Submitted by हेमंतकुमार on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिलाचा तगादा नसून.. दिलाचा
बिलाचा तगादा नसून.. दिलाचा तगादा वाटला असेल...

पोटिमा दिलाचा तगादा
पोटिमा
दिलाचा तगादा
पोटिमा हा खरं तर पारंपरिक
पोटिमा हा खरं तर पारंपरिक शब्द आहे. आमची आजीही वापरत असे हा शब्द.
लहान मुलींचे परकरपोलके असे पूर्वी. तर कालांतराने उंची वाढली की लहान मुलींना चिडवलं जाई. " आता पोटिमा झालं परकरपोलकं, नवीन शिवायला हवं आता" असं म्हणत
लहान मुलींचे परकरपोलके असे
लहान मुलींचे परकरपोलके असे पूर्वी>>
हं, आता लिंक लागली.
पोटिमा हा खरं तर पारंपरिक
पोटिमा हा खरं तर पारंपरिक शब्द आहे
>> त्याची बृहदकोशातील नोंद पाहता हे बरोबर आहे. कालांतराने त्याचे ते मजेशीर दीर्घरूप खांबेटे यांनी केलेले आहे.
दर्शक / प्रेक्षक
दर्शक / प्रेक्षक
मराठी भाषेत हे शब्द एकाच अर्थी वापरण्यावरून अनेक पुस्तकांतून आणि व्यासपीठांवरून यापूर्वी टीका झालेली आहे. परंतु बृहदकोशातील खालील नोंद पहा (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%...)
दर्शक =
वि. १. दाखविणारा; सांगणारा. २. (बीजगणित) घातप्रकाशक. ३. पाहणारा; प्रेक्षक; परीक्षक. ४. शास्त्र; कला इ. जाणणारा; तज्ज्ञ; मर्मज्ञ. [सं.]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
ही नोंद पाहता मराठीत सुद्धा दर्शक = प्रेक्षक असे बरोबर आहे असे दिसते. याचा अर्थ हिंदीच्या आक्रमणामुळे मराठीत दर्शक ( प्रेक्षक या अर्थी ) वापरला जाऊ लागला असे म्हणणे बरोबर आहे का ?
यावरून असे वाटते :
(मार्ग) दर्शन घडवणारा जसा दर्शक, तसेच
दर्शन करणारा सुद्धा दर्शक, असे वरील कोशकारांना अभिप्रेत असावे का ? त्यांनी संदर्भ दिलेला कोश तर अलीकडच्या काळातील असणार. तिथे त्यांनी हा अर्थ (क्र ३ चा ) हिंदीतून आला असे म्हटलेले नाही.
विषय पुन्हा एकदा चर्चेसाठी ठेवतो आहे.
पण यात १. दाखविणारा आणि ३.
पण यात १. दाखविणारा आणि ३. पाहणारा, प्रेक्षक
असे परस्पर विरोधी अर्थ कसे काय दिले आहेत?
हे कोश लिहून तयार झाल्यावर पुन्हा कुणी ( थर्ड पार्टी!) भाषातज्ज्ञ तपासून पाहतात का?
अशी शंका वाटते.
कोशाच्या त्या पानावर दिलेले
कोशाच्या त्या पानावर दिलेले चारही शब्दकोश हे दोन्ही अर्थ देत आहेत हे सुद्धा एक विशेष. ते कोश वेगवेगळ्या काळात तयार झालेले आहेत.
अजून एक गमतीचा भाग म्हणजे इथल्या हिंदी कोशातही दोन्ही अर्थ दिलेले आहेत :
दर्शक
विशेषण
1.
देखनेवाला, द्रष्टा।
2.
दिखानेवाला , निर्देश करनेवाला (जैसे—मार्गदर्शक, दिग्दर्शक)
https://www.google.com/search?q=%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%...
बाहुली की भावली? (संदर्भ :
बाहुली की भावली? (संदर्भ : पॉलीअॅनाची कथा!
)
समानार्थी.
समानार्थी.
भावला, भावली = बाहुली, (बाहुला पहा.)
शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)
सूर्य : ५२ समानार्थी शब्द
रवि, भानु, भान, प्रभाकर, सविता, सवन, वासरमणि, दिनमणि, दिनपति, दिनेश
तमारि, तमोहर, तपन, उष्णांशु, उष्णमाळी, विकर्तन, विवस्वत्, विवस्वान्, आदित्य, आदित,
भास्कर,भास्वत्, मार्तंड, अर्क, सविता, मिहिर, मित्र, पूषा, सूर, अकूपार,
अंशुमाळी, अर्चिष्मान, अरुणसारथी, अर्यमा, चंडकर, चंडकिरण, चंडारा, चंडांशु, छायारंग, द्युमणि
गभस्ति, गगनदीप, गगनमणी, हेलि(ळी, ळु), किरणमाली, दिवाकर
अफताब, आफताब,आफताग, खुर्शीद, मेहर, शम्स ( हे अरबी /फारसी, इत्यादी मराठी शब्दकोशात आहेत)
. . . ? भर घालू शकता.
सूर्य : समानार्थी खग ?
सूर्य : समानार्थी
खग ?
खग म्हणजे पक्षी.
खग म्हणजे पक्षी.
>>> सूर्य : समानार्थी खग ?
>>> सूर्य : समानार्थी खग ?
हो, सूर्यनमस्कार घालताना म्हणायच्या बारा नावांमध्ये खग आहे.
मित्र रवि सूर्य भानु खग पूष हिरण्यगर्भ मरिचि आदित्य सवित्रार्क (सवितृ,अर्क) भास्करेभ्यो नमो नमः।,
भारीच.
भारीच.
मित्ररविसूर्यभानुखगपूषहिरण्यगर्भमरीच्यादित्यसवित्रार्कभास्करेभ्यो >> इतरेतर द्वंद्व समास होऊन तो एक शब्द आहे. Floccinauci...Supercalifragilistic...Hippopotomonstro...इत्यादी शब्दांच्या तोंडात मारायला बरा आहे.
तरणि असा शब्द आहे का
तरणि असा शब्द आहे का सूर्याला?
खग >>> छान !
खग >>> छान !
त्याचे दोन अर्थ आहेत :
१. पक्षी
२. आकाशातील ज्योती (सूर्य, नक्षत्र, ग्रह इ.).
[सं. ख = आकाश. ग = गमन करणारा.]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
तरणि +१
तरणि +१
दोन अर्थ.:
= सूर्य, जहाज
बृहदकोश
सहस्ररश्मि म्हणजे सूर्य असं
सहस्ररश्मि म्हणजे सूर्य असं ऐकलं होतं.
‘तिन्हिसांजा सखे मिळाल्या’
‘तिन्हिसांजा सखे मिळाल्या’ गीतात कनकगोल (सोन्याचा गोळा) आणि मरिचीमाली अशी दोन नावं वापरलीत भा. रा. तांब्यांनी.
‘मरिची’ म्हणजे प्रकाशकिरण - ‘किरणांची माला ल्यायलेला’ तो मरिचीमाली.
ह. पा.
ह. पा.
पण ही इतकी लांबलचक शब्दाची गाडी चालवायची कधी म्हणते मी!
सहस्ररश्मि
सहस्ररश्मि
कनकगोल
मरिचीमाली >>>
सर्व छान !
आता एकूण 57 शब्द झाले.
नवग्रहस्तोत्रात ‘महद्युति’
नवग्रहस्तोत्रात ‘महद्युति’ म्हटलंय - तेजस्वी.
‘तेजोनिधी लोहगोल’ हेही दोन ॲड करा - साठ झाले.
कनकगोल (सोन्याचा गोळा) आणि
कनकगोल (सोन्याचा गोळा) आणि मरिचीमाली अशी दोन नावं वापरलीत भा. रा. तांब्यांनी.
>>> खरंच की. आठवलं नाही नेमकं.
'तापणी' शब्दाचा अर्थही सूर्य आहे बहुतेक. पण खात्री नाही.
>>> पण ही इतकी लांबलचक
>>> पण ही इतकी लांबलचक शब्दाची गाडी चालवायची कधी म्हणते मी!
ती ‘चीट शीट’ आहे.
१२ सूर्यममस्कार घालताना प्रत्येकी एक नाव उच्चारून (ॐ मित्राय नमः, ॐ रवये नमः इ.) एक नमस्कार घालायची पद्धत आहे.
‘चीट शीट’ >> हो अगदीच
‘चीट शीट’ >> हो अगदीच
कनकगोल (सोन्याचा गोळा) आणि मरिचीमाली अशी दोन नावं वापरलीत भा. रा. तांब्यांनी.>>> खरंच की. आठवलं नाही नेमकं. >>>> +१
मरीचि म्हणजे प्रकाशकिरण किंवा प्रभा. सोन्यासारख्या कांतीमुळे जो मरीचिप्रमाणे उजळून गेला होता तो 'मारीच' असावा. नो वंडर की तो सीतेला सोन्याचं हरीण वाटला.
‘मारीच’चा हा अर्थ
‘मारीच’चा हा अर्थ इन्टरेस्टिंग आहे.
‘मरीच’ म्हणजे मिरी (ब्लॅक पेप्पर) असं वाचल्याचं त्यावरून आठवलं - पण त्याचा काही संबंध दिसत नाही.
अच्छा. मग मिरची हा शब्द मरीच
अच्छा. मग मिरची हा शब्द मरीच (= मिरी) या शब्दावरूनच आला असावा. चक्कीच्या गिरणीत लाला बॅडगी मिरच्या दळून तिखट काढून देणारा गिरणीवाला मरीचमाली होत असावा. शिवाय दिवसभराच्या घरघरीनंतर संध्याकाळी चक्की बंद केल्यावर "चक्र जाड हे पवित्र ये जी शांत गभीर निशा" हे ही आपसूक आलंच.
मारीच नाव होते मग आधी राक्षस
मारीच नाव होते मग आधी राक्षस असतानाही सोन्यासारखा झळाळायचा की हरीण झाल्यावरच सुवर्णमृग झाला.
रुक्मिणी आणि रुक्मी पण सोन्यासारखे होते म्हणतात तसा काही विको टरमरिक प्रकार असावा.
हर्पा
हर्पा
गिरणीवाला मरीचमाली होत असावा. >>> आता मला MDH देगी मिरची वाले आजोबा आठवले.
Pages