मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी यांचं वजन उचलून चालतो आहे असं विशालने विकास, सोनाली , मीनलबद्दल म्हटलं होतं; तेही जयला. खरं तर जय उत्कर्ष , मीरा, गायत्री, स्नेहा, दादूस इतक्यांचा भार उचलून चालत होता.

उत्कर्षने १०० दिवसांत कधी चार खणखणीत वाक्यं बोलल्याचं आठवत नाही. कायम जयच्या आडून सेफ खेळत राहिला . सगळ्यांशी खोटं गोड बोलत राहिलात. जयला कधीही चुकतोस असं सांगायची हिंमत केली नाही. जेव्हा मीरा, गायत्री चिडल्या होत्या तेव्हा त्यांनाच गप्प रहा, जाऊ दे यापेक्षा जास्त काही सांगता आलं नाही. उलट त्या आपल्याशी बोलताहेत त्यामुळे जय चिडेल म्हणून घाबरला होता. विकासने मात्र विरुद्ध बाजूच्या किंवा आपल्याही लोकांविरोधात आवाज काढला.

या सीझनबद्दल बोलायचं तर टीम बी खणखणीत जिंकली. पंधरात ते पाच जण होते - आविष्कार नॉन पर्फॉर्मिंग. तोही शेवटी टीम ए कडे झुकू लागला आणि गेला. शिवलीला आणि तृप्ती सोडल्या तर बाकी आठ जण जयला चिकटून होते. तृप्तींनीही संचालक म्हणून टीम ए च्या बाजूने पक्षपाती खेळ केला. सुरेखाने तर टीम बी मधून खेळताना गेम सोडून देऊन टीम बीच्या टास्कस हरण्याची सुरुवात करून दिली.

पंधरात पाच ते आठमध्ये , सातमध्ये चार . सोनालीने गायत्रीला, मीनलने मीराला, विकासने उत्कर्षला आणि विशालने जयला हरवलं.
मीनलची इमेज शेवटच्या दोन आठवड्यांत पार खराब करून टाकली. सोनालीने बिन्डोकपणा केला नसता तर ती मीरा, उत्कर्षला मागे टाकून टॉप पाच मध्ये येऊ शकली असती.
बाकी सगळ्यांच्या काही ना काही पॉझिटिव्ह गोष्टी, हॅपी मू मेंट्स दिसल्या. मीरा मात्र कायम रडकी चिडकीच दिसली.

ट्विटर कमेंट्स आणि पाहुण्यांच्या सांगण्यावरून विकास अनेकांचा फेवरिट होता असं दिसलं. मी त्याला सेव्ह करण्यासाठी व्होट केलं तरी तो विनर होईल असं वाटत नव्हतं; ते वाटू लागलं होतं. पण एकाच टीमचे दोघे टॉप टू होणं कठीण.

मागच्या दोन सीझनमधले स्पर्धक खूप काही करताना दिसत आहेत का? रूपाली सध्या दिसतेय. आस्तादची एक मालिका होती. वीणाला बदली कलाकार म्हणून रोल मिळाला तोही तिला सोडावा लागला.

खरं तर रियलिटी शो मधल्या किती लोकांना त्याचा पुढे फायदा होतो? उत्कर्षला मनोरंजना च्या क्षेत्रात करियर करायचं असेल तर घरूनच लाँच करतील. जयला लीडमधला मुद्राभिनय आणि संवादफेक जमणार आहे का? चिमणी च्या तोंडाचा बाजीराव इमॅजिन करता येत नाहीए.

कोण जय बाजीराव ? Rofl जय ला अ‍ॅक्टिंग मधला अ सुद्धा जमत नाही, ममांचा प्लान काय आहे ते त्यांनाच माहित.
उत्कर्ष नुस्ता खोटारडा, अन जयचा मिंधा होता. पण त्याने ते मास्टर माइंड टायटल फारच सिरियसली घेतले आहे बहुतेक. मी नक्की राजकारणात येणार असे म्हटला Happy

गायत्री बाहेर पडली त्या दिवशीच हे क्लिअर होते की यापुढे चॅनेलच सर्व निर्णय घेणार, प्रेक्षक फक्त टाळ्या वाजवायला.
मिनल सारख्या चांगले खेळाडूंनी मराठी बिग बॉस मध्ये येऊ नये, त्यांचे टॅलेंट वाया जाईल.
महेश मांजरेकरांची रिप्लेसमेंट शोधा आता.
मीराबाई बाहेर आल्यावर पण तोंड पाडून का बसली होती. नीताला झीरो अटेंशन मिळाले.
जयच्या आई वडीलांनी पदरचे पैसे खर्च करून फ्लेक्स लावले होते. त्याच्यासाठी पब्लिक सपोर्ट कुठल्याही फेसबुक पेजवर दिसत नव्हता. पण हेही आहे की ए टीम त्याने अस्तित्वात आणली आणि कंट्रोल केली.
इतरांसाठी प्रमोशन उत्स्फूर्त वाटले.
रुपाली भोसले हिंदी सिरीज मध्ये लिड रोल करायची. बिग बॉस आणि अभिनय दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मांजरेकर उगाच बोलायचे म्हणून बोलत असतील. शिवला बोलू नाही दिले हे बरेच केले.
पुढचा सिझन कधी?

बाजीराव म्हणून उत्कर्ष?
नाही हो नाही. नाही शोभणार तो.
परत एकदा रविंद्र मंकणीला तरूण करून आणायला हवं.

कोण जय बाजीराव ? Rofl जय ला अ‍ॅक्टिंग मधला अ सुद्धा जमत नाही,... नाचताना पण विचित्र नाचत होता. शाळेत पी टी कवायत करतात तसे. त्याने आता रोडीज, आणि सिमिलर शोज करावेत. त्याच्या डब्ल्यू डब्ल्यू एफ शरीरयष्टीचा तिथे चांगला उपयोग होईल.

भरत +१
मैत्रीयी अगदी अगदी! जयला अ‍ॅक्टिन्ग येत नाही अजिबात, त्याची त्याला काही एक्साइन्ट्म्नेटही दिसली नाही, ए टिम समर्थक सोमीवर एकमेकाच सात्वन करत होते, अरे जिन्कले नाहि तरी जय-उक्त्याला रोल ऑफर केला , रोल ऑफर केला पण असे आश्वासन खुप जण देतात, फिनाले मधे उत्क्याने मस्का मारु मारु ममाना पार बनमस्कापाब केल होत.
मिरा फिनाले मधे खुप शान्त शान्त वाटत होती, तिच्यात कणभरही लाइव्हलीनेस दिसत नव्हता, बाहेर आल्यावर बहुधा आपण काय चुका केल्या हे रियलाइझ झाल असेल, जयने एकदाही स्नेहाच्या विरोधात ब्र काढला नाही ज्यामुळे तो क्लिन दिसतोय हे त्याला माहिती आहे, वयाने लहान आहे पण समज आहे अजुन, विशाल भाउ सुद्धा स्नेहावर भाळले होते वाटत , ममाची सुद्धा स्न्हेहा विशेष लाडकी होती त्यामुळे तिला नेहमी सॉफ्टलीच रागवायचे
पण घरात आली तेव्हा सगळ्यानी तिला वाळीतच टाकले होते वाटत.
उत्क्या तेव्हाही स्नेहाचे कान भरत होता, कमाल काडीमास्टर आहे हा!

विशाल भाउ सुद्धा स्नेहावर भाळले होते वाटत... हो, ती त्याला रात्री मस्का मारायला जायची की.
ममा बाहेर काम देतील या आशेने सगळेचजण किती लोचट झाले होते. उत्कर्ष एकटाच नव्हता. त्यांनी हा शो सोडावा आता. जरा नवा चेहरा हवा.

उत्कर्ष मास्टरमाइंड वगैरे काही होता का याबद्दल शंका आहे. मुळात तो डोकं वापरायचा का याबद्दलच.
टीम बी ची मेजॉरिटी झाल्यावर ए वा ल्यां ना फटके बसू लागले तेव्हा उत्कर्ष चडफडत होता , तिथे जयने त्याला आपणही हेच केलं आहे, याची आठवण करून दिली. टीम ए मध्ये डोकंही जयचंच होतं.

इंग्लिशमध्ये एकमेकांना पटवणे आणि बॉडी दाखवणे या वर फोकस असलेले शोज असतात. जयने त्यात जावं. इथे तृप्ती आणि मीनल सोडल्या तर त्याने सगळ्यांशी फ्लर्ट केलंय किंवा त्यांच्या अंगचटीला गेलाय.

इंग्लिशमध्ये एकमेकांना पटवणे आणि बॉडी दाखवणे या वर फोकस असलेले शोज असतात. जयने त्यात जावं. इथे तृप्ती आणि मीनल सोडल्या तर त्याने सगळ्यांशी फ्लर्ट केलंय किंवा त्यांच्या अंगचटीला गेलाय..... हो मग त्या स्नेहा सारखे इंटरनॅशनल फेसपण होता येईल.
Lol Lol

बिबॉ संपलं .. आता हा धागा ओस पडणार असं वाटलं होतं पण इथे आज मस्त मस्त पोस्ट आहेत
भरत ची पोस्ट सगळ्यात भारी....
मस्त झाला हा सिझन खुप... काल रात्री ९:३० ला चुकल्या चुकल्या सारखं होत होतं Wink
टॉप टु ला टीम बी चेच २ असते तर मला जास्त आवडलं असतं... पहिल्या सिझन ला एकाच टीम चे दोघे होतेच की टॉप टु ला.. मग या वेळी पण तसं चाललं असतं... उगीच ओढुनताणुन दोन्ही टीम चे १-१ तिथे आणायची गरज नव्हती....
जय बाजीराव म्हणुन अजिबात शोभेल असं वाटत नाहिये... तसही त्याला काहीही अभिनय जमेल असं वाटत नाही... एकवेळ विशाल पण चालुन जाईल बाजीराव...
जय, उत्क्या ला बाहेर बरेच स्वत: चे बिझनेस ऑप्शन्स आहेत.. त्यामुळे त्यांना कोणी कामं दिली न दिली तरी फार काही फरक पडणार नाहिये...
खरा फरक विशाल, मीनल आणि विकास ला पडेल... त्यांना चांगली कामं मिंळुदेत आता...
मीनल हिन्दी बिबॉ मधे जायला योग्य वाटते मला...जय पण

भरत यांचं विश्लेषण छान आहे, बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत.

जय मॉडेल म्हणून शोभेल फक्त. अभिनय करायची वेळ येईल तिथे विशाल, विकास हवेत.

ए टीम एकहाती जयने चालवली मात्र, बाकी मिंधे होते, गा दा उशीरा जागी झाली.

बी टीम मस्त होती, सगळ्यांची आपली एक स्वतंत्र ओळख होती. दोन वि आणि सोना मोनाने मनावर राज्य केलं. मीनलला उत्क्याच्या आधी काढलं ह्याची मात्र हळहळ वाटते, शोचा ग्रेस राहीला असता तिला ठेवलं असतं किमान चौथ्यावर तर. सगळे म मां वर घेणार, तेच कारणीभुत असं मलाही वाटतंय. खरंतर पहीले तीन बी टीमचेच हवे होते आणि वुमन पॉवरला पण सलाम दिला बिग बॉसने असं चित्र दिसलं असतं.

जय ट्रॉफी न घेता घरी आला म्हणून जोरात स्वागत झालं की काय त्याचं, एक व्हिडीओ बघितला, आजी मस्त वाटली त्याची, यंग (तीच आजी असेल तर) तो आईला ट्रॉफी घेऊन येतो म्हणाला होताना. एनीवे टॉप टू आला म्हणून असेल. तिथे मीनलला बघायला आवडलं असतं मला. निदान विकास तरी हवा होता.

मीनलला उत्क्याच्या आधी काढलं ह्याची मात्र हळहळ वाटते, शोचा ग्रेस राहीला असता..... मला अगदी असेच वाटलं होतं. तीला टॉप दोन मध्ये ठेवले असते तर काही बिघडत नव्हते. उघडेबंब फिरणारे मल्ल पोत्यानं मिळतात, अशी शेरनी क्वचितच सापडते. मराठी प्रेक्षकांना नक्कीच आवडले असते.

हा सिजन अजिबात नाही पाहिला, पुढल्या वेळी तरी जरा बरे कंटेस्टंट आणावेत. इथल्या कमेंट्स मात्र वाचल्या अधून मधून, धन्यवाद.

मला विकास खरच डिझर्व्हिंग वाटत होता..... त्याने सुरुवातीपासून खुप अंडरप्ले केले नाहीतर अजुन पुढे आला असता..... ताकद कमी पडली तरी डोके जाम वापरायचा.... A ग्रूपकडे मदत मागायला जायला लाजायचा नाही.... मुद्दे पकडून भांडायचा..... त्याचे अंदाज बरोबर असायचे..... हजरजबाबी होता..... मित्रांशी भांडला तरी टोक गाठायचा नाही..... मित्रांना बऱ्याचदा चांगले सल्ले द्यायचा!!
विशालने प्रेक्षकांना जिंकायची हुकमी अस्त्रे वापरली सुरुवातीला आणि सगळ्यांना खिशात घातले पण नंतर नंतर तो स्वार्थी आणि खोटा वाटायला लागलेला..... स्वताच्याच ग्रूपशी भांडणे, जय आणि उत्क्यासमोर एकदम डिफेन्सिव्ह वागणे, वगैरे वगैरे...... त्या चावडीवरच्या सोनालीबरोबरच्या एपिसोडनंतर तर तो मनातूनच उतरला त्यामुळे तो जिंकला त्याचा विशेष काही आनंद नाही झाला.
जय नंतर नंतर बरा वाटायला लागलेला..... बी टीमची मॅजॉरिटी झाल्यावर त्याने ते बऱ्यापैकी शांतपणे स्विकारले..... उत्क्या नाही म्हणजे नाहीच आवडला.
सोनाली आवडत होती पण ती पाचव्या सहाव्या नंबरच्या पुढे जाउ शकणार नाही हे बहुदा तिलाही माहित होते आणि त्याच्यापुढे जाण्यासाठी तिने जास्त प्रयत्नही केले नाहीत.
मीनल उत्क्याच्या आधी जायला नको होती पण ती विनर मटेरियल वगैरे अजिबातच नव्हती.

मांजरेकरांनी एकतर ब्रेकतरी घ्यावा किंवा स्टाईल तरी बदलावी..... फारच चमच्याने भरवले यावेळी त्यांनी!!

हिंदी बिगबॉसचा TRP जसा नंतर नंतर उतरणीला लागला तसे अजुन एकदोन सीझननंतर मराठीचे पण होऊ शकते...... टास्कपासून प्रॉपर्टीपर्यंत सीझनमागून सीझन काहीच व्हेरिएशन नाही आणले तर तोचतोचपणा येऊ शकतो..... Power packed tasks जरा कमी करायला पाहिजेत आणि पझल्स, टीम बिल्डींग गेम वगैरे प्रकार जास्त आणायला पाहिजेत नाहीतर शिव आणि विशालच्याच पठडीतले विनर मिळत राहतील!!

असो !
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मज्जा आली या धाग्यावर!!
परत भेटूच पुढच्या सीझनच्या धाग्यावर Happy

<टास्कपासून प्रॉपर्टीपर्यंत सीझनमागून सीझन काहीच व्हेरिएशन नाही आणले तर तोचतोचपणा येऊ शकतो..... Power packed tasks जरा कमी करायला पाहिजेत आणि पझल्स, टीम बिल्डींग गेम वगैरे प्रकार जास्त आणायला पाहिजेत नाहीतर शिव आणि विशालच्याच पठडीतले विनर मिळत राहतील!! >+१.

बिग बॉसने टास्कसाठी टीम्स फोडायला खूप उशीर केला. सतत मिक्सिंग करायला हवं होतं.

नाहीतर शिव आणि विशालच्याच पठडीतले विनर मिळत राहतील!!...आणि मग लोक बघायचे बंद करतील हळूहळू.
सिनिअर लोकही खेळू शकतात असे पण काही टास्क हवेत. म्हणजे त्यातही बरेच चांगले खेळाडू सापडतील.

भूषण कडूला पण ना! >>> आठवत नाही पण शिवचे आठवतंय. तो पिक्चर काही अजून आला नाही किंवा त्याचा मुहूर्त वगैरे झाला याची बातमी वाचली नाही कुठे.

अजूनही विकास तितकाच तरुण दिसतो.>>> he is 39, according to google. ..>>>>>>>>> हो का? असेलही. पण सोनाली त्याच्याकडून कॅडबरी खेचून घेताना म्हणत होती की ' एवढा पन्नशीचा बाप्या झाला तरीही लहान मुलासारख कॅडबरी मागतोय"

हिंदी बिगबॉसचा TRP जसा नंतर नंतर उतरणीला लागला तसे अजुन एकदोन सीझननंतर मराठीचे पण होऊ शकते...... टास्कपासून प्रॉपर्टीपर्यंत सीझनमागून सीझन काहीच व्हेरिएशन नाही आणले तर तोचतोचपणा येऊ शकतो..... Power packed tasks जरा कमी करायला पाहिजेत आणि पझल्स, टीम बिल्डींग गेम वगैरे प्रकार जास्त आणायला पाहिजेत नाहीतर शिव आणि विशालच्याच पठडीतले विनर मिळत राहतील!! >>>>अगदी अगदी त्यान्नी तिन्ही सिझन्समध्ये एकच थीम घेतली सेट तयार करताना " मराठी सन्सकृती" पुढच्या सीझनला वेगळी थीम असायला हवी.

पण काही जुने टास्कस असायला हवेत जसे की खून करण्याचा टास्क, चोर पोलिस. अश्या टास्कसमध्ये डोक वापरता येत.

या सीझनमध्ये बरेचसे टास्कस नवीन होते.

पुढचा सिझन कधी? >>>>>>>> एप्रिल किव्वा मे महिन्यात

इंग्लिशमध्ये एकमेकांना पटवणे आणि बॉडी दाखवणे या वर फोकस असलेले शोज असतात. जयने त्यात जावं. इथे तृप्ती आणि मीनल सोडल्या तर त्याने सगळ्यांशी फ्लर्ट केलंय किंवा त्यांच्या अंगचटीला गेलाय. >>>>>>> मला नाही वाटत तो कोणाच्या अंगचटीला गेलाय. फ्लर्ट करतानाही तो अन्तर राखूनच होता मुलीन्शी. ( स्नेहा सोडल्यास). मुलीन्चीही कन्सेण्ट होती त्याच्या वागण्याला. हा, त्याच मुलीन्कडून हातपाय दाबून घेण आवडल नाही. तृप्ती आणि सुरेखाताईन्शीही फ्लर्ट केल त्याने " मी तुमच्या स्वप्नात येईन' बोलून. समहाऊ त्याची मीरा आणि गायत्रीशी मैत्री छान होती. बघायला आवडली.

बादवे, यावेळी शरद उपाध्ये नाही आले? विशालची रास जाणून घ्यायला आवडल असत.

काहीही असो यार.. पण यावेळचे स्पर्धक जीव लावून गेले! रोज रात्री साडे नऊला अजूनही आठवण येते... हुरहूर वाटते!
अस बाकी दोन सिझनच्या वेळी नव्हतं झालं!

मी हा सीझन फार कमी बघितला.

मला आवडलं ते शेवटच्या आठवड्यात सर्वजण एकमेकांशी हसून खेळून राहिले होते. आधी दोन्ही सीझन तसं दिसलं नव्हतं. मागच्या सीझनला तर शेवटीही व्हिलन grp शिव वीणा ला नावं ठेवण्यात आणि वीणाला छळण्यात मग्न होता.

काहीही असो यार.. पण यावेळचे स्पर्धक जीव लावून गेले! रोज रात्री साडे नऊला अजूनही आठवण येते... हुरहूर वाटते! >>>>>>>> अगदी अगदी मुख्य म्हणजे यावेळचे सगळे स्पर्धक तरुण आणि एक्टिव्ह होते. सगळे प्लेयर्स होते. त्यामुळे बघायला मजा आली. मागच्या दोन्ही सिझनमध्ये स्पर्धक ( एक दोन जण सोडल्यास) आळशी आणि सुस्तावलेले दिसत होते. मागच्या सीझनमध्ये एकातही विनर मटेरियल दिसत नव्हत. शिव तेवढा वासरात लन्गडी गाय शहाणी होता. येस्स, मागचा सीझन महा पकाऊ होता.

मीनल ची image last 2 weeks मध्ये खराब का केली असेल ?
Was she really at fault?

उत्कर्षला कलर्सवरचा येऊ घातलेल्या रिअँलिटी शोच अँकरिंगची संधी मिळाली आहे.
कुठला रिअँलिटी शो ते कळले नाही.

Pages