शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाघनखी >>> झाड बरोबर, पण ते वाद्य नाही.
+ शब्द ३ अक्षरी. शब्दाचा अर्थ वाघ असा आहे; शब्दात वाघ नाही

शार्दूल / ळ
वा ! बरोब्बरच !!
..

शब्द गोड आहे ; त्या शब्दावरूनचे कवितेतले वृत्त शालेय जीवनात झालेले होते.

ह्या शब्दाचा फक्त 'वाघ' हा अर्थ माहित होता. मी पिपाणी, दुंदुभी वगैरे शोधत बसले. 'तुतारी' कविताही पुन्हा वाचली. Happy

वाद्य काय आहे >>>
वाद्य पाहण्यासाठी मी बराच गुगलशोध घेतला परंतु काही सापडलेले नाही. बृहदकोशातली वाद्य एवढीच नोंद पाहिली.

मानव पृथ्वीकर यांना त्यांच्या कोडी सोडवण्याच्या हतोटीमुळे कूटशार्दूल ही पदवी देण्यात आहे. शिवाय ते शब्दांचा काथ्याकूटही आवडीने करतातच. Wink

ऋतुराज Happy
उत्तिष्ठ नरशार्दूल झाले , आता उत्तिष्ठ गरुडध्वज येईल....

कूटशार्दुल, आवडले. मिक्सरच्या ब्रॅंडलाही पर्फेक्ट नाव आहे. इथल्या 'निन्जाला' टक्कर देईल.

उत्तिष्ठ नरशार्दूल झाले , आता उत्तिष्ठ गरुडध्वज येईल....

हे मी मनातल्या मनात म्हटले आणि बिंगो .. इथे सेम प्रतिसाद Happy

म,स, ज,स,त,त,ग … ते ही आठवले

कूटशार्दूल ही पदवी - अद्भुत !

मला वाटतं बापट कोशातला वाद्य हा अर्थ वाघ चा टायपो असावा. कारण तिथे वाघ हा अर्थ दिलेला नाही.
लॉजिकल एक्स्प्लनेशन हेच वाटतं.

Happy कुमार सर..
तुमच्याकडे हे सगळे कोश कायम टेबल वरच पडून असतात का? जाडजूड असतील ना बाडं ?

>>> बापट कोशातला वाद्य हा अर्थ वाघ चा टायपो असावा.
हो, मलाही तसंच वाटतंय.

>>> कूटशार्दूल Lol

चांगल्या चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद !

१. वाद्य / वाघ मुद्रणदोष हा मुद्दा नव्याने पुढे आला. छान.

२. कोश कायम टेबल वरच पडून असतात का? जाडजूड असतील ना बाडं ?
>>
आंतरजाल पूर्वकाळात आमच्याकडे सुमारे डझनभर छापील शब्दकोश होते आणि ते अक्षरशः घरभर विखुरलेले असायचे (https://www.maayboli.com/node/62893?page=16).
आता त्यातले फक्त तीन ठेवले आहेत. ते सामान्य आकाराचे आहेत. बृहदकोशामुळे ( आणि इंग्लिश तर अनेक ) आता जालावरच बघायची सोय चांगली आहे.

आजच्या (22 एप्रिल) जागतिक वसुंधरा दिनानिमित्त . . .

पृथ्वी
५६ समानार्थी शब्द सापडलेत ! त्यापैकी ३ एकाक्षरी आहेत :
भू, कु, क्ष्मा
भूमि, , सूर्यमालेमधील तिसरा ग्रह, माती, वसुधा, वसुंधरा, दुनिया, दुनया, दुनियाई, दुन्याई, अलंदुनिया,

पृथिवी/ मी, प्रिथिवी, कुंभिनी, जग, विश्व, इहलोक, धरणीमाता, भूमाता, अचला, अदिति/ती,

धरा, धरणी, धरित्री, जमीन, अवनि, मेदिनी, भूतल, अवनितल, भूलोक,

भूंय, धात्री, धन्नी, धरातल/ळ, धरतरी, ध्रुवा , इला, जहान, जगत्, सृष्टि,

क्षिती,, क्षोणी, खिति, लोक, मही, रेवा, रसा, श्रोणवी,

उर्वी, उर्वीमंडळ,भूमंडल, वसुमती, पिरतुम, पिर्थुम्.

. . . भर घालू शकता. बघता बघता पृथ्वीला ‘ज्येष्ठ‘ करून टाका !

इरा?

Pages