Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या एक्ट रायडरवाल्या
त्या एक्ट रायडरवाल्या मन्दारचा स्पॉयलर व्हिडिओ बिबॉने काढायला लावला. सोनाली एक्विक्ट झाल्याची बातमी एपिसोडआधी फोडली म्हणून.
बादवे, विशाल सोनालीच भाण्डण झाल होत का चावडीच्या आधी? दोघ एकमेकान्शी फार बोलले नाहीत सोना बाहेर जाण्याआधी. ती बोलत असताना विशाल तिच्याकडे रागाने बघत होता.
' दुनिया हसिनो का मेला" जयसाठी गाण सूट होत. हा हा हा
सोनाली इथपर्यन्त आली फारसे
सोनाली इथपर्यन्त आली फारसे कॉन्ट्रिब्यूट करत नसताना तेही खूप झाले. बरेच टॅलेन्ट दाखवता आले तिला. त्यामुळे गुड फॉर हर. मीराचा मुक्काम मात्र दादुस सारखाच लांबवला आहे तिथे. काहीही कन्टेन्ट नाहीये तिचे आता.
आणि उत्क्याची कौन बनेगा करोडपती मिमिक्री मस्त. टाइम काउंटिंग टास्क एंटरटेनिंग होता. बाकी भांडणांनी डोकं उठलं.
पत्रकार परिषदेनंतर एक एविक्शन असे वाचले होते कुठेतरी. तेव्हा तरी तिला निरोप द्यावा.
या आठवड्यात उत्क्या आणि जय पॉजिटिव वाटत होते. जय चा अंगात आलंया डान्स फनी होता
त्या विशाल ची सौंदर्या हा काहीतरी कोड वर्ड किंवा काहीतरी नॉन एक्झिस्टन्ट प्रकार असावा असं वाटलं का कुणाला? त्याची कॉन्झर्वेटिव फॅमिली बघता आई असं "तू कधी सौंदर्याबद्दल विचारतोस वाट बघत होते" असं काहीतरी म्हणाली ते ऑड वाटले होते.
सोनाली खरंच फार गोड आणि
सोनाली खरंच फार गोड आणि ग्रेसफुल दिसत होती. विशालशी नाही बोलली जास्त बहुतेक. राग तर असणार ना मनात. बाहेर गेल्यावर विशाल एक नंबरवर आहे बघून जास्त टीका करणार नाही.
पत्रकार परिषदेनंतर एक एविक्शन असे वाचले होते कुठेतरी. तेव्हा तरी तिला निरोप द्यावा. >>> वोटिंग सुरू झालं म्हणजे eviction असेलच. मीराच जावी आता.
विशाल ला काढा आता
विशाल ला काढा आता
मीरा आधी सोनाली गेली याचं
मीरा आधी सोनाली गेली याचं खरंच नवल वाटतं. कोण सपोर्ट करत असेल तिला?
मी... माझे वोट्स जय आणि मीरा
मी... माझे वोट्स जय आणि मीरा ला असतात...
मीराच्या आधी सोनाली?
मीराच्या आधी सोनाली?
बिग बॉस चिटिंग करताय की.
संपूर्ण सिजन अगदी पहिल्या एपिसोड पासून दुसऱ्याला हाडतुड करणाऱ्या मीराला सोनाली पेक्षा जास्त votes हे काय पटत नाय बॉ.
जय ची फनी side आता चांगली दिसतेय.
वर म्हणाल्या प्रमाणे अंगात आलया भारी होतं.
उतक्या तर विनर मटेरियल असून स्वतःच दुसऱ्याला पुढे जाउ देत आलाय.
विकासचे देखील असे funny video असतात extra मसाला मध्ये. फार मिश्किल आहे तो. त्याने हस्तर acting करून आतमध्ये बरंच घाबरवल आहे.
शितोळे फिनाले ला जाऊ शकते तर
शितोळे फिनाले ला जाऊ शकते तर मीरा का नाही...
नेहा शितोळेला मायबोलीवरच
नेहा शितोळेला मायबोलीवरच सपोर्टर्स होते की.
उत्कर्षला आत्मविश्वास कमी असावा. प्रसिद्ध वडिलांचा मुलगा असल्याचे दडपण असेल. तो कधी स्टँड घेताना दिसला नाही.
असू शकत भरत. त्यांच्या
असू शकत भरत. त्यांच्या ब्रॅण्ड नेमला धक्का नको म्हणून सेफ खेळलेला असेल तर माहीत नाही.
नेहा शितोळे, मी दुसरा सिजन नव्हता पाहिला.
त्यामुळे माहीत नाही.
Extra मसाला मध्ये पाहिलं की विशाल आणि विकास बाहेर बसलेले असताना मीरा त्यांना जाऊन जेवताना अंडाकरी वै विचारून गेली , त्यावर सोमवारी खात नाही तर मग आपल्यासाठी डाळ कांदा करते म्हणून गेली ती.
त्यावर विशाल म्हणाला ह्या पोरीचा हा स्वभाव आहे खरा.
काळजी घेणारा.
थोडक्यात काय हाडतुड , माजूरडेपणा पण शो आणि कंटेंट साठी ठरवून केले असावे की काय अशी शंका येण्याइतकं फरक असतो. अशी स्क्रिप्ट नव्हे पण guideline देत असतील काय शो मध्ये जायच्या आधी.
मिनल, जय आणि बहुतेक सोनाली ह्यांनाही love angle विषयी ओपन आहात का type प्रश्न विचासरलेला.
Voot वर आहे.
एकदम सुरवातीचे एपिसोड फॉरवर्ड करत पाहिले तर त्यातही काही मजा सापडतात. मी आधी पाहिले नव्हते म्हणून पाहतोय वेळ मिळाला की.
त्यातले काही मला वाटलेले रोचक मुद्दे
1) विकास सिरीयल industry मध्ये फेमस असावा. त्याला बरेच जण ओळखीचा आहे म्हणून सपोर्ट करत होते बहुतेक. सोनाली, सुरेखा वै
2)आविष्कार आणि स्नेहा divorce विषयी कोणाला माहिती नव्हतं सुरेखा सोडली तर. पण स्नेहाच्या reaction वरून काही जणांना ह्यांचा काहीतरी बेक्कार भूतकाळ आहे अशी शंका आलेली.
3) आविष्कारने स्वतः जयला सांगितलेलं दिसलं.
4) मीरा दुसऱ्याला एकदम तुच्छ लेखत होती. गायत्री देखील तिच्यासोबत.
5) जयला दुधाणे आडनाव मुळे स्नेहाने विचाररलेलं की तू माझा भाउ लागतोस का? तिच्या मामांचं तेच आडनाव आहे म्हणून.
कोणाला असं काही जाणवलं असेल तर लिहा.
मीराच्या आधी सोनाली?
मीराच्या आधी सोनाली?
बिग बॉस चिटिंग करताय की.>> सगळ्या फेसबूक पेजेसवर निषेधाचे फलक लागलेत. चॅनेलला मॅन्युपुलेट करायचेच होते तर आदीशसाठी करायचे ना. मीरासाठी म्हणजे अगदीच वाया घालवला व्हेटो. आणि लक्षात पण आले लोकांच्या .आदीशचे कळाले नसते कुणाला.
1) विकास सिरीयल industry मध्ये फेमस असावा. त्याला बरेच जण ओळखीचा आहे म्हणून सपोर्ट करत होते बहुतेक. सोनाली, सुरेखा वै..<<मी खुप पुर्वी त्याची एक ४-५ मुली मैत्रिणी असतात ती सिरियल पाहिली होती. नाव नाही आठवत. तो अभिनयपण त्याच्या गेमसारखचा सटल करतो. फार प्रसिध्द नसावा पण कामे मिळत असतील. मराठी चॅनेल्स ची संख्या बघता त्याच्यासारखे सेंसिबल लोक जॉबलेस असतील असे वाटत नाही.
बी टीम जी काही अस्तिवात आली आणि टीकली त्याचे बरेचसे श्रेय विकासला जाते. सोनाली आणि विशालसारख्या प्रचंड अनस्टेबल आणि सतत रुसणार्या भांडणार्या लोकांना त्याने एकत्र बांधुन ठेवले. मे बी घरात लहान मुल वाढवायचा अनुभव असल्याने त्याला ते नीट जमले असेल.
टास्क मधे बी टीमची कुठलीच स्ट्रॅटेजी फार यशस्वी झाली नव्हती अगदी मीनलचे सुध्दा. पण आपण बाहेर चांगले दिसले पाहिजे ही सर्वात मोठी स्ट्रॅटेजी विकासची होती. त्याला त्याचे क्रेडीट मिळाले पाहिजे.
आदीशनंतर जयला जर कुणी उचकवले असेल तर तो विकास असेल. विशाल मीनलला त्याचा नकळत फायदा झाला.
हा विक सतत कॅमेरा आपल्यावरच
हा विक सतत कॅमेरा आपल्यावरच राहवा आणी ए टिमला फुटेजच मिळु नये यासाठी केल का?या मान्जरेकराच्या प्रश्नावर उत्कर्षचे डोळे एकदम रीअॅक्ट झाले की अरेच्चा हा अॅन्गल लक्षातच नाही आला.
विकास या २ विकमधे भरपुर शिव्या खाल्ल्यात ग्रुपमधेच आग लावली म्हणून, भले मिनल अनफेअर वाटली असेल तरी ज्या लेवलला जाउन तो
तिच्याशी भान्डला वर सोनाली आणी तिच्यातही लावुन दिल ते सगळ करण्यामागे त्याची स्टॅटर्जी निट कळलीच नाही, सर म्हणतात तस शेवटी येन केन प्रकारेण स्वतःवरच फोकस राहावा हेही कारण असेल.
हा पुर्ण विक बी ग्रुप,त्याची भान्डण, त्याचे वाद्,कोण चुक कोण बरोबर याचिच चर्चा चालू होती सोमिवर
विकास पाटील बऱ्याच
विकास पाटील बऱ्याच सिरियल्समध्ये होता. त्याच्या सिरियल्स जास्त चालत नसल्या तरी त्याला डिमांड खूप आहे, तो सतत बिझी असणारा सिरियल स्टार आहे. त्याला एक संपली की दुसरी लगेच मिळते. रीकामटेकडा बसून आहे आणि बरेच दिवसांनी दिसला टीव्हीवर असं कधीच होत नाही. लीड रोलमध्येच असतो तो.
यापुढेही सर्वात जास्त काम त्याच्याकडेच असेल.
याआधी कलर्सचा सुयश टिळक आणि अक्षया देवधर (मे बी आडनाव चुकत असेल) हे bb मध्ये असणार ह्या चर्चा होत्या पण सुयशने नकार दिला. मग ऐनवेळी विकासला आणलं कलर्सचा चेहरा म्हणून आणि तो निर्णय योग्य ठरला, छान खेळतोय.
पत्रकारपरिषदेचे काही शॉटस
पत्रकारपरिषदेचे काही शॉटस बघितले, विकासने छान उत्तरं दिली.
विशालला मस्त प्रश्न विचारला, चावडीवर सोनालीबद्दल जे सांगितलं त्याबद्दल. निगेटिव्ह दिसायला लागल्याबरोबर लगेच असं सांगितलंस (आपल्या सर्वांच्या मनातला प्रश्न होता हा), त्याने सांगितलं दोन आठवडे चाललेले, मी इमोशनल आहे, ती जागा चुकली त्याबद्दल मी माफी मागतो म्हणाला आणि त्याचे मित्र त्याच्या बाजूने बोलतील असं वाटलं त्याला (अस कस वाटलं). तो सोना सोना करायचा, तिला भरवायचा हे सर्व पत्रकारपरिषदेत आलं.
खानापुर कुठं आहे (महाराष्ट्रातलं), तिथला विशाल आहे आणि त्यांची द्राक्षं बाग आहे पण दुष्काळी भाग म्हणून वडील कोलकता इथे बिझनेस करतात.
तो सौदर्याशी लग्न करणार आहे, सर्व पत्रकारांना बोलावणार आहे. त्यानेही छान उत्तरं दिली.
फारच पकाऊ होती पत्रकार परिषद!
फारच पकाऊ होती पत्रकार परिषद!!
पण त्यानंतरच्या विकास आणि विशालच्या सौंदर्याबद्दलच्या चर्चेने आणि विकासवर सगळ्यांनी मिळून केलेल्या प्रॅंकने मजा आली!!
सोनालीला मीनल जिंकावी असं
सोनालीला मीनल जिंकावी असं वाटतं.
सोनाली येडीच आहे. अजून मनाने
सोनाली येडीच आहे. अजून मनाने बाहेर आलेली नसावी ती. इन्टरव्ह्यू मधे कोणीतरी विचारले की टॉप ३ मधे तू कोणाला पहातेस, तर म्हणे मी स्वतः ला पहाते(?!). अगं बाई तू आलीस ना आता बाहेर. आता काय तेच
आता पत्रकार परिषद संपली. मग आता आठवडाभर करतील काय हे लोक? फालतू प्रमोशनल टास्क आणि सगळ्यांच्या एव्ही असतील .
मिड वीक एविक्शन तरी आहे का नक्की?
मिड वीक एविक्शन तरी आहे का
मिड वीक एविक्शन तरी आहे का नक्की?>> आहे ना! ममा म्हटले ना की एकजण बुधवारी बाहेर पडेल.
वोटिंग लाइन्स ओपन आहेत,
वोटिंग लाइन्स ओपन आहेत, त्यामुळे एव्हिक्शन असणार. बिबॉ मराठीमधे तरी अशावेळी नाही कॅन्सल करत , जेंव्हा एव्हिक्शन नसेल तेंव्हा बन्द ठेवतात वोटिंग लाइन्स !
मला वाटतय काहीतरी अनप्रेडिक्टेबल करणार यावेळी , आय जस्ट होप कि विनर बी टिमचाच करतील !
अनप्रेडिक्टेबल? मीनल ला नको
अनप्रेडिक्टेबल? मीनल ला नको काढायला. विकास, मीनल दोघे मीरा आणि उत्क्यापेक्षा नक्कीच स्ट्राँग आहेत.
आधीच सोनाली गेल्यामुळे बिबॉ ला बर्याच शिव्या पडत आहेत. या दोघांपैकी कुणाला आता काढले तर अजून चिडतील लोक! मीरा नाही डिजर्व करत फिनाले. जाऊ देत तिलाच.
विशाल नाही झाला विनर तर
विशाल नाही झाला विनर तर पब्लिक राडा करेल, हाहाहा.
मिडवीक तरी मीराबाईंना काढा. खरंतर मिडवीक नको होतं. आधीच काढायला हवं होतं किंवा फायनलला.
अनप्रेडिक्टेबल? मीनल ला नको काढायला. विकास, मीनल दोघे मीरा आणि उत्क्यापेक्षा नक्कीच स्ट्राँग आहेत. >>> हो ना. आता तसं केलं तर पब्लिक धोपटतील नक्कीच. फायनलवर बरेच जण बहिष्कार टाकतील. App काढून टाकतील.
विकासचा मुलगा बरा आहेना, असुदे छान आणि लवकर पूर्णपणे बरा होऊदे. मागे तो बायकोला सारखा विचारत होताना, मला मधूनमधून तेच आठवत राहते.
सोशल मिडियावरच्या निरनिराळ्या
सोशल मिडियावरच्या निरनिराळ्या हँडल्सने घेतलेल्या ट्रेंड नुसार विकास एकटा ६५% वोट्स घेतोय (जिथे साधारण ४०ते ५० हजार लोकांनी वोट्स केलय), म्हणजे टेक्निकली विशाल बरोबर घराचे दिवे बन्द करायला विकासच योग्य आहे पण काहीतरी धक्कादायक् म्हणून बिबॉ ने विकासलाच हाकलु नये बुधवारी म्हणजे झालं
मीनलला खूप कमी सपोर्ट आहे त्या मानानी !
३ मुलं -२ मुली असे काहीतरी करताना पुन्हा वाचवेल बिबॉ मीराला, घरकाम करायला ठेवलय् तिला, तिला ड्रामा पण नाही जमत पूर्वीसारखा !
सिझन सम्पताना हळू हळू फनी
सिझन सम्पताना हळू हळू फनी मोमेण्टस दाखवायला लागलेत. ह्याआधी दाखवत नव्हते. छान वाटतायता बघताना.
पण त्यानंतरच्या विकास आणि विशालच्या सौंदर्याबद्दलच्या चर्चेने आणि विकासवर सगळ्यांनी मिळून केलेल्या प्रॅंकने मजा आली! >>>>>>> अगदी अगदी. विशाल विकासच भाण्डी घासण्यावरुन झालेल लुटूपुटूच भाण्डणही मस्त होत.
हे त्या प्रॅन्कच लाईव्ह अनकट फुटेज:
https://www.youtube.com/watch?v=rue_3HVXXUU
विकासला किंवा मीनलला हाकलवले
विकासला किंवा मीनलला बाहेर काढलं तर खरंच लोकांनी बहिष्कार टाकावा फायनलवर. ये तो बहोत नाईनसाफी होगी. कलर्स मराठी विकासवर हा अन्याय होऊन देतील का.
मलाही आता विकास किंवा मीनलची काळजी वाटायला लागली. विकास एक नंबरवर आहे सध्या, जय दोन आणि मीनल तीन. उतक्या मीरा नंतर. आता व्हिलन टीम मधले जायला हवं कोणीतरी, मीराच जास्त करून.
मीनल अमराठी आहे अशा कमेंट्सही वाचल्या, अरे गेम बघाना, आई मराठी आहे तिची.
मीनल नाही जाणार... विकास जाईल
मीनल नाही जाणार... विकास जाईल...
सोशल मिडियावरच्या निरनिराळ्या
सोशल मिडियावरच्या निरनिराळ्या हँडल्सने घेतलेल्या ट्रेंड नुसार विकास एकटा ६५% वोट्स घेतोय
>>> खूप प्रेक्षक ट्विटर वर नसतात... हे ट्रेंड्स त्यामुळे चुकीचे ठरतात...
काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये जय
काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये जय पत्रकारांची लायकी काढेल की काय असं वाटू लागलं. तो स्पोर्ट्समन आहे त्यामुळे अन्याय सहन करू शकत नाही, असं म्हणाला. त्याला स्पोर्ट्समनशिपशी काही देणंघेणं आहे का?
खरंतर मीराचं जायला हवी होती
खरंतर मीराचं जायला हवी होती पण सोनालीला काढलं.
मिडवीक मध्ये सोनाली जायला हवी होती.
खानापूर सांगली जिल्ह्यात येतं. विशाल एकत्र कुटुंब आहे आणि सधन शेतकरी वाटतो. त्याचं घर वै मोठं आहे.
आत्ताच विकास ला ९९ वोट करून
आत्ताच विकास ला ९९ वोट करून आले.. विकास नाही जाणार बाहेर. जर बिग बॉस ने गेम नाही केला तर lights off विकास विशाल करणार हे नक्की.
लाईट्स ऑफ जय आणि विशाल करतील.
लाईट्स ऑफ जय आणि विशाल करतील...
Pages