Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाघनखी एक वेल असते बरोबर?
वाघनखी एक वेल असते बरोबर?
वाघनखी >>> झाड बरोबर, पण
वाघनखी >>> झाड बरोबर, पण ते वाद्य नाही.
+ शब्द ३ अक्षरी. शब्दाचा अर्थ वाघ असा आहे; शब्दात वाघ नाही
शार्दूल
शार्दूल/ळ
शार्दूल / ळ वा ! बरोब्बरच !!
शार्दूल / ळ
वा ! बरोब्बरच !!
..
शब्द गोड आहे ; त्या शब्दावरूनचे कवितेतले वृत्त शालेय जीवनात झालेले होते.
या नावाचं झाड आणि वाद्य आहे?
या नावाचं झाड आणि वाद्य आहे?
होय, बृहदकोश पहा .
होय, बृहदकोश पहा .
धन्यवाद. कृपया लिंक द्याल का
धन्यवाद. कृपया लिंक द्याल का ? मला वाद्य काय आहे त्यात रस आहे.
ह्या शब्दाचा फक्त 'वाघ' हा
ह्या शब्दाचा फक्त 'वाघ' हा अर्थ माहित होता. मी पिपाणी, दुंदुभी वगैरे शोधत बसले. 'तुतारी' कविताही पुन्हा वाचली.
पिपाणी
पिपाणी

वाद्य काय आहे >>>
वाद्य काय आहे >>>
वाद्य पाहण्यासाठी मी बराच गुगलशोध घेतला परंतु काही सापडलेले नाही. बृहदकोशातली वाद्य एवढीच नोंद पाहिली.
अक्षरशः पिपाणी वर अर्धा तास
अक्षरशः पिपाणी वर अर्धा तास घालवला, का ते मलाही माहित नाही.
उत्तिष्ठ नरशार्दूल वाद्यनाम्
उत्तिष्ठ नरशार्दूल वाद्यनाम् संशोधनम्.....
मानव पृथ्वीकर यांना त्यांच्या
मानव पृथ्वीकर यांना त्यांच्या कोडी सोडवण्याच्या हतोटीमुळे कूटशार्दूल ही पदवी देण्यात आहे. शिवाय ते शब्दांचा काथ्याकूटही आवडीने करतातच.
कूटशार्दूल ही पदवी देण्यात
कूटशार्दूल ही पदवी देण्यात आहे >>>> +१११
ऋतुराज
ऋतुराज
उत्तिष्ठ नरशार्दूल झाले , आता उत्तिष्ठ गरुडध्वज येईल....
कूटशार्दुल, आवडले. मिक्सरच्या ब्रॅंडलाही पर्फेक्ट नाव आहे. इथल्या 'निन्जाला' टक्कर देईल.
डरकाळी सारखा आवाज येणारे
डरकाळी सारखा आवाज येणारे वाद्य असावे.
उत्तिष्ठ नरशार्दूल झाले , आता
उत्तिष्ठ नरशार्दूल झाले , आता उत्तिष्ठ गरुडध्वज येईल....
हे मी मनातल्या मनात म्हटले आणि बिंगो .. इथे सेम प्रतिसाद
म,स, ज,स,त,त,ग … ते ही आठवले
कूटशार्दूल ही पदवी - अद्भुत !
अनिंद्य
अनिंद्य
मला वाटतं बापट कोशातला वाद्य
मला वाटतं बापट कोशातला वाद्य हा अर्थ वाघ चा टायपो असावा. कारण तिथे वाघ हा अर्थ दिलेला नाही.
लॉजिकल एक्स्प्लनेशन हेच वाटतं.
कुमार सर..
तुमच्याकडे हे सगळे कोश कायम टेबल वरच पडून असतात का? जाडजूड असतील ना बाडं ?
>>> बापट कोशातला वाद्य हा
>>> बापट कोशातला वाद्य हा अर्थ वाघ चा टायपो असावा.
हो, मलाही तसंच वाटतंय.
>>> कूटशार्दूल
मोरोबा सहमत.
मोरोबा सहमत.
बापट कोशातला वाद्य हा अर्थ
बापट कोशातला वाद्य हा अर्थ वाघ चा टायपो असावा >> खतरनाक!
बापट कोशातला वाद्य हा अर्थ
बापट कोशातला वाद्य हा अर्थ वाघ चा टायपो असावा >>
चांगल्या चर्चेबद्दल सर्वांना
चांगल्या चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद !
१. वाद्य / वाघ मुद्रणदोष हा मुद्दा नव्याने पुढे आला. छान.
२. कोश कायम टेबल वरच पडून असतात का? जाडजूड असतील ना बाडं ?
>>
आंतरजाल पूर्वकाळात आमच्याकडे सुमारे डझनभर छापील शब्दकोश होते आणि ते अक्षरशः घरभर विखुरलेले असायचे (https://www.maayboli.com/node/62893?page=16).
आता त्यातले फक्त तीन ठेवले आहेत. ते सामान्य आकाराचे आहेत. बृहदकोशामुळे ( आणि इंग्लिश तर अनेक ) आता जालावरच बघायची सोय चांगली आहे.
मोरोबा, सही पकडे है !
मोरोबा, सही पकडे है !
आजच्या (22 एप्रिल) जागतिक
आजच्या (22 एप्रिल) जागतिक वसुंधरा दिनानिमित्त . . .
पृथ्वी
५६ समानार्थी शब्द सापडलेत ! त्यापैकी ३ एकाक्षरी आहेत :
भू, कु, क्ष्मा
भूमि, , सूर्यमालेमधील तिसरा ग्रह, माती, वसुधा, वसुंधरा, दुनिया, दुनया, दुनियाई, दुन्याई, अलंदुनिया,
पृथिवी/ मी, प्रिथिवी, कुंभिनी, जग, विश्व, इहलोक, धरणीमाता, भूमाता, अचला, अदिति/ती,
धरा, धरणी, धरित्री, जमीन, अवनि, मेदिनी, भूतल, अवनितल, भूलोक,
भूंय, धात्री, धन्नी, धरातल/ळ, धरतरी, ध्रुवा , इला, जहान, जगत्, सृष्टि,
क्षिती,, क्षोणी, खिति, लोक, मही, रेवा, रसा, श्रोणवी,
उर्वी, उर्वीमंडळ,भूमंडल, वसुमती, पिरतुम, पिर्थुम्.
. . . भर घालू शकता. बघता बघता पृथ्वीला ‘ज्येष्ठ‘ करून टाका !
इरा
इरा?
अवनी.
अवनी.
क्षमा
क्षमा
Pages