Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> वळचणीची पाल >>> रोचक आहे
>>> वळचणीची पाल >>> रोचक आहे. नव्हते माहीत.
पाणी माहीत होते
>>> वळचणीची पाल >>> रोचक आहे
ड पो
लाविल पैजंला आपली कुडं >>
लाविल पैजंला आपली कुडं >> म्हणजे काय?
कुडी = जीव त्यामुळे कुडं म्हणजे ग्रामीण भाषेत कुडी चं अनेकवचन असावं.
तान्या सर्ज्याची हनम जोडी >>
तान्या सर्ज्याची हनम जोडी >> 'हनम' म्हणजे?
>>>>>> तो शब्द हनम जोडी नसुन 'हाय नामी जोडी' असा आहे.
मी गुगलवर सर्च दिला असता quora वर हे स्पष्टीकरण दिसले. योग्य वाटतंय.
>>>>वळचणीचे पाणी आढ्याला जात
>>>>वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही>>>
नाथांच्या घरची उलटी खूण
पाण्याला लागली मोठी तहान
आज मी एक नवल देखिले
वळचणीचे पाणी आढ्याला लागले
अशा ओळी नाथांच्या भारुडात आल्यात त्याचे सुंदर निरुपण येथे पहा...
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0Lm432fhGSp577AiRRBDVT3...
कुडं = कुडी बरोबर पण
कुडं = कुडी बरोबर पण
> >>>कुडी = जीव त्यामुळे कुडं म्हणजे ग्रामीण भाषेत कुडी चं अनेकवचन असावं.>>>
कुडं च अनेकवचन कुडी नाही...
कुडं आणि कुडी बोलीभाषेचा फरक आहे कारण पिंजरा सिनेमा गीत...
आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी
दे रे कान्हा चोळी लुगडी.
त्यामुळे कुडं आणि कुडी समानार्थी....
तसं कुड म्हणजे झोपडीची गवतापासून बनविलेली भींत.
कुरकुर करिती या जुन्या कुडाच्या भिंती....
कुडी चा दुसरा अर्थ कानातला दागिना...
कुमार सर
कुमार सर
लेखिका, प्राध्यापिका, मुख्याध्यापिका, सेविका
पदनिर्देशक शब्दांचे स्त्रीलिंगी रूप...छान निरिक्षण
हपा
हपा
डौल मोराच्या मानंचा या गीताबद्दल काही प्रश्न आहेत.
लाविल पैजंला आपली कुडं >> म्हणजे काय?
तान्या सर्ज्याची हनम जोडी >> 'हनम' म्हणजे?
पहिल्या कडव्यात 'सुर्व्या-चंदराची ओ जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी' ह्यात 'त्याच्या सर्गाची माडी'चा कॉन्ट्क्स्ट कळला नाही. सूर्य-चंद्र मिळून स्वर्गाची माडी तयार करतात??
मला जेवढं समजलं ते टंकतो
या गीतातल्या पुढील ओळी पाहू
धरती आभाळाची चाकं
त्याच्या दुनवेची हो गाड़ी
सूर्व्या चंद्राची हो जोड़ी
सूर्व्या चंद्राची हो जोड़ी
त्याच्या सर्गाची रं माडी सर्गाची माडी
ही गाडी जगनियंत्याची आहे. विश्व एक गाडी आहे. तिला धरती आभाळाची चाकं आहेत. चंद्र, सुर्य ती ओढताहेत. त्यांच्या कलानं जग चालतं. अशा विश्वाधिपतीचा स्वर्ग हे निवास (माडी) आहे.
याचे संदर्भ पुढे अधिक स्पष्ट होतात...
सती शंकराची माया
ईश्नू लक्शिमीचा राया
पुरुस परकरतीची जोडी
पुरुस परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी माज्या राजा रं
पुरुस परकरतीची जोडी( पुरुष प्रकृती)
हनम हा शब्द हं नम असा एके ठिकाणी वाचला बहूतेक हं नामी म्हणजे आहे नामी या अर्थाने असावं.
द सा
द सा
उत्तम निरूपण !
नाथांच्या भारुडात >>>>
त्यातले :
"वळचणीचे पाणी आढयाच्या पाण्याशी म्हणजे विश्वात्मक चैतन्याशी एकरूप झाले" हे अप्रतिम !!
दसा रॉक्स!! एकदम मस्त अर्थ.
दसा रॉक्स!! एकदम मस्त अर्थ.
अनेक आभार मामी आणि द सा. द सा
अनेक आभार मामी आणि द सा. द सा, खूप छान विवेचन.
द सा, खूप छान विवेचन.
द सा, खूप छान विवेचन.
'कुडी' आणि 'वळचण' दोन्ही माहिती होते पण या वेगवेगळ्या अर्थाने वाचायला छान वाटले.
इन्टरेस्टिंग चर्चा.
इन्टरेस्टिंग चर्चा.
द.सां.चं विवेचन आवडलं.
थोडी त्यालाच पुढे पुरवणी जोडू का?
तान्या-सर्जाची जिवाशिवासारखी 'हार्मोनिअस' जोडी एका भरधाव (रामाच्या बाणाच्या वेगाने) धावते आहे. जोडीमधला एकजण धावताना पुढेमागे पडला तर हा सगळा (मोराच्या मानेसारखा) डौल आणि तोल मातीस मिळेल. जोवर ते एकदिलाने धावताहेत, तोवर या गाडीला वेगात कोणी हरवू शकत नाही. गाडीवानाला याची इतकी खात्री आहे की तो घराची कुडंसुद्धा पणाला लावायला तयार आहे. (इंग्रजीत 'I will bet my last dollar' म्हणतात तसं.)
सगळं गाणं त्या हार्मनीबद्दलच आहे. आणि त्या 'यिन-यांग' / पुरुष-प्रकृती / दिवस-रात्र / सूर्य-चंद्र / सुष्ट-दुष्ट इत्यादी जोड्या आणि त्यांच्यातला तो समतोल समजणं आणि आपल्या रोजच्या जगण्यातही तो समतोल जपता येणं ही स्वर्गाची गुरुकिल्ली आहे - असा मला समजलेला अर्थ.
>>> 2. वळचणीचे पाणी आढ्याला
>>> 2. वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही = (पाणी खालून वर जात नाही यावरून) लहानाला मोठे होणे अशक्य. >>>
हे मोठ्याला लहान होणे अशक्य असे असावे काय?
द.सां आणि स्वाती, सुंदर
द.सां आणि स्वाती, सुंदर विवेचन!
वळचणीचे पाणी आढ्याला
वळचणीचे पाणी आढ्याला
>>> इथे पाहा :
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A4%A3+
पाणी खालून वर जात नाही यावरून
पाणी खालून वर जात नाही यावरून लहानाला मोठे होणे अशक्य. >>>
हो, वाचले परंतु पाणी खालून वर जात नाही यावरून जो अर्थ ध्वनित होतो त्यावरून मोठ्याला लहान होणे अशक्य असे असावे काय?
द.सा. आणि स्वाती, सुंदर
द.सा. आणि स्वाती, सुंदर विवेचन >> +१
पाणी खालून वर जात नाही यावरून
पाणी खालून वर जात नाही यावरून जो अर्थ ध्वनित होतो
>>>> मला 'मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी' या मुक्ताबाईंच्या अभंगाची आठवण झाली. जे रोजच्या प्रपंचात असंभवनीय आहे ते आत्मज्ञानाने संभव झाले आहे. ते नेमकं किती असंभवनीय आहे हे वाचकांना कळावे म्हणून 'वळचणीचे पाणी आढ्याला' म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध शक्यतेची उपमा दिली आहे. उत्कट तरीही रोजच्या जीवनातील उपमांनी काव्यामागचा भाव पोचायला मदत होते. 'विश्वात्मक चैतन्याशी एकरूप झाले' या ओळीची यथार्थता पटायला सहजता येते. चूभूद्याघ्या.
स्वाती, छान विवेचन.
'वळचणीचे पाणी आढ्याला' म्हणजे
'वळचणीचे पाणी आढ्याला' म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध शक्यतेची उपमा दिली आहे. >>>
हो बरोबर आहे परंतु विरुद्ध शक्यतेची उपमा द्यायची असे तर "मोठ्याला लहान होणे अशक्य" अशी नको का?
माझ्या मते मुळातच तो
माझ्या मते मुळातच तो अन्वयार्थ (लहान/मोठा इ.) चुकीचा आहे.
अस्मिताने लिहिल्यानुसार जगरहाटी / सामान्यपणे अनुभवाला येणारा घटनाक्रम अशाबद्दलच ती उपमा वापरतात.
माझ्या मते मुळातच तो
माझ्या मते मुळातच तो अन्वयार्थ (लहान/मोठा इ.) चुकीचा आहे. +1
जरा विस्ताराने लिहायचा प्रयत्न करतेय, जमलंय की नाही कल्पना नाही.
--------------
इथं फक्त घटनाक्रम आहे, ठराविक entity नाही.
प्रापंचिक जड रूप- जे वळचणीच्या पाण्याप्रमाणे नेहमी खालच्या अवस्थेत असते, ते इतक्या (चैतन्याच्या) उच्चावस्थेत गेले की जणू आढ्याला जाऊन मिळाले. त्याचा अर्थ चैतन्य खाली येऊ शकत नाही म्हणून ते गेले असं नाही. दोन्ही भावावस्थांना दिलेल्या उपमाच आहेत. जसं 'मुंगी उडाली आकाशी' यात मुंगी नाही आणि आकाशही , फक्त मनाची अवस्था आहे. त्याचा अर्थ आकाश खाली येऊ शकत नव्हते म्हणून मुंगीला उडावं लागलं असाही नाही.
अणुरेणिया थोकडा | तुका आकाशाएवढा ||
- अणुरेणूच नाही तर सर्व अवकाश व्यापून उरावी अशी भावावस्था.
भौतिकदृष्ट्या लहान/मोठा किंवा खाली/वर असा अभिप्रेत असलेला अर्थ नाही यात. उपमा समजाव्यात म्हणून फक्त रोजच्या जीवनातील - भौतिक आहेत अर्थ मात्र पारमार्थिक आहे. पुन्हा चूभूद्याघ्या.
सगळं गाणं त्या हार्मनीबद्दलच
सगळं गाणं त्या हार्मनीबद्दलच आहे. आणि त्या 'यिन-यांग' / पुरुष-प्रकृती / दिवस-रात्र / सूर्य-चंद्र / सुष्ट-दुष्ट इत्यादी जोड्या आणि त्यांच्यातला तो समतोल >> ओह! जबरी.
वळचणीची चर्चाही आवडली.
*म्हणून फक्त रोजच्या जीवनातील
*म्हणून फक्त रोजच्या जीवनातील - भौतिक आहेत अर्थ मात्र पारमार्थिक आहे >>>
समजले.
धन्यवाद !
.. ..
उत्तम चर्चा ! सर्वांना धन्यवाद !!
काषाय व कषाय
काषाय व कषाय
दोघांमध्ये फक्त एका कान्याचा फरक आहे परंतु अर्थभिन्नता पाहण्यासारखी आहे :
काषाय = तांबडे; भगव्या रंगाचे (वस्त्र)
कषाय =
. तिखट (चुकीने कडवट).
. औषधी वनस्पतींचा काढा; अर्क
. कलुषित; बेरंग; विचलित (चित्तवृत्ती, तादात्म्य).
. काषायचा अपभ्रंश
रसास्वात् षट् मधुराम्ललवण कटु
रसास्वात् षट् मधुराम्ललवण कटु तिक्त कषाय !
मधुर, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय.
कषाय- तुरट
बहुतेक 'तुरट' असा अर्थ आहे. आम्हाला आवळ्याचे उदाहरण दिले होते.
तिक्त -तिखट
आम्ल -आंबट
लवण-खारट
कटु - कडू
ह्या अर्धवट श्लोकात हा शब्द पहिल्यांदा वाचला होता. 'ह्या सहा रसांच्या सेवनाने मनुष्य निरोगी रहातो' असं काही.
'काषाय' सुद्धा वाचला होता पण विस्मरणात गेला होता. बहुतेक 'काषाय' वस्त्रांतले योगी विवेकानंद- नक्की संदर्भ आठवत नाही.
अस्मिता
अस्मिता
सुरेख श्लोक. आवडलाच !
..
कषाय = तिखट (चुकीने कडवट)
असे बृहदकोश व या संदर्भातही दिलेले दिसते : https://educalingo.com/mr/dic-mr/kasaya
ते बघितले आणि मलाही तुमच्या
ते बघितले आणि मलाही तुमच्या लेखनाची खात्री असतेच.

मला 'कषाय' म्हणजे 'तुरट' किंवा इंग्रजीत 'pungent' जी चव आहे, त्याच्या जवळ जाणारा वाटायचा. त्यामुळे अर्क किंवा काढा जास्त योग्य वाटतंय. इतरं भाषाप्रेमी काय भर घालताहेत ते बघू.
>>>>>मलाही तुमच्या लेखनाची
>>>>>मलाही तुमच्या लेखनाची खात्री असतेच. Happy
+१ सेम हियर
हरकत नाही
हरकत नाही
आता चवींची पण कशी गंमत आहे बघा :
तुरटचा मूलभूत अर्थ तुरटीच्या चवीचा आणि खालील एक शब्दार्थ पहा :
अडुक = तुरट; कडू.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%9F+
या दोन्ही चवी समान अर्थी दिल्यात !
Pages