दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Sad मराठी म्हणजे ओळखू येईपर्यंत द्राक्षासव होईल त्या द्राक्षाचे..
जीवनात ही घडी अशीच राहू दे वगैरे टाईप्स आहे का? क्ल्यू द्या...

इतके मागे जाऊ नका जीवनात ही घडी. मराठी सिनेमा रंगीत होण्यापूर्वी 80s मधील सिनेमा. ही हीरोइन चांगली नृत्यांगना होती.

कोण असतील बरं महाराष्ट्राच्या वायव्येकडील या सुंदऱ्या?
आणि कोण असतील त्यांचे 2 सुंदरे?
त्यातही गंमत अशी की यातल्या एकीचा काका एका डायलॉग मुळे एका चित्रपटात इतका प्रसिद्ध झाला, त्याच चित्रपटाशी संबंधित एकाच्या मुलाचा मेहुणा म्हणजे यातला एक हिरो.
IMG_20201118_113907.jpg

अगागा Happy
लोकांना गोंधळायला वेळही दिला नाही.

IMG_20201118_121038.jpg

माझं त्या जुन्या महाभारतातल्या युद्धातल्या रावण साईड पात्रांसारक्खं झालंय.
ते भात्यातून अभिमानाने बाण काढतात. त्यातून आग वगैरे निघत असते. आणि पलिकडचा बाण येऊन सगळं कॅन्सल करतात आणि हे येड्यासरखे ऑ करुन बघत बसतात Happy

IMG_20201118_122720.jpg

माझं त्या जुन्या महाभारतातल्या युद्धातल्या रावण साईड पात्रांसारक्खं झालंय.<<<< अनु, जरा दम खा. वाईच लिंबू सरबत पी. कारण आता रावण महाभारत युद्धात यायला लागलाय. Proud

माझं त्या जुन्या महाभारतातल्या युद्धातल्या रावण साईड पात्रांसारक्खं झालंय. >>>>
Happy तर काय !! रावण महाभारतात गेला ना उठून....
तरी हौस फिटली नाही, पुढचा बाण त्याच उमेदीने

खतरनाक!!! सीमंतिनीचा आज रेकॉर्डतोड परफॉर्मन्स... :टाळ्या: :शिट्ट्या: :21 तोफांची सलामी: Proud

चंद्रावरून डायरेक्ट जियाला सिनेमातलेच गाणे आठवणे याला खरोखर तोड नाही 'गाणे ओळखा'च्या इतिहासात.

अग आई. यातील गाणी मला कधीच माहित नव्हती. काय एक एक खंगरी शोधून आणतेस अनु. आणि सिमंतिनी पण
कीती अभ्यास करुन आली आहे. त्या शेवटच्या गाण्यातील हिरो हीरोइन तर कधी बघितले पण नाहीत.

माझं मनच हॅक झालंय
तोहफो कुबुल करो
जहापनाह तुससी ग्रेट हो

ते मी पण पाहिले नाहीत सियोना.
पण या हिरो च्या ओव्हर ऍक्ट मुळे टीव्हीवर पाहिलेले गाणे लक्षात राहिले
शिवाय यातील लग्नाच्या व्हिडीओ प्रमाणे हिरोईन चे 7 चेहरे दिसणे, हिरोचा शेजारच्या मोठ्या दादाचा पळवून आणल्याप्रमाणे असलेला 2 ब्रेस्टड सूट, दात, केस यांचा पुरेसा उहापोह इथे अचाट अतर्क्य धाग्यावर झालाय Happy

Pages