शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'लावण्या' म्हणजे शेजारीण नाही, शेजारणीचं नाव 'लावण्या' आहे. पिकांच्या लावणीचं अनेकवचन नाही, लावण्यवती अशा अर्थाने. Happy
बायदवे, तमाशाच्या लावणीचं अनेकवचन पण हेच आहे.

‘जरा’ वयात आल्यासारखी >> छान कोटी Happy

"फूले कास सकल महि छाई, जनु बरसा कृत प्रकट बुढाई"
यातील जरा डोळ्यापुढे आली.

फूले कास सकल महि छाई…
>>>> हे जरा माझ्यासारख्यांसाठी जरा विस्कटून सांगाच की ...

'लावण्या'चा उल्लेख आला, त्यावरून सहज -
सौंदर्य आणि लावण्य हे शब्द अनेकदा समानार्थी असल्यासारखे वापरले जातात. पण 'लावण्या'त 'लवण' म्हणजे क्षार किंवा 'स्पाइस' अभिप्रेत आहे. त्या अर्थी सौंदर्य म्हणजे beauty तर लावण्य म्हणजे appeal असं म्हणता यावं.

अनिंद्य हो.
कुमारसर, तुलसीदासांचे शरद ऋतूचे वर्णन आहे.
पांढऱ्या फुलांनी सृष्टी बहरली आहे जणु (जाणाऱ्या) वर्षाने जरा पांघरली आहे.

अर्थात पुढे पृथ्वी अजुन बहरणार आहेच।.

"पण 'लावण्या'त 'लवण'"
ओह! हे अजिबात माहीत/ध्यानात येइलसे नव्हते.

आता "अगणित लावण्य" हे मृत समुद्राचे वर्णन आहे असा दावा करायला लोक मोकळे.

मानव Lol

हो ना.. लावण्यात मिठाचा खडा कुठून पडला? Happy
सौंदर्य अशा अर्थी लावण्य असे म्हणायचे असेल तेव्हा लावंण्या असे लिहायला काय हरकत आहे? आपण तसाच उच्चार करतो ना?
बाकी
पेरण्या आणि लावणीचे अनेकवचन असेल तेव्हा..लावण्या लिहायचे!

>>'लावण्या'त 'लवण' म्हणजे क्षार किंवा 'स्पाइस' अभिप्रेत आहे.<< वाह स्वाती हे कधी लक्षात नव्हतं आलं, पटलच Happy थँक्स

पुण्ण्य
लावण्ण्य / लावण्ण्या

असे किती सोपे झाले असते.

आमच्या गुजराती मित्रांना आम्ही बोले तैसा चाले वगैरे म्हणतो. गुजराती उच्चार आणि गुजराती लिपीत लेखन सेम. नवशिक्यांना सोपे Happy

उदा.
Hair = हेर = હેર
Deluxe = डिल़क्ष = ડિલક્ષ

आंध्र प्रदेशात ट्रेन स्टेशन वर नाव लिहिताना आकारांत गावांची नावे हिंदीत लिहितात ती अकारांत लिहिलेली असतात

उदा काकिनाडा उच्चारी पण तेलुगुमधे आणि हिंदीत काकिनाड असे लिहिलेले असते. कन्नड भाषेत सुद्धा तुळुनाड, मलयनाड असे लिहिले असते पण त्याचा उच्चार तुळूनाडु मलयनाडु. असा असतो.

अवांतर : लग्नपत्रिकेत माझे नाव देखील अकारांत लिहिले होते :इतक्या कालावधी नंतर देखील रुसकी बाहुली :

अतीच अवांतर - अमराठी लोक आणि मराठी असून इंग्रजी माध्यमात शिकणारी चिल्लर पार्टी घराच्या पाटीवरची नावे गोल्डीबोल्डी ( गोडबोले ) आणि टालपेड ( तळपदे ) वाचत असत

लावण्या चा अजून एक अर्थ:
इतके फोटो आहेत भिंतीवर, की नवीन लावण्यासाठी जागाच उरलेली नाही.

२००० च्या आसपास काही वर्षे अहमदाबादमध्ये आमचे एक ठरलेले हॉटेल होते.
पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा बाथरूम मध्ये अंघोळीच्या नळा भोवती वक्राकार "ull Sawar" अशी अक्षरे लाल चिकट पट्टीतून कापून चिटिकवली होती.

त्या पहिला P गळुन पडलाय हे लगेच कळले.
पण ते Sawar म्हणजे सावर आहे, आणि तो शॉवरचा गुजराती उच्चार आहे, यांना Pull the knob for shower म्हणायचे आहे हे कळायला बराच वेळ लागला आणि कळले तेव्हा हसुन हसुन "हैराण" झालो होतो.

Lol

आम्ही इथे एका सौदिंडियन रेस्टॉरन्टमध्ये गेलेलो असताना माझ्या मुलाने लिंबाच्या एक्स्ट्रा फोडी मागितल्यावर तो वेटर 'यू लाइक टु शॉवर?' असं विचारता झाला. माझी कल्पना 'इतकं लिंबू कशाला हवं आहे? त्याने अंघोळ करायची आहे का?!' असं काहीतरी खवचट बोलतो आहे की काय अशी झाली.
(आपणावरोनी जग ओळखावे! Proud )
पण ते '(oh) you like (it/your food) too sour!' असं होतं असं आमच्या बर्‍याच वेळाने लक्षात आलं. Proud

आंबट

तेव्हा माझे औषधी ज्ञान शून्य होते.
वलसाडला डोके खूप दुखत होते म्हणुन औषधांच्या दुकानात जाऊन जाहिरातीतील नाव आठवून दोन सॅरिडॉन मागितल्या.
दुकानदाराला कळलेच नाही. मग मी सर दर्द की गोली दो सांगीतले.
तो मग विचार करत वळला आणि तेवढ्यात त्याला स्ट्राईक झाले. मागे वळून म्हणाला " ओह, सेsरी.डोssन चाहीये?" मी मान हलवली. "तो ऐसे बोल ना भाई!" असे म्हणुन त्याने सॅरिडॉन आणली.

लावण्यातलं 'लवण' अजिबात माहिती नव्हतं. ( समुंदर में नहा के ? Happy )
अनुच्या हिंजवडी चावडीच्या एका भागात एका मुलीचं नाव लावण्या आहे आणि ती ते 'लावण्ण्या' असं ठासून सांगते बहुतेक.
ull Sawar Lol

जरा जरा बहकता है, ‘जरा’ वयात आल्यासारखी, लावण्या, अगणित लावण्य, ull Sawar, यू लाइक टु शॉवर... हा धागा (इथल्या) "रातोरात" धमाल झाला. सगळेच भारी! लावण्य - लवण संबंध कधी लक्षात नव्हता आला.

Pages