शब्द आले आहेत. महाभारतात जे खेळलं गेलेलं द्यूत आहे, त्याचा ह्याच्याशी संबंध नाही. ते दिव् (जुगार खेळणे) ह्या धातूपासून आलं आहे.

“फसगंमत” झाली असे वाचले. गमतीशीर फसवणूक aka prank असा अर्थ लावला. बरोबर आहे काय ?

खरेच फसगंमत हा शब्द मराठीत आहे की कुणी नवीन coin केला आहे ?

"फसगंमत"

छान शब्द आहे परंतु एखाद्याची फसगत झाली तर त्याला गंमत वाटेल का? हा प्रश्न आहे.

** एखाद्याची फसगत झाली तर त्याला गंमत वाटेल का?
>>
शब्दकोशातला अर्थ शब्दशः घेतला तर असे वाटणे स्वाभाविक आहे. ज्या वाक्यात तो शब्द आलेला आहे तो संपूर्ण परिच्छेद वाचल्यावर कदाचित उलगडा होईल.

माझा अंदाज सांगतो :
फसणे या प्रक्रियेत फसवणारा आणि फसला गेलेला असे दोघे असतात. यातील पहिल्याच्या दृष्टिकोनातून,
“कसं गंडवलं त्याला; त्याला कळले देखील नाही!” अशी स्थिती असते.
म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून गंमत झाली. म्हणजे त्याने दुसऱ्याची केली.

पण जो फसवला गेला आहे त्याची मात्र लुबाडणूक झाली.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

काही एकाक्षरी शब्द (गोरे लघुकोशातून साभार !) :
. कु = पृथ्वी (कु-प्रदक्षिणा)

. गे = संबोधन ( जाईन गे माये तया पंढरपुरा )

. = हे स्त्रीचे संबोधन असून त्यावर अनुस्वार नाही.

. गो = इंद्रिय (गोचर)

गे = संबोधन ( जाईन गे माये तया पंढरपुरा )
>>>>>>
गो नि दांडेकर यांच्या कांदबऱ्यांत सढळ हाताने वापरलेला दिसतो. आधी मला कोकणी वाटायचा, आता स्पष्ट झाले.
'गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे' हे एक उदाहरण.

पूरक माहिती व चर्चा उत्तम !

ग वर अनुस्वार नाही >>
तसेच अग मधल्या ग वर पण नाही हे मागे यास्मिन शेख यांच्या लेखात येऊन गेलेले आहे. (इथे बऱ्याच धाग्यांवर बऱ्याच जणी तो अनुस्वार दाखवत असतात Happy

* कु हा कुशलचा संक्षेप म्हणूनही वापरला जातो. पूर्वी पत्राच्या मथळ्याच्या कोपऱ्यात कु लिहीत असत. म्हणजे वाचण्यापूर्वीच वाचकाला समजते की पत्रात धास्ती वाटावे असे काही नाही.

ग एकाक्षर असल्याने उच्चार गं असाच होईल.
पण अग मधील ग वर अनुस्वार नसल्यास मग मधील ग सारखा व्हायला हवा ना?

ग एकाक्षर असल्याने उच्चार गं (पूर्ण अक्षरासारखा) असाच होईल.
पण अग मधील ग वर अनुस्वार नसल्यास मग मधील ग सारखा व्हायला हवा ना?

Pages