Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या तरी माझे मत विकास आणि
सध्या तरी माझे मत विकास आणि मिनलला. विशालचा फेकपणा सिद्ध झालाय आता.
नंतर तयार केलेले उत्तर वाटतेय
नंतर तयार केलेले उत्तर वाटतेय.>>>+१ काहीही फेकते ती. चावडीवर ममांना सांगत होती. तो शर्ट माझ्या बॅायफ्रेंडने दिलाय. फ्रेंड जो बॅाय आहे त्याने. मग तिला पुन्हा स्पष्ट बोलायला सांगितल्यावर म्हटली कि माझे त्याच्याशी लग्न ठरले आहे.
हो मी पण उत्क्याची AV बघितली
हो मी पण उत्क्याची AV बघितली आणि पुढचे काही बघितले नाही इतकी अतिशयोक्ती भरली होती त्या AV मध्ये.
बाकी सोनालीचा बॉयफ्रेंडचे सोडलेले पिल्लू हा विकासचा शहाणपणा असूच शकतो
मला जय नकोय विनर...
काय कौतुक.. काय कौतुक... चाललं होतं उत्क्याचं
मला जय नकोय विनर... स्प्लिटव्हिलाला झाला पुरेसे नाही का? बसु दे त्याला आपले ते विनरपद कुरवाळत.
जय पहिल्या तीनात पण नकोय.
विवि किंवा विमीने लाईटस ऑफ कराय्ला हवेत.
जयची सगळ्यात शेवटी जर्नी अस
जयची सगळ्यात शेवटी जर्नी अस कोण म्हंटलं ? अजुन तिघांच्या जर्नीज बाकी आहेत कि !
उत्क्याची जर्नी मी फॉरवर्ड केली, महापकाऊ !
बिगबॉसचे फोटो कोलाज आणि नरेशन कित्ती लांबवल होतं
विशाल मीनल दोघांची जर्नी मस्तं होती, विशालची अजुन रंगवायला हवी होती, सोनाली पार्ट आटोपता घेतला !
मीनलचा ग्राफ फार मस्तं वाटला जर्नी पहाताना !
काय फालतू आहे बिगबॉस टिम,
काय फालतू आहे बिगबॉस टिम, किती त्या उत्कर्षचा उदो उदो. कधी संपते अस झालं होतं. जवळपास २३/२४ मिनीटे होती त्याची AV, परत सहा फोटो लावले. त्यामानाने विशाल (१८/१९ मि.) मिनल (१६/१७ मि.) लवकर आटोपलेत आणि त्यांचे प्रत्येकी चारच फोटो लावले.
हे असेच मनमानी करणार असतील तर, जय / उत्कर्ष जिंकतील.
मला पण मीनालची एव्ही आवडली.
मला पण मीनलची एव्ही आवडली.
उत्क्या ची पाहवली च नाही.
मग च ह ये द्या लावलं तर तिकडे जास्तच पांचटपणा चाललेला
मिडवीक मध्ये मीरा जावी.
मिडवीक मध्ये मीरा जावी.
( कदाचित घालवणार नाहीत नुसता drama करतील. फॉर change ह्यावेळी उत्कर्ष ला अथवा विकासला फसवतील )
लाइट विकास आणि मिनलने बंद करावेत.
विजेती मिनल असावी.
असं मला वाटतं.
सोनाली काहितरी गुळमुळीत उत्तरं देत असेल बॉयफ्रेंड बाबत तर आधीच ठरलेलं सर्व आलबेल नसावं आता.
पत्रकार परिषद तशी बरी वाटली.
फार फायरिंग झाली नाही. जय ला ट्रॅप करत होते. स्नेहा बाबत मैत्रेच्या पुढे होतं असं बोलावं लागलं त्याला.
विशालला जागा आणि वेळ चुकीची होती हे कबूल करावं लागलं.
मीरा मरणाच्या दारातून परत वर बोलू इच्छित नाही म्हणली. ती तरी बरंच बोलली म्हणता येईल.
विकास आणि मिनलला देखील चांगलं provoke केलं.
विशालने तेवढ्यात देखील जय ला स्पोर्टमनशीप वर दुखरा चिमटा काढून घेतला.विशाल मॊके पे चॊका चांगल्या मारतो.
मी दोन वि आणि मीनलची एव्ही
मी दोन वि आणि मीनलची एव्ही बघणार फक्त. एका वि ची मला उद्या बघायला मिळेल.
मिडवीक मध्ये मीरा जावी. >>> अगदी अगदी, तिला घालवायचं नसेल तर किमान उत्क्यातरी जावा.
विवि किंवा विमीने लाईटस ऑफ कराय्ला हवेत. >>> हो ना. जयचं उद्दात्तीकरण सुरु आहे त्यामुळे तो असेल असं वाटतंय, निदान जिंकवु तरी नये . मीनल फक्त गेमवर फोकस होतीना, अफेअर, अति भांडण तंटा नाही. त्यामुळे bb तिच्याकडे लक्ष देणार नाहीत. स्वयंपाक पण करेना पोरगी, म मां विरोधात खरं का होईना बोलली ना, हे सगळं विरोधात जाईल तिच्या, असं वाटतंय.
मीरा मरणाच्या दारातून परत वर बोलू इच्छित नाही म्हणली. ती तरी बरंच बोलली म्हणता येईल. >>> हे थोडक्यात लिहा कोणीतरी, मी बघणार नाहीये.
पुंबा बरेच दिवसांनी दिसलात.
लोकांच्या मनात खूपच दहशत बसले
लोकांच्या मनात खूपच दहशत बसले ए टीमची
. किती घाबरताहेत त्यांच्यापैकी कोणी जिंकेल म्हणून. मुघल संताजी धनाजीला घाबरायचे तसे सोशल मीडियावर पब्लिक जय उतक्याला घाबरताहेत 
ते दुर्योधन दु:शासन किंवा
ते जय उतक्या दुर्योधन दु:शासन किंवा दुर्योधन शकुनी मामा जोडी वाटतायेत म्हणून. आता शेवटी शेवटी गोड वागून काही मनात स्थान मिळवणार नाहीत, हाहाहा.
मीरातर नाही जिंकणार.
विशालने सोनालीवर जे काही आरोप
विशालने सोनालीवर जे काही आरोप केले त्यावरून दु:शासन ट्रॉफी तर विशालला द्यायला पाहिजे. सोशल मीडियावर लोकांनी चित्र वैगरे फिरवले होते दु:शासनच्या चेहऱ्यावर विशालचा फोटो लावून.
आणि तोच विकासला मोठा भाऊ म्हणतो म्हणजे विकास दुर्योधन झाला. घोर कलियुग आहे. दु:शासन जिंकावा म्हणून लोकं प्रार्थना करताहेत.
हाहाहा.
हाहाहा.
तेव्हापासून मी विशालला पाठिंबा देत नाहीये, त्याच्याविरोधात लिहिलंही मी पण जयपेक्षा तो बरा वाटतो.
मला तर मीनल जिंकावी असं वाटतं खरंतर, नाहीतर विकास. विशालला मी वोटिंग करणार नाहीये.
जय जिंकावा असे मला वाटते...
जय जिंकावा असे मला वाटते...
लोक काय काय करतीलhttps:/
लोक काय काय करतील
https://twitter.com/mycrybabyvishu2/status/1473211126519189507
कलर्सवर स्पर्धका़च्या av बद्दलच्या ट्वीट्सना मिळालेल्या लाइक्स आणि कमेंटस्वरून
विशाल क्लिअर विनर
दुसऱ्या नंबरसाठी मीनल, विकास, जय मध्ये स्पर्धा
मग उत्कर्ष
आणि मीरा खूप मागे
पण वोट्स वर किंवा या
पण वोट्स वर किंवा या ट्रेन्ड्स इ. वर काहीच होत नसतं हे कळलंय ना, गेले काही आठवडे मीराबाई बसली आहे तिथे जास्त कोणी सपोर्ट न करता. दादुस पण असेच. त्यामुळे खरंच समजत नाही अजूनही कोण जिंकेल.
एका व्हिडिओ मधे उतक्या - जय अगदी टाळ्या देऊन देऊन सांगत आहेत कसं आम्ही खोटं बोलायचो, विकास ला दर वेळी आश्वासन द्यायचो आम्ही तुलाच सपोर्ट करणार, मीनल आली की तिला पण तेच सांगायचो. वगैरे. खूपच कॉन्फिडन्स आलेला दिसतोय त्यांना. मीनल - विकास ला त्याचं फारसं काही वाटलेलं दिसलं नाही (किंवा दाखवलं नाही)
याआधी सांगितलेल्या
याआधी सांगितलेल्या अंदाजानुसार विकास पाटील जिंकणार का मग? त्याच्या av la गाणं पण विजेताचं लावलं होतं.. म्हणजे विवि लाइट बंद करणार? वा वा
विकासला अंधारात ठेवण्यासाठी
विकासला अंधारात ठेवण्यासाठी लावलं असेल गाणं. तो किंवा मीनल जिंकला तर जाम मजा येईल. विशाल होईल विनर .
विकास जिंकला तरी आवडेल... तो
विकास जिंकला तरी आवडेल... तो विशाल नको मात्र...
विकास ला सपोर्ट करायला प्राजक्ता माळी व्हिडीओ टाकतेय...
खूप वर्षांपूर्वी सुवासिनी
खूप वर्षांपूर्वी सुवासिनी मालिकेत होते ते एकत्र, अस थोडं आठवतंय. बरेच जण होते त्यात. विकास प्राजक्ता नवरा बायको होते मोस्टली. त्यामुळे तिने अपील केलं असेल.
माझे डिझर्व्हिन्ग विनर
माझे डिझर्व्हिन्ग विनर
मीनल
विकास
जय
विशाल
उत्क्या-- ओव्हररेटेड
मिरा-- शुड गो आउट
बाकी आले चॅनेलच्या मना तिथे कुणाच चालेना.
चॅनेल जय-विशाल्,जय-मिनल असे कॉम्बो करु शकते.
जय फायनल २ मधे नक्कि असेल अस वाटत आहे.
न्युज आलीय.. मीरा टॉप 2 मध्ये
न्युज आलीय.. मीरा टॉप 2 मध्ये आहे...
न्युज आलीय.. मीरा टॉप 2 मध्ये
न्युज आलीय.. मीरा टॉप 2 मध्ये आहे... >>> छान. मस्त इतिहास घडेल न भूतो न भविष्यती. सर्वात कमी votes मिळवून टॉप 2 . ट्रॉफी तिचीच.
प्रेस कॉन्फरन्सचा एक शॉट बघितला, त्या उतक्याने एकट्यानेच गायत्रीची आठवण काढली. बाकी तिघांनी अजिबात नाही. बी मधल्या पण कोणी नाही.
विशाल आणि मीनलची एवि बघितली.
विशाल आणि मीनलची एवि बघितली. विशालला जास्त वेळ दिला बहुतेक. दोघांची journey आवडली पण मीनलची जास्त आवडली. विशाल सारखा इमोशनल होऊन रडत होता, ते मात्र बोअर झालं, मी अशावेळी पुढे ढकलत होते . त्यापेक्षा मीनल इमोशनल झाली किंवा उत्स्फूर्त प्रतिसाद देत होती ते फार natural वाटलं.
एक नारी सबपे भारी याला अगदी अगदी. प्रत्येक ड्रेस carry छान करते ही. मला तिचे कुरळे केस सर्वात आवडतात. लव यु मीनल.
विशाल, विकास, मीनल ची एव्ही
विशाल, विकास, मीनल ची एव्ही छान होती.
विकासची एव्ही शेवटी दाखवली.
विशाल खुपच विचित्र माणूस आहे. विकासच्या चेहर्यावर स्प्रे मारत होता, त्याच्या डोळयात जाता जाता वाचला.
आज विशाल गायबच होता पूर्ण एपिसोडभर.
मीरा कान बन्द करत होती स्वतः चा एव्ही ऐकताना हा हा हा
विकास- मीनल किव्वा विकास- विशाल यावेत टॉप २ ला.
https://www.youtube.com/watch?v=SKNwlVclgww&t=30s
विशाल,विकास,जय,मिनल,मीरा(जर
विशाल,विकास,जय,मिनल,मीरा(जर उत्कर्षला काढल तर)असे टॉप 5 असले तर
मीरा,मिनल,विकास असे बाहेर जातील
विशाल आणि जय लाईट्स बंद करतील
विनर मात्र सांगता येत नाही.कारण जयलाही प्रचंड वोट्स मिळत आहेत.
पण गाँव के छोरे को देना है तो फिर विशाल .
बघू,यावेळी बिबॉसचा कस लागणार हे मात्र खर,कारण आधी स्वत:ला वाटेल ते फंडे वापरून एलिमिनेशन केली आहेत,आता,स्वत:च अडकले आहेत.
जय आणि उत्कर्ष लाईट बंद करणार
जय आणि उत्कर्ष लाईट बंद करणार आहेत यावेळी.
कलर्सच्या ट्विटर हँडलवर
कलर्सच्या ट्विटर हँडलवर प्रत्येकाच्या एव्हीच्या प्रोमोसाठी लाइक्स , कमेंट्स
विकास ७९-५८
मीरा २५-३
जय ६७-३१
विशाल ८६-३५
उत्कर्ष ३१-१७
मीनल ५९-२७
त्या मिराची काही वेगळी स्टोरी
त्या मिराची काही वेगळी स्टोरी आहे का? आधी ती पुरूष होती व मग जेंडर बदलून घेतले अशी काही? फेसबूकवर असे काही फोटो आलेत.
विकासची जर्नी आवडली
विकासची जर्नी आवडली

जयच्या जर्नीत कित्ती त्या स्नेहाचं दर्शन
Pages