शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राक्षस असतानाही सोन्यासारखा झळाळत असणार असा माझा कयास आहे. त्या क्वालिफिकेशनमुळे त्याची नेमणूक हरीण-हरण प्रकरणात झाली.

टरमरिक आणि MDH Lol

मला वाटलं मिरच्यांची शेती करणारा तो मरीच-माळी/ली. Proud

सूर्यापासून हळद-मिरचीपर्यंत >>
धमाल व उत्तम चर्चा !
..
साठ झाले.>>>
चला, सूर्याला आपण 'ज्येष्ठ' तर करून टाकलं. आता तो सत्तरी गाठतोय का ते बघूया Happy
विश्वाच्या पसाऱ्यात वयाने तो जेमतेम पस्तीशीतला आहे म्हणे !

मृगजळाला ‘मरिचिका’ असा शब्द वापरलेला दिसला - या मृगाचा त्या मृगाशी काही (मार्गरायण? Proud ) संबंध असेल का? Happy

मारीच ॲनिमॅगस होता म्हणजे. Happy

>>> सूर्याला आपण 'ज्येष्ठ' तर करून टाकलं.
Happy

सहस्ररश्मि - हिंदीत खूपदा येतो, महादेवी वर्मा, जयशंकर प्रसाद, निरालाजींच्या लेखनात. मराठीत नाही वाचला.

मरिचीमाली ! सुंदर शब्द.

सूर्य नमस्काराची चीट शीट Happy

गिरणीवाला / मिरच्यांची शेती करणारा तो मरीचमाली Lol

रुक्मिणी आणि रुक्मी विको टरमरिक Lol

जेष्ठ सूर्य, मार्गरायण संबंध Lol

माबोकरांची प्रतिभा ओसंडून वाहते आहे मार्तंड कृपेने!

मार्तंड कृपेने! >>> अगदी !
..

आतापर्यंतची साठ नावे ही सूर्य याअर्थीच प्रमाणशब्द म्हणून नोंदलेली आहेत.
धार्मिक दृष्टिकोनातून सूर्याची गुणवर्णनात्मक १०८ "नावे" इथे पाहता येतील :
https://divinemarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%...

राक्षस असतानाही सोन्यासारखा झळाळत असणार असा माझा कयास आहे. त्या क्वालिफिकेशनमुळे त्याची नेमणूक हरीण-हरण प्रकरणात झाली.
Lol
सगळीच चर्चा एकदम धमाल.
मायबोलीकर खूपच हुशार आहेत !
मला अगदी मित्र मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये बसून गप्पा मारल्यासारखे वाटते...
It makes my day !

मार्गरायण, ज्येष्ठ सूर्य>>> Lol
सूर्य आता ज्येष्ठ झाल्याने उषेकडून संध्येकडे अर्ध्या तिकिटात जाईल, ज्येष्ठांना प्रवासात सूट आहे.

मृगजळाला ‘मरिचिका’ असा शब्द वापरलेला दिसला ->>>
ॲनिमॅगसला आपल्याकडे 'मायावी' म्हणतात की Happy
मृगजळ हेही आभासी- मायावी शिवाय misleading असते. त्यामुळे जुळते आहे असे वाटतेय.

अनिंद्य, हेही मार्तंड 'तापहीन'. Happy
सहस्ररश्मि हा हिंदी साहित्यात अधिक आढळतो, खरं आहे.

चला,
सूर्यपुराणाची आता सांगता झाली असे म्हणता येईल !

बरं घ्या . . . आता शब्द ओळखायला देतो :
त्याचे तीन अर्थ :
एक झाड
एक वाद्य आणि
एक जंगली प्राणी

बस ! सध्या एवढीच माहिती पुरे.
किती अक्षरी ते देत नाही. पर्यायी उत्तर आले तरी चालेल . . .

>>> दिनकर हा साधा सोपा शब्द कोणीतरी लिहील म्हणून वाट बघत होतो.
तुम्ही लिहाल म्हणून आम्ही वाट बघत होतो. Proud

दिनकर झाला होता. कुमार सरांनी मोठी यादी दिली आहे वरती. तेजोनिधी लोहगोल वगैरे राहिलं असावं. पण आता सांगता झाली म्हणून सांगता तर नवीन कोड्याचं उत्तर सांगता येईल का ते बघतो.

दिनूचे बिल >> Lol

ओ सॉरी.
रिक्षावाल्यांचा मित्र Lol

प्रयत्न करतो.

उंदीरमारी किंवा गिरिपुष्प या झाडाला बंगालीत सारंग म्हणतात (असं गुगलने सांगितलं). सारंग म्हणजे हरीण. सारंगी हे एक वाद्य आहे. शिवाय सारंगी एक मासासुद्धा आहे.

आतापर्यंतचे प्रयत्न चांगले झालेले आहेत.
ओळखायच्या शब्दाच्या तिसऱ्या अक्षरावर अपभ्रंश झालेला असून त्यामुळे त्याची दोन रुपे आहेत.
शब्दाला कुठलाही प्रत्यय न लावता ( मूळ जसा आहे तशाच स्वरूपात) तीन अर्थ आहेत.

चिकारा / चिकाडा
चिकारा सतारी सारखे वाद्य
चिकारा = काळवीट
चिकाडा एक दुधाळ चीक देणारी वनस्पती

अपेक्षित शब्दातला प्राणी वाघ आहे.
कोणाला शब्दासाठी प्रयत्न करायचा असल्यास करू शकता. नाहीतर जरा वेळाने उत्तर लिहीन.

Pages