Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप प्रेक्षक ट्विटर वर नसतात.
खूप प्रेक्षक ट्विटर वर नसतात... हे ट्रेंड्स त्यामुळे चुकीचे ठरतात>>>> जर मग सोशल मिडिया ट्रेंड्स चुकीचे असतील तर कुठल्या आधारावर विशाल निकम जिंकणार आहे बोलत आहेत सगळे?
लाईट्स ऑफ जय आणि विशाल करतील.
लाईट्स ऑफ जय आणि विशाल करतील..>>> येस. कोणीही कितीही जयचा द्वेष केला तरी टॉप टू जय आणि विशालच असणार आहेत. हिरो आणि व्हीलन (शब्दशः नाही पण एकंदरीत वावरानुसार) शेवटी राहतात आठवा बघू, मेघा पुष्की, शिव नेहा, सिध्दार्थ असीम, शिल्पा हिना
सिध्दार्थ असीम
सिध्दार्थ असीम
<<<
पाहिला नाही हा सिझन, पण या सिझनला सर्वात माजलेला स्पर्धक, एकदम व्हिलन मटेरिअल जिंकला असं ऐकलय !
कल मीरा ने उत्कर्षला डबल
काल मीरा ने उत्कर्षला डबल ढोलकी म्हटलं
आणि त्यावरून ज्याने तिला काय काय म्हटलं.
मीराने व्होकल व्हायला पत्रकार परिषद का निवडली?
पाहिला नाही हा सिझन, पण या
पाहिला नाही हा सिझन, पण या सिझनला सर्वात माजलेला स्पर्धक, एकदम व्हिलन मटेरिअल जिंकला असं ऐकलय !
>>> सिद्धार्थ शुक्ला जिंकला होता. तो हयात नाहीय आता…
पाहिला नाही हा सिझन, पण या
पाहिला नाही हा सिझन, पण या सिझनला सर्वात माजलेला स्पर्धक, एकदम व्हिलन मटेरिअल जिंकला असं ऐकलय !>>>> चुकीचे एकले आहे मग. सगळ्यात बेस्ट सिझन होता हा. मी तर रिपीट बघितला गेल्या महिन्यात. नंबर एक टीआरपी होती त्यामुळे पाच आठवडे वाढविला होता.
क्लिप बघून किंवा कधीतरी एखादा एपिसोड बघणाऱ्याला सिद्धार्थ माजलेला वाटू शकतो पण ज्यांनी पूर्ण एपिसोड बायस न होता पाहिला असेल ते असे बोलणार नाहीत. जेव्हा समोरचा विनाकारण किंवा अर्थहीन बोलत असे तेव्हा तो भडकत असे. त्याला खूप टेंपर होता हे मात्र नक्की. हार पचविता येत नसे त्याला. लॉजिकेली तो बरोबर असायचा. पण पूर्ण शो त्याने चालवला हेही नक्की. त्याने स्वतःचे अग्रसिवे, कॉमेडी, रोमँटिक, फ्रेंडशिप सगळे अँगल दाखवले. गेल्या आठवड्यातील मोस्ट सर्च celebrity च्या यादीत एक नंबर वर होता सिद्धार्थ शुक्ला. अजूनही ट्रेण्ड करतोय तो, #sidnaaz आणि BB 13
कधीपर्यंत वोटींग आहे, मी
कधीपर्यंत वोटींग आहे, मी यावेळी सर्व ९९ देणार विभागून विकास आणि मीनलला. कालपासून देतेय.
खानापूर सांगली जिल्ह्यात येतं. >>> थँक यु झकास.
जय आता एक नंबरवर गेला वोटींग मधे, विकास दोन, मीनल तीन, नंतर उत्क्या आणि शेवटून पहीली मीरा.
त्यामुळे विशाल जय लाईटस बंद करतील असं मलाही वाटतंय.
मिडविक मीरा किंवा उत्क्याला काढा. आमच्या आवडत्या वि मी मधल्या कोणाला नको.
गेले दोन्ही आठवडे सगळे सोशल
गेले दोन्ही आठवडे सगळे सोशल मिडिया ट्रेंड मीराला शेवटच्या नंबरवर दाखवत होते..... मागच्या आठवड्यात पण विकास आणि सोनालीमध्ये टॉपच्या नंबरसाठी चुरस आहे असेच चित्र सगळ्या youtubers नी रंगवलेले पण झाले काय तर मीरा घरात आणि सोनाली बाहेर!!
त्यामुळे हे youtubers एकतर फेकतात तरी किंवा Trends बनवण्यासाठी ते जो dataset/surveys/poll वापरतात ते लोक voot वर जाऊन votes देत नाहीत!!
किंवा बिगबॉस टीम लोकांना बाहेर काढायला वोटींगशिवाय अजुन काहीतरी क्रायटेरिया वापरतात!!
एस.. BB 13 ब्लॉकबस्टर सिझन
एस.. BB 13 ब्लॉकबस्टर सिझन होता...
मागच्या आठवड्यात पण विकास आणि
मागच्या आठवड्यात पण विकास आणि सोनालीमध्ये टॉपच्या नंबरसाठी चुरस आहे >>> आधी असं दाखवत होते पण शेवटी दोन तीन दिवस सोना खाली गेली पण नंतर उत्क्या आणि मीरा सर्वात शेवटी दाखवत होते.
इतर रिअँलिटी शोजप्रमाणेच
इतर रिअँलिटी शोजप्रमाणेच यातही केवळ वोटिंग वर नसत तर मेकर्सचाही डिसिजन असतो.पण इतर शोजमध्ये सांगतात की 50%वोटिंग आणि 50% जजेस.इथे जजेसच्या ऐवजी बिबॉसचे मेकर्स.
आणि फायनल वोट्सतर कधीच दाखवत नाहीत.
पण वोट्सपेक्षा फायनलमध्ये मेकर्स किंवा जजेसचा वाटा जास्त असावा अस वाटत,हे मला पटल जेव्हा 2008ची सारेगमप लिटल चँम्प आर्या किंवा प्रथमेशऐवजी कार्तिकी जिंकली.
तेव्हा आताही ज्याला काढायच ठरल आहे,त्यालाच काढणार,वोटिंगला कोण विचारत?
तेव्हा आताही ज्याला काढायच
तेव्हा आताही ज्याला काढायच ठरल आहे,त्यालाच काढणार,वोटिंगला कोण विचारत?.. तेच तर सगळे जण म्हणत आहेत.
फक्त हे अधिकार आदिश, नीता ह्यांना वाचवण्यासाठी वापरले असते तर मेकर्सचाच फायदा होता.
आणि फायनल वोट्सतर कधीच दाखवत
आणि फायनल वोट्सतर कधीच दाखवत नाहीत.
पण वोट्सपेक्षा फायनलमध्ये मेकर्स किंवा जजेसचा वाटा जास्त असावा अस वाटत,हे मला पटल जेव्हा 2008ची सारेगमप लिटल चँम्प आर्या किंवा प्रथमेशऐवजी कार्तिकी जिंकली.>>>>+1111111 त्याच काळात हास्यसाम्राट कार्यक्रम झाला होता त्यात अजितकुमार कोष्टी जिंकणार असं वाटलं होतं आणि अनपेक्षितपणे पांचट जोक्स सांगणारा प्राध्यापक जिंकला होता. त्याच नाव पण नाही आठवत आता. वाकडं तोंड करून वेगवेगळे चित्र विचित्र आवाज काढायचा. अगदीच सुमार दर्जाची कॉमेडी होती त्याची.
कधीपर्यंत वोटींग आहे, मी
कधीपर्यंत वोटींग आहे, मी यावेळी सर्व ९९ देणार विभागून विकास आणि मीनलला. कालपासून देतेय.>>> अन्जुताई आपल्या मिनललाच द्या सगळे वोट्स्,विकासला भरपुर सपोर्ट आहे त्यामानाने मिनलला सपोर्ट कमी आहे, ती फायनल ३ मधे तरी असावी.
लाइट जय-विशाल बन्द करणार
उद्या ( बुधवारी) दुपारी
उद्या ( बुधवारी) दुपारी बारापर्यंत व्होटिंग ओपन आहे
अन्जुताई आपल्या मिनललाच द्या
अन्जुताई आपल्या मिनललाच द्या सगळे वोट्स्, >>> जास्त मीनललाच देतेय पण विकासला नाही दिलं आणि मिड्विक काढलं त्याला उगाचच तर मनाला चुट्पुट लागेल म्हणून त्यालाही देतेय. म मां चा सध्या मीनलवर राग आहे तर तिला नाहीना काढणार.
उद्या ( बुधवारी) दुपारी बारापर्यंत व्होटिंग ओपन आहे >>> धन्यवाद.
जय फॅन्स खुश व्हा, जयचा सपोर्ट वाढलाय.
पण वोट्सपेक्षा फायनलमध्ये मेकर्स किंवा जजेसचा वाटा जास्त असावा अस वाटत,हे मला पटल जेव्हा 2008ची सारेगमप लिटल चँम्प आर्या किंवा प्रथमेशऐवजी कार्तिकी जिंकली.>>> अगदी अगदी.
बोकलत खूप दिवसांनी हास्यसम्राटबद्द्ल वाचून आठवणी जाग्या झाल्या, त्यात छोटा मुलगा मंदार केळकर होता तो माझा चुलत पुतण्या. आता यु पि एस सीची तयारी करतोय (उगाच अवांतर) .
त्या जयने विशालचा ट्विटर
त्या जयने विशालचा ट्विटर रेकॉर्ड ब्रेक केला, जय जोरात दिसतोय, जिंकवतील की काय त्याला.
अजित कोष्टी कोण आठवत नव्हते
अजित कोष्टी कोण आठवत नव्हते म्हणून यु ट्यूब चेक केला....
पहिलाच व्हिडीओ.. इंग्रजी निबंध...माय फ्रेंड... बाई म्हणतात माय फादर वर लिहा...आय हॅव मेनी फादर्स वाला पांचट जुना जोक... स्वतःच्या नावावर खपवलेला दिसला...
बोकलत.. तुमच्या गावचे आहेत का हे... बायस दिसून येतोय म्हणून विचारले...
या सिझनला बिबॉ काय करतात
या सिझनला बिबॉ काय करतात एकदमच अनिश्चित आहे !
विशाल, जय कि तो बिबीचा जावई लाचारमाइंड उत्क्या जिंकणार काय माहित
अरे व्वा अंजू चांगली आठवण आहे
अरे व्वा अंजू चांगली आठवण आहे.
नाही हो chraps गावचे नाहीत. पण त्या जिंकलेल्या वाकडतोंडयाचे जोक अजून पांचट असायचे.
जयची एव्ही लास्टला म्हणजे जय
जयची एव्ही लास्टला म्हणजे जय जिंकणार.जो जिंकणार असतो त्याला शेवटी ठेवतात.
जयची एव्ही लास्टला >>> हो
जयची एव्ही लास्टला >>> हो माझ्याही हेच डोक्यात येऊन गेले.
जयचं पहिल्यापासूनच काहीतरी
जयचं पहिल्यापासूनच काहीतरी सेटिंग असणार कलर्स बरोबर असंच वाटतंय, काहीना काही बिझनेस डिल जे आपल्याला कधीच कळणार नाही.
जयची पत्रकार परिषदेतली
जयची पत्रकार परिषदेतली वक्तव्य ऐकून त्याचे आई वडील घाबरले असणार. स्नेहा सून म्हणून घरी घेऊन आला तर काय? कुठून पाठवले पोराला शोमधे असे झाले असेल. मिडविक एव्हिक्शनची गरज काय होती? फक्त दोन दिवसांत असे काय बिघडत होते. उगाच फालतू ड्रामा.
एक सोनालीचा इंटरव्ह्यू पाहिला
एक सोनालीचा इंटरव्ह्यू पाहिला त्यात ती म्हणे ते लग्न ठरले वगैरे काही खरे नव्हते तो विकास चा शहाणपणा होता. आणि तो तिच्या बॉयफ्रेन्ड चा शर्ट म्हणजे असाच एका फ्रेन्ड चा शर्ट होता आणि कपडे संपले म्हणुन घातला पण विशाल ने विचारले कुणाचा शर्ट, म्हणुन उगीच त्याची टांगखिचाई केली म्हणे. आणि त्याने ती सिरियसली घेतली. झेपले नाही मला. हे म्हणजे नंतर तयार केलेले उत्तर वाटतेय.
हे म्हणजे नंतर तयार केलेले
हे म्हणजे नंतर तयार केलेले उत्तर वाटतेय... नाही तर काय, कशाला वाढवतेस बाई. आत झाली तेव्हा शोभा पुरे नाही का? वय वाढले पण अक्कल नाही असा प्रकार दिसतोय.
जयचं काही सांगता येत नाही, तो
जयचं काही सांगता येत नाही, तो स्नेहात गुंतलाय बहुतेक. मधे एक क्लीप पाहीली होती. सोनालीची आठवण मीनल मीरा काढत होते तेव्हा त्याने स्नेहाची आठवण काढली आणि स्नेहा स्नेहा करत बसला.
उत्कर्षला आज पहिल्यान्दा
उत्कर्षला आज पहिल्यान्दा रडताना बघितल. ह्याआधी त्याला रडताना कधी पाहिल नव्हत.
उत्कर्षचा फोटो छान केला बिबॉने. जुन्या सिनेमात हवेलीतल्या राजा महाराजान्चे फोटो असायचे तसा फोटो होता त्याचा.
कालच्या प्रिकॅपमध्ये विकास विशालमध्ये भाण्डण झालेल दाखवल. विकास रान्गत होता. ते नाही दाखवल आज.
पत्रकार परिषदेत विशाल सोनालीला डबल ढोलकी म्हणाला.
उद्या मीराची एव्ही बघताना टिव्ही म्यूट ठेवावा लागेल. हा हा हा
डबा एक्सप्रेस:
https://www.youtube.com/watch?v=1x2xNHbBCC8
स्नेहाने आणखी एकाला गुंडाळला
स्नेहाने आणखी एकाला गुंडाळला म्हणजे....
छ्या कोण आहेत बिबॉ चे
छ्या कोण आहेत बिबॉ चे क्रिएटिव्हज! उत्क्याची एव्ही काहीच्या काही फुगवलेली वाटली! काहीही कौतुके करत होते बिबॉ. एंटरटेनमेन्ट चे तेवढे पटले. बाकी बळेच मास्टरमाइंड. कसल्या इतक्या स्ट्रॅटेजी वर्क झाल्या ह्याच्या?! हिला आत्ता उडवू, त्याला काय कधीही काढू , कुठे वर्क झाले ते? काहीही.
विशाल ची चांगली होती. विनर मटेरियल वाली होती का? काय माहित!मला स्वतः ला मीनल ची एव्ही बघायला मज्जा आली! एकटी मुलगी भल्या भल्यांना न डरता काय नडलीय! टाळ्या!
Pages